अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ आपल्याच प्रांतात सापडतं. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.

खाऊच्या शोधकथा शोधत शोधत पुढे सरकताना काही वेळा खरंच इतक्या गमतीशीर गोष्टी हाती येतात की त्या गोष्टींच्या ऐतिहासिक प्रामाण्याबद्दल खात्री नसली तरी त्या कथा सांगण्याचा मोह आवरत नाही. यातल्या बऱ्याच कथांना शाब्दिक मीठ-मसाला लागलेला आहे. मात्र तरी तयार झालेली कथारूपी खमंग चटपटीत भेळ स्वादिष्ट नक्कीच आहे.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
siddhu mussewala fans commented on borthers video
Video : सिद्धू मूसेवालाच्या आठ महिन्यांच्या भावाचं झालं अन्नप्राशन; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “त्याला प्रत्येक…”
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

मुळात या सर्व गोष्टींच्या बाबतीत जाणवणारी अडचण हीच की, भारतीयांचा आपल्या तल्लख बुद्धी आणि मौखिक परंपरेवरचा ठाम विश्वास. पदार्थाचं दस्ताऐवजीकरण करून ठेवावं हे यामुळेच फारसं कुठे घडलेलं दिसत नाही. आजीकडून आई, आईकडून मुलगी आणि तिच्या पुढच्या अनेक पिढय़ांपर्यंत तोंडीच सगळी माहिती सरकलेली आहे. एखाद्या ‘मानसोल्लासा’चा वा अशाच मोजक्या ग्रंथांचा अपवाद वगळता नव्याने पदार्थ करून पाहणाऱ्या मंडळींनी तो का व कसा सुचला हे फारसं लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे अशाच आख्यायिका वा दंतकथांवर अवलंबून राहावं लागतं हे खरं असलं तरी तेही नसे थोडकं.

अशाच अनेक पदार्थापैकी एक असलेल्या भेळपुरीचं नाव काढलं की, आपसूकच मुंबईची चौपाटी नजरेसमोर उभी राहते. ‘चौपाटी जायेंगे भेलपुरी खायेंगे’ यात भेळपुरीची इतिकर्तव्यता. चौपाटीवर जाऊन भेळपुरी खाल्ली नाही म्हणजे व्यर्थ व्यर्थ हा जन्म, इतकं हे समीकरण दृढ आहे. प्राण्यांचे जसे वर्ग असतात तशाच खाद्यवर्गातील चाटकुळातील सर्वात ज्येष्ठ भगिनी म्हणजे भेळपुरी. शेवपुरी, पाणीपुरी, बटाटापुरी ही तिची कनिष्ठ भावंडं. ‘चाट’कूल म्हणजे बम्बईय्या भाषेत हे चाट आयटेम्स तसे जुनेच आहेत. त्यांचं मूळ उत्तर प्रदेशाकडे दाखवता येतं. तिथून देशभर पसरलेल्या पुरभैय्यांनी हे चाट आयटम्स आपल्या सोबत नेले आणि ही भेळपुरी लोकप्रिय झाली. याच लोकप्रियतेतून जन्माला आलेली भेळपुरीइतकीच खमंग कथा वाचनात आली.

गोष्ट ब्रिटिश काळातली आहे. ब्रिटिशांनी भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली. त्या निमित्ताने त्यांनी लंडनमधून अनेकांना भारताचा रस्ता दाखवला. त्यातच होते ब्रिटिश बल्लवाचार्य विलियम हॅरॉल्ड. एक अनुभवी शेफ असलेल्या विलियम यांचं मध्य लंडनमध्ये उत्तम चाललेलं रेस्तरॉ होतं. पण ब्रिटिश आर्मीमधल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे खाजगी कुक म्हणून विलियम यांना भारतात पाठवलं गेलं. भारतीय पदार्थाची आणि एकच पदार्थ विविध पद्धतीने बनवता येण्याच्या वैविध्यांची त्यांना अक्षरश: भुरळ पडली. एके दिवशी एक ब्रिटिश अधिकारी हॅरॉल्ड यांच्याकडे आला आणि त्याने हॅरॉल्ड यांना सांगितलं की, त्यांनी एक चटपटीत पदार्थ चाखला असून त्यांना तो खूपच आवडला आहे. तर तो पदार्थ हॅरॉल्ड यांनी शिकून घ्यावा. सैनिकांसाठी मोठय़ा प्रमाणावर तो पदार्थ बनवून खाऊ घालायची त्या अधिकाऱ्याची इच्छा होती. हॅरॉल्ड यांना हे आव्हान वाटलं. ते त्या गावातील अनेक मंडळींना भेटले आणि त्या पदार्थाची पाककृती विचारली. पण प्रत्येक वेळी चुरमुरे व बटाटा वगळता हॅरॉल्ड यांना नवीच कृती हाती लागली. संध्याकाळी त्या एकाच पदार्थाच्या विविध पाककृतींचे बाड घेऊन परतलेल्या हॅरॉल्ड यांना अधिकाऱ्याने उत्सुकतेने, पदार्थ शिकून झाला का? असं विचारलं तेव्हा हॅरॉल्ड यांनी आपण गोंधळून गेलो आहोत असं सांगत उपहासाने म्हटलं की, ‘आजसुद्धा आपल्याला फ्रेंच फ्राइजवरच अवलंबून राहावं लागेल असं दिसतंय.’ त्यावर चिडलेल्या अधिकाऱ्याने आपल्या गनने हॅरॉल्ड यांच्यावर गोळी चालवली अशी कथा आहे. हे सर्व रामायण ज्या पदार्थामुळे घडलं ती होती आपली लाडकी भेळपुरी.

भेळपुरीची चटणी, त्यातही गोडी वा तिखट चटणी बनवण्याच्या अनेकांनी सांगितलेल्या अनेक पद्धती, कधी लिंबू तर कधी कैरीचा, चिंचेचा आंबटपणा, कधी कांद्याचा वापर तर कांदा वज्र्य असणाऱ्यांसाठी काकडीचा वापर असे आणि इतके विविध प्रकार हॅरॉल्ड यांच्या हाती लागले असतील तर त्यात त्यांचा काय दोष? ही कथा पक्की नसेलही, पण भेळपुरीच्या स्वादाने एखादा ब्रिटिश ऑफिसर वेडावून जाणं अगदी अशक्यही नाही.

अशा या भेळपुरीची चित्तरकथा वाचताना तिची अनेक नावंही डोळ्यांपुढे तरळतात. हिंदी भेलपुरी, मराठी भेळपुरी, बंगाली जालमुरी, कन्नड चुरूमुरी ही नावंही किती गोड ना! पण या गोडपणासोबतच ‘मै तो रस्ते से जा रहा था, मै तो भेलपुरी खा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू?’ असा झणझणीत तिखटपणाही आहे. ज्याला जसा सोसेल तसा त्याने अनुभवावा. भेळपुरी हाऊसमध्ये मिळणाऱ्या भेळपुरीसोबतच भारतातील घराघरांतील गृहिणी भेळेवर हवे ते प्रयोग करत असतात. उरलेल्या फराळाची भेळ दिवाळीनंतर माझी आई करून द्यायची, त्यावरून सोयीप्रमाणे प्रांतोप्रांती होणाऱ्या प्रयोगांची व्यापकता आणि वैविध्य लक्षात यावं.

संध्याकाळची रमणीय वेळ असावी. आपली नेमकी टेस्ट ओळखणारा भेळपुरीवाला असावा. चुरमुरे, टोमॅटो, बटाटा, कांदा, शेव, डाळे, कैरी, चटण्या यांच्या जादूने तयार भेळेचा घास त्या पुरीच्या जोडीने मुखात विसावावा. त्या झणझणीत तिखट ठसक्याने डोळ्यांत येणारं पाणी एका वेगळ्याच अनुभवाची अनुभूती देऊन जातं. मंडळी तुमचा अनुभव कसा आहे हे जाणून घ्यायला उत्सुक आहोत. ई-मेल्सच्या माध्यामातून या खाद्यगप्पा अवश्य रंगवू या..आम्ही वाट पाहात आहोत.