राधिका कुंटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माझे पालक ऐंशीच्या दशकात अमेरिकेत आले. माझा जन्म इथे झाला. मी इथेच वाढले, मोठी झाले. खरं तर मिलिटरीमध्ये जावं, असं ध्येय ठरवलं नव्हतं. किंडरगार्डन ते बारावीपर्यंत शिकल्यानंतर ‘द युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’मध्ये ‘बॅचलर ऑफ सायन्स’ या विद्याशाखेत ‘ब्रेन, बिहेविअर अ‍ॅण्ड कॉग्निटिव्ह सायन्स’ या विषयात पदवी मिळवली. चार वर्ष अंडरग्रॅज्युएट कॉलेजमध्ये अभ्यास करताना मनाशी ठरवलं होतं की, आपण वकील होण्यासाठी लॉ स्कूलमध्ये जावं. त्यासाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवावे लागले. अमेरिकेतील शिक्षण पद्धत अशीच आहे. इथे  वकिली पदवीला ज्युरिस डॉक्टर (JD) असं म्हटलं जातं. मी वॉशिंग्टन डीसीमधल्या ‘द जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूल’मधून JD झाले. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या काळात मिलिटरी लॉयर (लष्करी वकील) या करिअरची तोंडओळख झाली.

तोपर्यंत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉसारख्या कायद्याशिवाय आणि एकस्वहक्क (protecting patents), स्वामित्वहक्क (कॉपी राइट) या आणि अशा तऱ्हेच्या कायद्यांविषयी अभ्यास केला होता. पण मी मिलिटरी कायद्याबद्दलही शिकले; तेव्हा त्यात अधिक रस वाटू लागला. त्यामुळे मी याच क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आणि सुदैवानं माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला. आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं, अशी अनेकदा बहुसंख्य पालकांची अपेक्षा असते. पण माझे आई-बाबा याला अपवाद ठरले. मी वकील व्हायचं ठरवल्यावर त्यांनी काहीच हरकत घेतली नाही. उलट माझ्या निर्णयाचा आदर करत माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. असं निर्णयस्वातंत्र्य मिळणं, ठाम पाठिंबा मिळणं हे फार कमी जणांच्या वाटय़ाला येतं.

अमेरिकन मिलिटरीमध्ये विशेषज्ञ वकिलांची नेमणूक केली जाते. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठीही विशेषज्ञ वकील असतात. हे मिलिटरी विशेषज्ञ वकील काय करतात? तर उदाहरणार्थ – एखाद्या मोठय़ा कंपनीतील सीईओला त्यांचा कॉर्पोरेट अ‍ॅटर्नी जनरल काऊन्सिल सल्ला देतो, तसाच मिलिटरी कायदेविषयक सल्ला आम्ही मिलिटरी हाय कमांडला देतो. मिलिटरीची स्वत:ची अशी एक सिस्टीम आणि स्वत:चे काही कायदे असतात, जे सामान्यांच्या कायद्यांहून भिन्न असतात.  Military JAG ( Judge Advocate General)  Lawyer अर्थात माझ्यासारखे काही जण या विषयाचे कायदेतज्ज्ञ असतात.

अमेरिकन मिलिटरीमध्ये वकील म्हणून काम करायचं असेल तर अमेरिकन नागरिकत्व असणं गरजेचं आहे. मी लॉ स्कूलमध्ये असताना अनेक परदेशी लॉयर्स इन जनरल पाहिले होते. तसंच बरेच भारतीय, अमेरिकन कायदेप्रणाली जाणून घेण्यासाठी इथे मास्टर्स इन लॉ करत होते. काही जण इथे राहून प्रॅक्टिस करतात आणि काही जण भारतात परतून तिथे प्रॅक्टिस करतात. प्रत्येक देशाची म्हणून एक कायदेप्रणाली असते. नीतीनियम आणि तत्त्वं असतात. अमेरिकेतल्या एखाद्या वकिलाने भारतात प्रॅक्टिस करायची म्हटली तर त्याने रीतसर भारतातील कायदा शिकायला हवा. त्यामुळे अमेरिकेत जे विद्यार्थी एलएलएम होतात, ते अमेरिकेतच प्रॅक्टिस करू इच्छितात किंवा अमेरिकेतील परदेशी कंपन्यांसाठी ते काम करतात. या क्षेत्रामध्ये मुलींचं प्रमाण साधारणपणे समसमान असून मिलिटरी वकिलांमध्ये मात्र पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. या पदापर्यंत पोहचताना दीर्घ काळ केलेल्या मेहनतीचा आणि अविरत कष्टांचा प्रवास अजूनही आत्ताच घडल्यासारखा वाटतो आहे. लॉ स्कूलमध्ये  military JAG प्रोग्रामसाठी अर्ज करताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर काही गोष्टी अपरिहार्य असतात. आम्हाला मिलिटरीमध्ये बेसिक ऑफिसर ट्रेनिंग दिलं जातं.

शिवाय नेव्हल जस्टिस स्कूलमध्ये आम्हाला मिलिटरीशी निगडित कायदे शिकवले जातात. सध्या मी अमेरिकन नेव्हीमध्ये  JAG कॉर्प्समध्ये लेफ्टनंट कमांडर या पदावर कार्यरत आहे. लॉ स्कूलच्या दुसऱ्या वर्षांला असताना मी यूएस नेव्हीच्या  JAG CORPS मध्ये रुजू झाले. लॉ स्कूलनंतर मी पेनिसिल्व्हेनिया राज्यातील वकिलीच्या संदर्भातील परीक्षा दिली आणि पहिल्याच झटक्यात पास झाले. कारण अमेरिकेत वकिली करण्यासाठी ही परीक्षा देणं आणि कायद्याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. ही परीक्षा पास झाल्यावर मी यू. एस. नेव्ही ऑफिसर डेव्हलपमेंट स्कूलमध्ये (ODS) पाच आठवडे होते. त्यानंतर नेव्हल जस्टिस स्कूल (NJS)मध्ये अडीच महिने गेले. तिथे लष्कराशी संबंधित कायदे-नियमांचा अभ्यास केला.

त्यानंतर अवघ्या पंचविसाव्या वर्षी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डिएगो शहरात पहिल्यावहिल्या डय़ुटीवर रुजू झाले. मला कॉर्पोरेट लॉयर म्हणून संधी मिळू शकली असती, पण देशप्रेमी असल्याने मी नेव्हीमध्ये वकील म्हणून जायचा निर्णय अगदी विचारपूर्वक घेतला. नौदलातील कामाच्या स्वरूपामुळे मला जवळपास जगभरात प्रवास करायची संधी मिळाली. सध्या मी काम करता करताच ‘द युनायटेड स्टेस्टस नेव्हल वॉर कॉलेज’मधून मास्टर ऑफ आर्टस् – डिफेन्स अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा सहा वर्षांचा अभ्यासक्रम शिकते आहे. २०२३ मध्ये तो पूर्ण होईल. माझं रोजचं ऑफिसचं काम झाल्यानंतर संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात हा तीन तासांचा कोअर क्लास आठवडय़ातून एकदा असतो. त्यातले दोन कोर्स मी कोव्हिडच्या काळात ऑनलाइन पूर्ण केले. मिलिटरीचा इतिहास आणि धोरणं, संयुक्त सागरी कवायती, विविध दलांचं एकत्रित कामकाज कसं चालतं आदी विषय यात अभ्यासले. विविध पातळय़ांवर होणारे धोरणात्मक निर्णय महत्त्वाच्या काळात कसे घेतले गेले, याचाही अभ्यास केला. कोअर क्लासमध्ये विषयानुसार असाइन्मेंट दिल्या जातात. काही असाइन्मेंटमध्ये अमेरिकन मिलिटरीच्या इतिहासातील त्या त्या काळातील ध्येयधोरणांचं, निर्णयांचं विश्लेषण करायचं असतं. तर काही असाइन्मेंटमध्ये राष्ट्रीय सुरक्षेतील आव्हानांवर संशोधन करून त्यावर लिहायचं असतं. काही वेळा आम्ही ग्रुपने मिळून आणीबाणीच्या वेळी मिलिटरी अधिकारी कसेकसे निर्णय घेतात, धोरणात्मकदृष्टय़ा काय पावलं उचलतात याचा अभ्यास करतो. 

मी होमलँड सिक्युरिटी हा विषय निवडला आहे. काही प्रश्न हे मिलिटरीच्या आवाक्यात येत नाही. त्यापैकी एक अमेरिकेतील स्थानिक प्रभागीय सुरक्षा हा विषय केंद्रीभूत आहे. या ऑनलाइन कोर्समधल्या प्रत्येक क्लासचे तीन पेपर पूर्ण झाले आहेत. या अभ्यासवर्गामुळे मला नागरी स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांतील समतोल आणि प्रसंगी अतिरेकी टोकाच्या भूमिका असणाऱ्या अनेक प्रश्नांची माहिती मिळाली. माझ्या रोजच्या डय़ुटीशी या अभ्यासक्रमाचा थेट संबंध नाही. पण त्यामुळे मिलिटरी लॉयर म्हणून मला मिलिटरीचं कामकाज आणि वैविध्यपूर्ण धोरणात्मक निर्णय यांविषयी सखोल माहिती कळते आहे. ती कळल्याने मिलिटरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वकिली सल्ला देताना, त्यांच्या निर्णयात मदत करताना या सखोल अभ्यासाचा मला नक्कीच उपयोग होईल. एरवी मिलिटरीमधल्या अधिकाऱ्यांना मिलिटरीच्या ध्येयधोरणांची माहिती त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान होते. पुढे नोकरीत असतानाही ती प्रसंगोत्पात वेळोवेळी होते, पण एक वकील म्हणून मला ती कशी माहिती असेल? म्हणूनच मी संशोधन आणि वाचन करून या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम निवडला आहे.

खरंतर कायद्याची पदवी मिळवून आणि नौदलात रुजू होऊन आता जवळपास दहा वर्ष झाली आहेत. काम आणि घर या आघाडय़ा सांभाळताना तारेवरची कसरत होते आणि अभ्यासाला फारसा वेळ मिळत नाही. पण तरीही माझी कौशल्ये अधिकाधिक वाढवण्यासाठी मला शिकायचं आहे. त्यासाठी लागतील तितके कष्ट करत, सगळे अडथळे पार करून अभ्यास करायचा आहे. माझे वरिष्ठ स्वभावाने फार चांगले आहेत. माझ्या दोन लहान मुलांची शाळा वगैरे मुद्दे लक्षात घेऊन त्यांनी मला प्रसंगानुरूप वर्क फ्रॉम होमची सवलत दिली आहे.

विज्ञानशाखेची विद्यार्थिनी वकिलीकडे कशी काय वळली, हा प्रश्न अनेकांना, विशेषत: भारतीयांना पडतो. मला आठवतं आहे की, महाविद्यालयात असताना एका उन्हाळी सुट्टीत मी मुंबईतील एका लॉ फर्ममध्ये काम करत होते, तेव्हाही तिथल्या लोकांना ही गोष्ट विचित्र, वेगळी वाटली होती. पण अमेरिकन शिक्षणपद्धतीनुसार ते योग्यच आहे. इथे किमान पदवी (महाविद्यालयाची ४ वर्ष) मिळाल्यानंतरच लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेता येतो. मला विज्ञानशाखेत रस असल्याने मी त्यात अंडरग्रॅज्युएट कॉलेजची (Bachelor of Science) पदवी मिळवली आणि मग लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मुंबईतील त्या फर्ममध्ये महिन्याभराच्या काळात भारतीय संविधानातील तत्त्व आणि कायद्यांशी माझी तोंडओळख झाली होती.

काही वेळा काही गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या जातात.. त्यातली एक म्हणजे ऑगस्ट २०२२ मध्ये मला Navy Recipient of the 2022 हा अमेरिकन बार असोसिएशनचा Outstanding Young  Military Lawyer Award मिळाला. तो माझ्या आयुष्यातला एक खूपच छान क्षण होता. शिकागोमध्ये थ्री स्टार अ‍ॅडमिरलच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं, हा एक मोठा बहुमान होता. साहजिकच त्या क्षणी घरच्यांना माझा फार अभिमान वाटला. या पुरस्कारासाठी माझं नामांकन झाल्याचं त्यांना माहिती नसल्याने माझ्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि अर्थातच आनंद वाटला. साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी आमची बदली होते. तशी माझी वर्षभरासाठी बहरीनला बदली झाली होती. तिथे मला एअरक्राफ्ट कॅरिअरमधल्या प्लेनमध्ये बसण्याची संधी मिळाली. जवळपास पाच दिवस मी एअरक्राफ्ट कॅरिअरवर होते आणि त्यातूनच घरी परतले. साहजिकच ही आठवण कायम लक्षात राहण्यासारखी आहे. अशा अनेक बहारदार आठवणी आहेत, किती सांगाव्यात..

आणखी एक आठवण म्हणजे एकदा मला हेलिकॉप्टर उडवायची संधी मिळाली होती. अर्थात या सगळय़ा गोष्टी मिलिटरीमध्ये असल्याने शक्य झाल्या. सध्या मी  Assistant General Counsel /  Ethics Attorney AFd¯F  Deputy Staff Judge Advocate,  Deputy Chief of Naval Operations for Information Warfare /  Director of Naval Intelligence,  USA  या पदांवर कार्यरत आहे. अनुपालन (compliance) आणि नीतीप्रणाली कशी असावी, याविषयी काही कायदे आमच्याकडे करण्यात आले असून लोक त्यानुसार नीतिमत्तेनं वागत आहेत का, हे मी पाहते. मी उच्चपदस्थ नौदल अधिकाऱ्यांसह सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांना नीतितत्त्वांसंदर्भात सल्ला देते. तंदुरुस्त असणं, हा मिलिटरी अधिकाऱ्यांच्या जीवनशैलीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी पुशअप्स, पुलअप्स, सिटअप्स आणि काही कार्डिओ अ‍ॅक्टिव्हिटीज असतात. अगदी लहानपणापासूनच मी पोहण्याच्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचे, त्यामुळे साहजिकच पोहण्यात सातत्य राखलं आहे, त्याचा फायदा होतो. इथलं वर्क कल्चर चांगलं आहे. वरिष्ठांनी मला आवश्यकतेनुसार घरून काम करायची मुभा दिली आहे. तुम्ही स्त्री-पुरुष आहात किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे या मुद्दय़ांमुळे इथल्या कार्यालयीन कामकाजात काडीमात्र फरक पडत नाही.

माझी पदवी  Juris Doctor ( Doctor of Law) अशी आहे. त्यानंतर पीएचडी करायची गरज नाही. मात्र मास्टर ऑफ लॉ-एलएलएम पुढच्या वर्षी करायचा माझा बेत आहे, बघू कसं जमतं ते. येत्या काही वर्षांत Environmental Law मध्ये विशेषज्ज्ञ व्हावं, असा विचार करते आहे. मला करिअरमध्ये बऱ्याच कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, असं नाही. पण सध्या शिक्षण आणि काम या दोन्ही गोष्टींचा मेळ घालताना बऱ्याचदा थकायला होतं. एकेकदा वाटतं की, आता मला तिसरी पदवी / आणखी शिक्षण नकोच. दोन पदव्या आहेत, त्या पुरेशा आहेत की ‘पण मग वाटतं की, आता इथवर येऊन पोहोचले आहे, इतकी मेहनत घेतली आहे तर इतका टोकाचा विचार कशाला?’ मग तो विचार बाजूला सारून नव्या जोमाने अभ्यासाला लागते. अभ्यास आणि कामाखेरीज कुटुंबासोबतचा वेळही तितकाच महत्त्वाचा. माझ्या दोन छोटय़ा मुलांसोबत वेळ घालवते. त्यांची काळजी घेते. अर्थात कोव्हिडच्या काळात या सगळय़ा गोष्टी करणं थोडं अवघड गेलं. मी योगासनं करायला जात असे तो स्टुडिओ बंद झाला होता. मग पोहणं आवडत असल्याने ते सुरू ठेवलं. आता पुन्हा स्टुडिओत जाऊन योगासनं करायला सुरुवात केली आहे. बेकिंग करणं आवडत असल्यानं विविध प्रकारच्या कुकीज आणि केक करते. या सगळय़ा धावपळीत दिवस कसा सरतो ते कळतही नाही. पण सकाळी केलेल्या कामाच्या यादीवर रात्री झोपताना ते काम, ती गोष्ट पूर्ण झाल्याची खूण करताना मिळणारं समाधान साऱ्या धावपळीचं चीज करणारं असतं. या पुढच्या गोष्टी अशाच नेटानं,सगळय़ांच्या साहाय्यानं करेन आणि ठरवलेल्या साध्याकडं वाटचाल करेन याविषयी मनात ठाम विश्वासआहे.