चित्र काढण्याची तेजलला लहानपणापासून आवड. त्यामुळं तिनं आपण अॅनिमेशन करावं का, असा विचार केला नि ते तिला जमलंदेखील. चित्रकलेची आवड असली तरी तिनं शाळेतल्या एलिमेंट्री-इंटरमिजिएट वगरे परीक्षा दिल्या नाहीत. आपल्याला ड्रॉइंगची आवड आहे नि आपण ते ट्राय करतोय, एवढंच तिनं ध्यानात ठेवलं. तिला कार्टून काढण्याची आवड होतीच. पुढं सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं कार्टून्स काढताना ती अधिकच आवडायला लागली. तिच्या ताई नि भावालाही चित्रकलेची आवड होती, त्याचा इम्पॅक्ट तेजलवर झाला असावा. या भावंडांना शिक्षणासाठी आईनं सतत प्रोत्साहन नि पािठबा दिला.
तेजल ‘गुरुनानक खालसा कॉलेज ’मध्ये टी.वाय.बी.ए. शिकत्येय. तिनं मराठी विषय घेतलाय. पुढं त्यात कॉरसपॉण्डन्स एम.ए. करायचा तिचा विचार आहे. ती मूळची रायगड जिल्ह्यातली. सुवर्ण गणेशामुळं प्रसिद्ध पावलेल्या दिवेआगारमध्ये तिचं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं. पुढं मुंबईला मामाकडं राहून गिरगावच्या ‘चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल’मधून दहावी झाली. नंतर ‘खालसा कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. ‘मराठी घेऊन पुढं करिअर कसं काय करणार ?’ अशा खवचट प्रश्नांना तिला सामोरं जावं लागलं. ती म्हणते की, ‘मुळात मला मराठी विषयाची आवड आहे. ती आपली मायबोली आहे. पुढं मी ज्या क्षेत्रात जाणारेय, तिथं क्रिएटिव्हिटीला प्रचंड वाव आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासामुळं या क्रिएटिव्हिटीला अधिक चालना मिळाली नि मिळत्येय. ‘तिला ट्रेकिंगची, घरच्यांसोबत प्रवास करायची आवड आहे. काम करता करता एकीकडं गाणी ऐकायला तिला फार आवडतात.
परळच्या ‘इमेज इन्स्टिटय़ूट’मध्ये तिनं ‘डिप्लोमा इन अॅनिमेशन’ केलाय. एस.वाय.बी.ए.पासून चालू असलेला हा कोर्स या डिसेंबरमध्ये संपलाय. अॅनिमेशनमध्ये ती ग्राफिकपासून ते थ्री डीपर्यंत सगळं शिकल्येय. पुढं ती ‘माया’ वगरे अॅडव्हान्स सॉफ्टवेअर शिकणारेय. बोलता बोलता तेजल अॅनिमेशनशी निगडित काही गोष्टी सांगून जाते. ती म्हणते की, ‘अॅनिमेशन म्हणजे काही फक्त कार्टून असं नसतं. तर एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये जीव फुंकणं म्हणजे अॅनिमेशन. त्यात हालचाल, भावनांचा समावेश असतो. यात काम करताना निरीक्षणशक्ती अतिशय महत्त्वाची ठरते. म्हणून भोवतालच्या हालचालींकडे बारकाईनं पाहण्याची सवय लावून घ्यावी लागते.’
तेजलचं कॉलेज सकाळचं नि कोर्स संध्याकाळचा होता. कॉलेजमधून दुपारी घरी आल्यावर ती काम आणि प्रॅक्टिस करायची. कारण अॅनिमेशनसाठी सतत प्रॅक्टिस करणं अत्यंत आवश्यक असतं. मग इन्स्टिटय़ूटमध्ये जायचं. इन्स्टिटय़ूटमधून घरी आल्यावर कॉलेजचा अभ्यास करायचा, असं तिचं एवढय़ा दिवसांचं शेडय़ुल होतं. ती आणि तिची ताई आणखी एकीसोबत रूम शेअर करतात. त्या जेवणखाण घरीच करतात. शिवाय घरातली मॅनेजमेंटही त्यांना करावी लागते. घरच्या आठवणीनं तेजल थोडीशी भावुक होते. ती म्हणते की, ‘ताई आईसारखीच माझी काळजी घेते आहे. ती मला सतत प्रोत्साहन देते. तीही सॉलिड क्रिएटिव्ह आहे. मला कितीतरी आयडियाज् देत असते. हां, क्वचित कधी आजारी पडले तर आत्ता आई जवळ हवी होती, असं वाटतं. पण ते शक्य नसतं. पण ताई असते. तिचा मायेचा हात डोक्यावरून फिरल्यावर खूप बरं वाटतं..’
तिच्या गावात पर्यटन व्यवसाय जम धरतोय. त्या अनुषंगानं अनेकांनी पर्यटकांसाठी रिसॉर्टस् बांधल्येत. त्यापकी काहींनी गावातलीच ओळखीची मुलगी म्हणून तेजलकडं व्हिजिटिंग कार्ड्स करण्याचं काम सोपवलं. तिनंही कल्पकपणं त्यांचा विश्वास सार्थ ठरवत तीन जणांना आकर्षक व्हिजिटिंग कार्ड्स तयार करून दिल्येत. तिला आठवतंय की, इन्स्टिटय़ूटमध्ये शिकताना एकदा बसचं मॉडेल तयार करायला सांगितलं होतं. मग बसच्या टायरपासून तिच्या काचांपर्यंत सगळ्या बेसिक गोष्टींचं निरीक्षण कसं करायचं ते शिकवलं गेलं. हे सगळं लक्षात ठेवलं तर चांगलं काम करता येईल, हे लक्षात राहिलं. पुढं तिला ग्राफिक डिझायनर व्हायचंय.
एप्रिलपासून तेजलची टीवायची परीक्षा सुरू होणारेय. तिचा अभ्यास बऱ्यापकी झालाय. त्याचं क्रेडिट ती कॉलेजमधल्या प्रोफेसर्सना देते. बोलता बोलता एक आठवण सांगते की, ‘कॉलेजमधल्या एक्स्टेन्शन वर्कमध्ये (Extension work) मी भाग घेतला होता. त्याचे १० मार्क मिळतात. या उपक्रमांतर्गत काम करणाऱ्या एसएम अर्थात स्टुडंट मॅनेजरला विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आखणं, त्यांच्या प्रोजक्ट्सच्या फाईल्स करणं अशी अनेक कामं करावी लागतात. या सगळ्या अॅक्टिव्हिटीदरम्यानच माझी कॉलेज आणि इन्स्टिटय़ूटचीही परीक्षा होती. आता हे कसं निभावणार, या विचारानं मी थोडी भांबावून गेले होते. पण सगळ्यांनी धीर दिला. सहभागी विद्यार्थ्यांची मीटिंग घेऊन त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांनीही चांगला सपोर्ट केला. प्रोफेसर्सनी वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केलं नि अखेरीस ते काम चांगलं झालं.’
तेजलच्या इन्स्टिटय़ूटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं इंटीरिअर तयार करायला सांगतात. प्रत्येकानं वेगळं करायचं. माझ्या आजूबाजूचे चांगलं करायचे, तेव्हा तिला वाटायचं आपल्याला असं का येत नाही? अर्थात या विचारानं कुढत न बसता, तिनं सातत्यानं प्रयत्न केला. आपण चांगला आऊटपुट देण्याचा निश्चय केला होता. ‘इथं शिकलेल्या सॉफ्टवेअर्सची िलक बऱ्याचदा आपण जे बघतो, अनुभवतो, त्याच्याशी कळत-नकळत जोडली जाते. मध्यंतरी मी ‘मक्खी’ चित्रपट पाहिल्यावर ‘मक्खी’च्या कॅरॅक्टरसाठी कोणकोणतं सॉफ्टवेअर वापरलं गेलं असेल, ते चटकन जाणवत गेलं..‘बोलता बोलता तेजल पुन्हा कामाकडं वळते. पुन्हा ‘सर्जना’च्या विंडोंज ओपन होतात.. कर्सर आपलं काम करू लागतो.. ती सांगते की, ‘एखादं कॅरॅक्टर क्रिएटर करायचं असेल तर ते कोणत्या प्रकारात तयार करायचं, ते बघावं लागतं.. त्यानुसार प्रोसेस करून फाईल्स तयार करायच्या. मग टूल बॉक्सचा वापर करून ते तयार करायचं..’ बघता बघता पुन्हा एक छान अॅनिमेशन तयार होत होतं.. या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी जिद्द, चिकाटी नि मेहनतीची तयारी तेजलमध्ये आहेच. तिच्यातली सर्जनशीलता अधिकाधिक बहरण्यासाठी ऑल द बेस्ट!..
लर्न अॅण्ड अर्न : बोलक्या रेषा..
‘जरा बस हं.. एवढं हातातलं काम पूर्ण करते..‘ तिच्या पीसीवर बऱ्याच विंवडोज ओपन होत्या. पटापटा कर्सर हलवत ती झपाझप हात चालवीत होती. वेगवेगळ्या टूल्सचा वापर करीत होती. एकीकडं चालू असलेल्या मंद आवाजात गाणी लावलेली होती.. बघता बघता तिचं काम पूर्ण झालं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-03-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn and earn tejal thosar a graphic designer animator and a student