ती अजिबात डान्स शिकलेली नाहीये. शाळेत असल्यापासून ती डान्स करायची नि बसवायचीही. ते सगळ्यांना आवडायचं. मग तिनं वेगवेगळे ग्रुप जॉइन केले नि त्यात शिकवतानाच शिकली. अकरावीत असताना शामक दावरकडे शिकलेल्या मित्राच्या ग्रुपला ती जॉइन झाली. हा ग्रुप क्लासिकल सोडून हिपटॉप, वेस्टर्न, साल्सा, फोक इत्यादी डान्सफॉर्म शिकवतो. ‘फातिमा हायस्कूल’मधल्या डान्स अॅक्टिव्हिटीज् या डान्स ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली व्हायच्या. असं ठिकठिकाणी ते शिकवतात. त्या अनुभवाविषयी राजश्री सांगते की, ‘महेश टय़ुटोरिअल्सच्या सगळ्या सेंटर्समध्ये जाऊन मुलांच्या ऑडिशन्स घेऊन मुलं निवडायची होती. त्यांची कोरिओग्राफी दुसरे करणार होते. आम्ही हेड कोरिओग्राफर म्हणून काम केलं नि प्रोफेसर्सच्या डान्सची कोरिओग्राफी केली होती.’
त्याच सुमारास तिला जिमनॅस्टिक ट्रेनर म्हणून मत्रिणीच्या ओळखीमुळं ‘नॅशनल स्पोर्टस् अॅकॅडमी ऑफ इंडिया’मध्ये (एन.एस.सी.आय.) ऑफर आली. ती तिकडंही जॉइन झाली. त्याविषयी तिनं काही रीतसर शिक्षण घेतलेलं नाहीये. ‘श्री समर्थ व्यायाम मंदिरा’मध्ये दरवर्षीच्या शिबिरांत शिकली होती तेवढंच. हळूहळू शिकता शिकता शिकवावं कसं तेही कळलं. पुढं हा अनुभव गाठीशी असल्यानं तिला जिमनॅस्टिक ट्रेनर म्हणून नेपियन्सी रोडच्या ‘जिम क्लब’मध्ये चार महिने जॉब मिळाला. ही सगळी धावपळ करताना तिला काळ-काम-वेगाचं गणित कळलं नि व्यावहारिक जगाची ओळख झाली.
अकरावी-बारावीत असताना तिचं डान्स शिकवणं नि जिम ट्रेनर ही कामं दोन्ही चालू होती. डान्स शिकवणं नि त्याची प्रॅक्टिस करून घेणं, हे काम जणू रात्रं-दिवस चालूच असायचं. शेवटी तिनं परीक्षेच्या वेळी
शाळेत असल्यापासून ती खो-खो खेळतेय. एफ.वाय.च्या वर्षी खो-खो खेळण्यासाठी तिला ‘डी. जी. रुपारेल कॉलेज’मधून विचारण्यात आलं. म्हणून ‘कीर्ती ए. डुंगरसी कॉलेज’ सोडून ती रुपारेलला गेली. त्याच वेळी तिला रिझवी कॉलेजमधूनही काही ऑफर्स आल्या होत्या. पण ती तिकडं गेली नाही, कारण त्यांच्या ऑफर्सच्या स्वरूपामुळं अभ्यासावरचं लक्ष उडलं असतं. शिवाय ‘रुपारेल’ला पहिला होकार कळवल्यानं दिलेला शब्द पाळणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर काही महिने डान्स शिकवणं चालूच होतं. ती सांगते की, ‘फर्स्ट सेमिस्टरनंतर घरून थोडी डान्स थांबवून जॉबला लागायची तंबी मिळाली. तसं करायची मनापासून इच्छा नव्हती. डान्समधूनही बऱ्यापकी इन्कम मिळत होतं, पण वेळेचं गणित जमत नसल्यानं घरच्यांनी जॉबचा आग्रह धरला. मग इंटरव्ह्यू-सिलेक्शन होऊन जॉबही लागला. एफ.वाय. नि एस.वाय.च्या वर्षी जॉब, डान्स आणि खेळाचं त्रिकूट जमलं होतं. पहिली दोन र्वष कॉलेजमध्ये फारशी अॅक्टिव्ह नव्हते. जॉबला जायची घाई असायची. जॉब नि अभ्यासाला प्राधान्य दिलं. सुट्टीच्या दिवशी मात्र मी ग्रुपला वेळ देतेच. कॉलेजचं लाइफ एन्जॉय करणं ही गोष्ट टी.वाय.ला असताना केली. म्हणजे डेजचं सेलिब्रेशन वगरे.. एरवी मात्र कॉलेज, क्लास नि जॉब असंच शेडय़ुल होतं. यात खेळाकडं बऱ्यापकी दुर्लक्ष झाल्यामुळं सरांकडून थोडी बोलणीही खावी लागली. आता पुन्हा खेळाकडं वळणारेय.’
राजश्रीचा भाऊ ‘वेस्टर्न रेल्वे’चा खो-खो खेळाडू आहे. त्याचा खेळ बघून तिलाही या खेळाची गोडी लागली. ती दुसरीपासून खो-खो खेळत्येय. तिच्या ‘आय.ए.एस. मॉर्डन इंग्लिश स्कूल’मधले खेळाचे नितीनसर खूपच सपोर्टव्हि होते. ती सांगते की, ‘सातवीत असताना मला मलेरिया झाला होता. ते हॉस्पिटलमध्ये येऊन म्हणाले होते की, ‘तुला या आजारपणातून उठायचंय नि खेळायचंय. तुझ्यासाठी टीम काढल्येय.’ आणि खरोखरच मी आजारपणातून उठून खेळले.. मग परत अॅडमिट झाले.. परत खेळले.. पुन्हा मलेरिया.. पुन्हा अॅडमिट.. पुन्हा खेळले.. ती टुर्नामेंट आम्ही जिंकलो. खो-खो कंटिन्यू राहिलं. ‘श्री समर्थ व्यायाम मंदिरा’मधला एक किस्सा आठवतोय.. लहानपणी मी खूप मस्तीखोर होते. आम्हाला शिकवणारी खूपच कडक शिस्तीची ताई येणार नसल्याचं कळल्यावर मी ग्राऊंडवरच नाचायला लागले.. तेवढय़ात ती मागून येऊन उभी राहिली.. मग काय विचारता, तिनं सेकंदभरही उसंत न देता माझी प्रॅक्टिस घेतली. प्रॅक्टिस करताना मला चक्कर आली. तरीही तिचा राग गेला नव्हता. तिनं उचलून मला घरी नेलं. घरून सांगितलं गेलं, व्यायामशाळा बंद.. सरांनी घरी येऊन समजावलं नि पुन्हा जाऊ लागले. त्यानंतरही शिकवणं नि मारण्याचा सिलसिला सुरू राहिला. पण हे सारं ती आमच्या भल्यासाठीच करत्येय, हे कळलं. तिच्या सातत्यानं प्रॅक्टिस करून घेण्यानं आम्ही चांगल्या खेळलो. आमचं नाव झालं.. मधल्या काळातल्या पॅचमध्ये खेळाचा भार आमच्यावरच आला. त्या वर्षी आम्ही ओपनमध्ये डायरेक्ट फर्स्ट प्लेस मारली होती. ती आत्तापर्यंत कायम होती नि आम्ही डाऊन झाल्यावर ती प्लेस गेली.’
गेली तीन र्वष ती ‘फोनिक्स इन्फो सíव्हसेस’मध्ये जॉब करतेय. तिथल्या ‘बीजीव्ही’ म्हणजे ‘बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन’ डिपार्टमेंटमध्ये ती सीनिअर प्रोसेस एक्झिक्युटिव्ह आहे. कॉर्पोरेट कंपन्यांतून नेमल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पूर्वीचा जॉब, एज्युकेशन, अॅड्रेस वगरे पाश्र्वभूमी चेक करण्यात येते. ‘मी रिपोर्ट तयार करणं, क्लाएंटशी इंटरअॅक्ट करणं इत्यादी कामं करते. ज्या कर्मचाऱ्याची बॅकग्राऊंड शोधायच्येय,
राजश्री सांगते की, ‘क्लाएंटसोबत आमचा रॅपो खूप चांगला असतो. कामाच्या बाबतीत प्रोफेशनल आणि कॉन्फिडेन्शल राहायला लागतं. इतर वेळी मित्रत्वाचं नातं असतं. काही मोठय़ा कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी राजश्रीला ‘तू बंगलोरला असतीस, तर तुला आमच्या कंपनीत घेतलं असतं,’ असं सांगितलं होतं. पण तिला मुंबई सोडाविशी वाटत नाही आणि शिक्षणही पूर्ण करायचंय. ती म्हणते की, ‘ही संधी चालून आली, तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये थोडे प्रॉब्लेम चालू होते.. अशा वेळी मध्येच सोडून जाणं मनाला पटलं नाही. शिवाय फ्लेक्झिबल टायिमग्ज अॅडजस्टमेंटमुळं टी.वाय.च्या अभ्यासाला अधिक वेळ देता आला. एकदा तर हा जॉब जातोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऑफिसचं शिफ्टिंग नि अभ्यासामुळं वेळेवर जाणं जमत नव्हतं. कष्ट करून काही हाती लागत नव्हतं, पण तीही परिस्थिती पालटली. या धडपडीत घरच्यांनी खूप सपोर्ट केला. मात्र त्यांच्यासाठी वेळ देता येत नाही, याचं वाईट वाटतं. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनीही चांगलं सहकार्य केलं.’
तिला म्युझिक ऐकायला नि गेम्स खेळायला खूप आवडतं. ती मूडनुसार गाणीही ऐकते. ‘फातिमा’मध्ये शिकवताना तिच्या विद्यार्थ्यांनी तिला गिटार शिकवलं होतं. ते तिला अतिशय आवडलं होतं. त्यामुळं वेळ मिळाल्यावर तिला गिटार शिकायचंय. शास्त्रीय नृत्य शिकायचंही मनात आहे. सध्याच्या सुट्टीत डान्स शिकवणं, जॉब नि खेळही चालूच राहणारेत. सुट्टीत ‘टॅली’ नि ‘एमएससीआयटी’चे कोर्स करणारेय. फुलटाइम ‘एमबीए’ करणं शक्य नसल्यानं ते पार्टटाइम करण्याचा विचार आहे. त्यासाठी टी.वाय.नंतर तीन वर्षांचा नोकरीचा अनुभव लागत असल्यानं ही गॅप घ्यावी लागणारेय. यादरम्यान ती एम.कॉम. करणारेय. त्यानंतर चांगला जॉब मिळवण्याचं ध्येय तिनं मनाशी ठेवलंय. शिक्षण सुरू असताना डान्स शिकवणारच आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा