देशातील सगळ्यात दिमाखदार आणि ट्रेंड सेंटर ठरणारा लॅक्मे फॅशन वीक यंदा २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान साजरा होणार आहे. यावर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेणाऱ्या प्रस्थापित आणि होतकरू डिझाइनर्सचं प्रमाण ५०-५० टक्के आहे. काय नवीन आहे या सीझनच्या फॅशन वीकमध्ये?
मुंबईतला सगळ्यात दिमाखदार आणि शानदार फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक आजपासून (२३ ऑगस्ट) सुरू होतोय. नवीन डिझाइन्स, नटनटय़ा, ग्लॅमर, गॉसिप या सगळ्यांनी हा फॅशन वीक रंगून जातो. नामांकित डिझाइनर्स, बॉलीवूडच्या मोठय़ा स्टार्सची हजेरी आणि ट्रेंड सेटिंग फॅशन यामुळे हा फॅशन वीक इंडियन फॅशनचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. सगळेच फॅशनचे जाणकार या फॅशन वीकची आतुरतेने
वर्षांतून दोन वेळा हा फॅशन वीक साजरा होतो. यंदा २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्टदरम्यान मुंबईच्या ग्रँड या हॉटेलमध्ये हा विंटर फॅशनल फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. अगदी २००९ च्या पहिल्या शोपासूनच या फॅशन वीकमध्ये गॉसिप आणि नंतरचे वाद रंगले आहेत. यावर दुटप्पीपणाचे कितीही आरोप झाले असले तरी आतापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीत फॅशन वीकमधून होतकरू डिझाइनर्सना एक हक्काचं व्यासपीठ तयार करून दिलंय यात काही शंका नाही. यावर्षी या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात मनीष मल्होत्राच्या कलेक्शननी होणार आहे तर सांगता सब्यासाची मुखर्जीच्या कलेक्शननी होणार आहे. सब्यासाची तब्बल ५ वर्षांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेणार आहे.
या वर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेणाऱ्या प्रस्थापित आणि होतकरू डिझाइनर्सचं प्रमाण ५०- ५० टक्के आहे. यंदा रितू कुमार, मनीष मल्होत्रा, विक्रम फडणीस, अनिता डोंगरे, अर्चना कोचर, अनुष्का खन्नासारखे प्रसिद्ध आणि नामवंत डिझाइनर्स सहभागी होणार आहेतच. पण शिखा आणि विनिता, पायल सिंघल, पायल खांडवाला, आस्था नारंगसारखे नवोदित डिझाइनर्स आणि त्यांचे कलेक्शनदेखील पाहायला मिळणार आहेत.
या वर्षीच्या लॅक्मे फॅशन वीकचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे भारतीय हातमाग कौशल्यावर आधारित कलेक्शन्स. कृष्णा मेहता या वेळी मणिपुरी हातमागाचे अनोखे कलेक्शन सादर करणार आहेत. मेहता यांनी मणिपुरी कारागीरांच्या मदतीने मणिपुरी हातमाग आणि आधुनिक डिझाइनस यांचा मिलाप आपल्या कलेक्शनमध्ये केलेला आहे. तर दुसरीकडे श्रुती संचेती आणि सौमित्र मंडल यांनी आपल्या कलेक्शनमध्ये महाराष्ट्राच्या हातमाग परंपरेचा समावेश केला आहे. त्यामुळे आधुनिकतेला पारंपरिक कलेचा साज चढलेला या लॅक्मे फॅशन वीकमध्ये नक्कीच पाहायला मिळेल.
रितू कुमार यंदादेखील आपल्या कलेक्शनमधून भारतीय वस्त्रोद्योगचे एक नवीन पान उलगडून दाखवणार आहे. यंदा ‘द थंडर माऊटन अॅण्ड द कìलग वाइन’ या आपल्या कलेक्शनमधून त्या हिमालयाच्या कुशीत
पायल खांडवाला यंदा तिच्या ‘द फाइन बॅलेन्स’ या कलेक्शनमधून आधुनिक कलाकुसर आणि पारंपरिक सौंदर्य यांचा मिलाप करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे पायल सिंघल तिच्या ‘चारबाग’कलेक्शनमधून पíशयन स्थापत्यकलेचा मेळ फॅशन बरोबर घालण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ती आपल्या कलेक्शन मध्ये बोल्ड ग्राफिक प्रिंटसचा मिलाप फ्लोरल िपट्र्स बरोबर करणार आहे. शिखा आणि विनिता या आपल्या कलेक्शनमधून मशरूमच्या ओंगळवाण्या आणि उदासीन रूपाला मानवी स्वभावाचे रुपडे देऊन त्याला रॅम्पवर स्थान मिळवून देणार आहेत.
डिझाईयनर रजत तंग्री यंदा डार्क एजेस या त्याच्या कलेक्शनमधून प्रकाश आणि अंधार या दोन जगातील तणाव समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. वैविध्य आणि विभिन्नता हे या कलेक्शनचे वैशिष्टय़ असेल. काळ्या आणि लाल रंगाबरोबर जर्दोसीचा वापर या कलेक्शनमध्ये तो करणार आहे.जतीन वर्माच्या एडन टू पॅरेडाईज या कलेक्शनमधून माणसाच्या उत्क्रांतीपासून ते शाही तख्तापर्यंतचा प्रवास अनुभवता येणार आहे. मिशेल बोहबोत या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या डिझायनर आपले खास कलेक्शन सादर करणार आहेत. याशिवाय जेन नेक्स्टच्या यादीत आदिती होलानी, आयमन आगा, अरमान रंधवा, नितीन चावला, प्रणॉय कपूर, रिक्षी भाटिया, जयेश सचदेव यांची निवड झाली आहे. हे आणि अशा अनेक नवीन आणि अनोख्या थीम्स आणि कलेक्शन्सनी या वेळेचा लॅक्मे फॅशन वीक सजणार आहे. त्यामुळे याकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा