दिवसभरातला सर्वात महत्त्वाचा आहार म्हणून ब्रेकफास्टकडे पाहिलं जातं, कारण त्यातून मिळणाऱ्या असंख्य फायद्यांमुळे आपल्या शरीरातली ऊर्जेची पातळी वाढते आणि अभ्यासातला परफॉर्मन्सही वाढतो. चांगलं पोषण मिळाल्याने आपलं आरोग्य सुधारतं, परफॉर्मन्स सुधारतो आणि इतकंच नव्हे तर आपला मूडही चांगला राहतो. मुलांना योग्य पोषण मिळाल्याने त्यांच्या एकंदरीत आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो आणि त्यांची वाढही चांगली होते. आजारांपासून त्यांना संरक्षण मिळतं आणि त्यांची हाडं, दात, स्नायू, निरोगी ऊतींची चांगली वाढ होते तसेच प्रतिकारशक्तीही वाढते. मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ ही सातत्याने आणि नियमितपणे मिळणाऱ्या पोषक आहारावर अवलंबून असते. मुलांनी ब्रेकफास्ट टाळला तर ते अरबट-चरबट खातात किंवा बराच काळ उपाशी राहतात. त्यामुळे शारीरिक, बौद्धिक आणि वर्तवणुकीच्या समस्यांना आमंत्रण मिळतं. जी मुलं ब्रेकफास्ट करत नाहीत त्यांना अभ्यास, सामाजिक तसेच भावनिक समस्यांना तोंड द्यावं लागतं, हे खरं आहे. एकंदरीत आरोग्यासाठी उत्तम पोषण मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य पोषण मिळाल्याने स्थूलपणा, कमकुवत हाडं, हृद्विकार, मधुमेह अशा अनेक वैद्यकीय समस्या टाळता येतात. पण व्यवस्थित ब्रेकफास्ट केल्याने मुलांची सर्वागीण शारीरिक आणि मानसिक वाढ होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा