हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘सुट्टी’! हा शब्द ऐकूनच कसं एकदम रिलॅक्स वाटतं.. ‘सुटी म्हणजे आराम, सुटी म्हणजे नो काम. सुटी म्हणजे जस्ट फन, नॉट येट डन..’ हेऽऽऽ हेऽऽऽ बघा, डोकं कसलं भन्नाट चालायला लागलंय.. हा सुट्टीचा फीव्हरच असा जबरदस्त असतो ना, की त्यानं काय होईल नि काय नाही ते सांगता येत नाही. तर हा आहे सुट्टीचा मोसम. बऱ्याच जणांच्या परीक्षा संपल्यात. काहींच्या संपायच्या बेतात आहेत. काहींचा अभ्यास मात्र २४ x ७ चालूच असतो, त्यांच्या नादाला आपण लागायचंच नाहीये. मग या सुट्टीत काय प्लॅन्स आहेत तुमचे?
खरं तर अभ्यास करून थकल्याभागल्या जिवांना विरंगुळा म्हणून ढीगभर झोप, भरपूर खाणं-पिणं, मनसोक्त खेळणं, वाटेल तसं हुंदडणंही हवं असतं. आऊटिंगला जाणं, मुव्हीज बघणं, सोशल साइट्सवर पडीक असणं या उद्योगांना तर आताशा सुटीचीही गरज लागत नाही. त्यामुळं अलीकडं ‘सुटीच्या प्लॅनिंगच्या गोष्टी’त थोडासा ट्विस्ट आलाय. सुटीत करिअरला उपयुक्त ठरतील अशा अॅक्टिव्हिटिज करायला प्राधान्य दिलं जातंय. मग ती इंटर्नशिप असो, फ्रिलािन्सग असो किंवा स्पर्धात्मक संशोधन असो किंवा इव्हेंटचं आयोजन असो.. सध्या निवडणुकांच्या प्रचाराच्या कामांत सहभागी होत काही जण पॉकेटमनी मिळवताहेत. कुणी आपापल्या छंदांना वेळ देताहेत, तर काही त्या छंदांचं रूपांतर व्यवसायात करताहेत. कुणी पर्यावरणाच्या संवर्धनात गुंतलंय, तर काही जणांची सर्जनशीलता त्यांच्या कलांतून प्रगट होत्येय. मग ते शब्द असतील, सूर असतील, संवाद साधण्याचं कसब असेल.. या सगळ्यांतून उलगडतो तो सुट्टीचा प्रत्येकानं आपापल्या परीनं लावलेला अर्थ.
आपापल्या सुट्टीचं प्लॅनिंग काही जणांनी ‘व्हिवा’शी शेअर केलंय.
आपण वर्षभर रुटिन वर्क करतोच, त्यापेक्षा सुटीत काही तरी वेगळं काम करावं, असं मला वाटतं. त्यानुसार ‘आविष्कार’च्या रीसर्च प्रोजेक्टवर आमची सहा जणांची टीम या सुट्टीभर काम करणार आहोत. हे काम जूनपर्यंत चालणार असून आमची ऑगस्टमध्ये कॉम्पिटिशन आहे. या रीसर्चला प्रेफरन्स देत फक्त रविवारच्या सुट्टीच्या दिवशी फॅमिली नि फ्रेण्ड्सबरोबर आऊटिंगला जाऊन एन्जॉय करणार आहे. आमचा ग्रुप ‘२ स्टेट्स’ पाहायला जाणारेय. वाचनाची आवड असल्यानं खूप पुस्तकं वाचत्येय. कविता वाचायला आवडतात नि स्वत: कविता करतेही.
सुटी म्हणजे माझ्या लेखी जास्तीत जास्त मित्रमंडळींना भेटण्याची एक संधी. बिझी शेडय़ूलमधून वेळ काढून आम्ही वेगवेगळ्या ग्रुप्समधले मित्र सुट्टीतल्या वीकेण्डला भेटतोच. कॉलेजमधली आमची टीम पुढल्या महिन्यात एक इव्हेंट आयोजित करणारेय. इव्हेंटच्या फायनन्ससाठीची बोलणी चालू आहेत. प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. हा रॉक बॅण्डसारखा इव्हेंट केवळ तरुणाईपुरता मर्यादित न राहता सगळ्यांना आवडावा, असा आमचा प्रयत्न आहे. केवळ मनोरंजनावरच भर न देता त्यात सामाजिक प्रश्नांचीही दखल घेतली जाणार आहे. या इव्हेंटनंतर मला इगतपुरीला मेडिटेशनसाठी जायचंय.
सुट्टी म्हणजे स्वत:चा असा क्रिएटिव्ह टाइम.. या काळाचा सकारात्मकतेनं उपयोग करायला हवा.
बारावीच्या अभ्यासामुळं माझं हेल्थकडं थोडं दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळं मी आता फिटनेसकडं लक्ष देणार असून जॉिगग, एक्सरसाइज करायला सुरुवात केल्येय. बाइक चालवायची आवड असल्यानं ती शिकत्येय. बीएमएमच्या एन्ट्रन्स एक्झामचा अभ्यास करत्येय. मुलांचे इंग्लिश ग्रामरचे क्लास घ्यायचा विचार आहे. मत्रिणींसोबत सुट्टी एन्जॉय करणं, लिखाण, पेंटिंग करणं चालूच आहे. अकरावी-बारावीत शिकल्यामुळं फ्रेंच भाषेची आवड निर्माण झाल्यानं फ्रेंच शिकून त्या परीक्षा द्यायचं मनात आहे.
मी फ्रीलान्स म्युझिशियन आहे. अभ्यासामुळं पेंिडग राहिलेली म्युझिकची कामं मी सुट्टीत करतोय. ‘नाइन एक्स झकास’साठी ‘लई भारी’ ही जिंगल मी नुकतीच केल्येय. त्याखेरीज काही जिंगल्स नि अल्बमचं काम चालू आहे. मी प्रायोगिक नाटकं, चित्रपट, कॉन्सर्ट्स पाहतोय. परफॉर्मिंग आर्टशी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायला मला आवडतात. घरी बसून मी अनेक क्लासिक वर्ल्ड मुव्हीज बघतोय. वाचनाची प्रचंड आवड आहे. सुरेश भट माझे आवडते कवी. ‘वपुर्झा’ पुस्तक मी बायबलसारखं वाचतो. आधी काही ठरलेलं नसतं, सुट्टी पडल्यावर आपोआप प्लॅन्स ठरत जातात. सुट्टी म्हणजे वर्षभराची तयारी. त्यात आपल्याला चांगलं काही करायला-शिकायला वेळ मिळतो. एक प्रकारची अॅप्टिटय़ूड टेस्टच जणू.
सुट्टी म्हणजे आपल्यासाठी विविध अनुभवांतून सतत काही तरी शिकत राहण्याची संधी असते.
सुट्टीत रिकामं राहायला मला अजिबात आवडत नाही. मी नि माझी मत्रीण अक्षया नाईकनं मिळून पब्लिक रिलेशन्सचं काम करणं सुरू केलंय. मी एका ‘पीआर’ कंपनीत इंटर्नशिप करतेय. नुकतंच आम्ही ‘मी मुलुंडकर’ या पहिल्यावहिल्या इव्हेंटचं ‘पीआर’ केलंय. आता यंदा ‘टीवाय’च्या वर्षांत किमान पाच इव्हेंटस् कव्हर करायचा आमचा प्लॅन आहे. या सगळ्या कामाचा अनुभव पुढं उपयोगी पडेल. त्याखेरीज मी माझी नेलआर्टची आवड जोपासत्येय. फॅमिलीसोबत गोव्याला आऊटिंगला जाणार आहे.
या सुट्टीत मला स्वििमग नि डान्स क्लास जॉइन करायचाय. ड्रॉइंगच्या परीक्षा द्यायच्यात. शाळेतल्या मत्रिणींसोबत मरीन ड्राइव्हला फिरायला जायचंय. मला नॉव्हेल्स वाचायला खूप आवडतात. त्यामुळं मी ती टॅबवर डाऊनलोड करते किंवा मत्रिणींकडून आणून वाचते. सोसायटीतल्या ग्रुपसोबत बॅडिमटन खेळते नि सायकिलग करते. आम्ही ‘२ स्टेटस्’ पाहायला जाणार आहोत. आता कॉमर्स घ्यायचं की आर्टस्, त्यातले विषय, त्यातले करिअर ऑप्शन्स कोणते असतील हा डिसिजन घेण्यासाठी मी नेटवर सर्च करून नीट विचार करणार आहे. माझ्यासाठी ही सुट्टी फन नि एन्जॉयमेंटसोबतच करिअरचा एक टप्पा ठरणार आहे.