वेदवती चिपळूणकर
व्हर्च्युअल अनुभवांमधून बाहेर येऊन प्रत्यक्षात इव्हेंट्स आयोजित करणं, सेलिब्रेट करणं आणि आपलं प्रोफेशन, आपलं आयुष्य नॉर्मलाइज करणं याची सुरुवात नव्याने सर्वचजण करत आहेत. व्हर्च्युअली होऊन गेलेल्या सगळय़ा इव्हेंट्ससाठीसुद्धा प्रत्यक्षात हजेरी लावणं ही जुनीच गोष्ट आपल्याला पसंत पडते हे सर्वाच्याच लक्षात आलं आहे. म्हणूनच या वेळी एफडीसीआय x लॅक्मे फॅशन वीक पुन्हा प्रत्यक्ष आयोजित केला गेला आहे. या वर्षी मार्चमध्ये दिल्लीत पहिल्यांदा लॅक्मे फॅशन वीक प्रत्यक्षात आयोजित करण्यात आला होता, आता मुंबईतले त्याचे नवे पर्वही त्याच उत्साहात जिओ वल्र्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झालं आहे.
दोन वर्षांच्या कालावधीत व्हर्च्युअल फॅशन शो होऊनदेखील अॅक्च्युअल फॅशन वीकची उत्सुकता आणि अप्रूप टिकून आहे हे दिल्लीत रंगलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ला मिळालेल्या प्रतिसादाने सिद्ध केलं होतं. आता मुंबईतही एफडीसीआय x लॅक्मे फॅशन वीकची धूम १२ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून १६ ऑक्टोबपर्यंत रंगणाऱ्या या फॅशन वीकबद्दल डिझाइनर्ससह फॅशनप्रेमींच्या मनातही उत्सुकता आहे. नेमेचि ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या या लॅक्मे फॅशन वीकला कायम दिवाळीसारखे मोठे सण आणि लग्न सोहळय़ांच्या धामधुमीची किनार असते. त्याचा प्रभाव लॅक्मे फॅशन वीकवर पडल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे या वेळी फॅशन डिझाइनर जोडी शंतनू आणि निखिल यांनी शोचे ओपनिंग करताना सादर केलेले ‘कपेला ब्रायडल कलेक्शन’ हे खास बॅरोक एरातील कलाकुसरीवर बेतलेले होते. रोममध्ये रेनेसान्सनंतर सुरू झालेल्या या बॅरोक आर्टचा प्रभाव हळूहळू जगभर पसरत गेला. याच काळातील झुंबर आणि त्यांच्या कलाकुसरीवरून प्रेरणा घेऊन शंतनू आणि निखिल यांनी कपेला ब्रायडल कलेक्शन डिझाइन केले आहे. त्यांच्या या खास ब्रायडल कलेक्शनची ओळख शो स्टॉपर म्हणून अभिनेत्री क्रिती सननने करून दिली. अर्थात, या फॅशन शोची सुरुवात ब्रायडल कलेक्शनने झाली असली तरी या वीकमध्ये त्यापलीकडे जात नवनव्या डिझाइन्स आणि पॅटर्न्सवर भर दिला जाणार आहे.
करोनाकाळातून बाहेर पडल्यानंतर आता दिसून येत असलेल्या डिझाइन्सच्या पॅटर्न्समध्ये नेहमीपेक्षा कमालीचा फरक दिसून आला. कस्टमर्सच्या आणि डिझायनर्सच्यादेखील नवीन मानसिकतेचा प्रभाव त्यांच्या डिझाइन्सवर दिसून येतो. अनेक डिझायनर्सनी या वेळी बोल्ड प्रिंट्सचा वापर मुक्तपणे केल्याचं पहिल्या दोन दिवसांत दिसून आलं. बोल्ड आणि मोठे प्रिंट्स केवळ ड्रेसमध्ये नव्हे तर टॉप-पॅन्टच्या जोडीतही दिसून येतात. गोल, चौकोन, त्रिकोण असे भौमितिक आकार मोठय़ा आणि ठळकपणे उठून दिसतील अशा पद्धतीने सॉलिड कलर्समध्ये वापरले गेले आहेत. उभ्या किंवा आडव्या स्ट्राइप्स वापरून डिझाइन्सना वेव्ही न ठेवता बोल्ड आणि सॉलिड म्हणून प्रेझेंट केलं गेलं.
डिझायनर्सची रंगांची निवड सुरुवातीच्या दिवसांतली अत्यंत ब्राइट आणि सॉलिड कलर्समध्ये आहे आणि ती सर्वाचीच निवड असण्याची पूर्ण शक्यता आहे. सगळे उत्साही रंग या वेळी डिझाइन्समध्ये आहेत. शेडेड किंवा फेड-आऊट कलर्सच्या ऐवजी संपूर्ण सॉलिड कलर्स ही या वेळची खासियत ठरणार आहे. फेस्टिव्ह वेअरमध्येदेखील ब्राइट लाल, ब्राइट पिवळा, क्रोम येलो अशा रंगांची चलती आहे. मेन्स कलेक्शनमध्येसुद्धा बीज, फ्रेश ग्रीन, डार्क ब्ल्यू असे रंग पाहायला मिळत आहेत. डार्क रंगांची ब्राइट रंगांशी कॉम्बिनेशन्सही केली गेली आहेत.
या सीझनमध्ये मेन्सवेअरच्या कलेक्शन्समध्ये मात्र पहिल्यापेक्षा वाढ झाली आहे. पहिल्या दोन दिवसांतच मेन्सवेअरची स्वतंत्र एक्स्क्लुसिव्ह कलेक्शन्स तर सादर झालीच, मात्र बहुतेक डिझायनर्सनी त्यांच्या कलेक्शनमध्ये मेन्सवेअरच्या डिझाइन्सचा समावेश केला होता. अनेक डिझायनर्सची थीम कोणत्याही ओकेजनला जाणारे आऊटफिट्स, कोणत्याही ठिकाणी चालणारे आऊटफिट्स, कोणत्याही कारणासाठी छान दिसणारे आऊटफिट्स, या धर्तीवर जाते. त्याचसोबत वर्क फ्रॉम एनिव्हेअर अशा थीमवर कॅज्युअल ऑफिस वेअर अशी कलेक्शन्ससुद्धा सादर झाली. वेअरेबल डिझाइन्स हळूहळू ट्रेण्डमध्ये येत होतीच, मात्र लॉकडाऊनच्या काळात त्याची सर्वाधिक गरज भासली. त्यामुळे या वेळच्या सर्वच डिझाइन्सचा ओढा प्रॅक्टिकल, कम्फर्टेबल आणि वेअरेबल डिझाइन्सकडे असणार हे मात्र निश्चित!
करोना काळातील वर्च्युअल शोजनंतर या वर्षी मार्चमध्ये दिल्लीत पहिल्यांदा लॅक्मे फॅशन वीक प्रत्यक्षात आयोजित करण्यात आला होता. आता मुंबईतले त्याचे नवे पर्वही त्याच उत्साहात जिओ वल्र्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झालं आहे.
viva@expressindia.com