तिने एक स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी ती धडपडली आणि ते स्वप्न तिने प्रत्यक्षातही उतरवलं. केवळ दागिने घडवण्यापलीकडे जाऊन सौंदर्यविचार आणि सामाजिक कामाची सांगड घालत ‘आत्मन’ हा दागिन्यांचा ब्रँण्ड सुरू करणारी ही ‘कल्ला’कार आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अस्मिता जावडेकर!
ती मूळची पुणेकर. इंजिनिअर झाल्यावर ती घरच्या व्यवसायात उतरली खरी, पण अंगभूत कलात्मकता आणि दागदागिन्यांची आवड तिला स्वस्थ बसू देईना. शिवाय आईकडून खानदानी व दुर्मिळ रत्नांची पारख करण्याची दृष्टी तिला मिळाली होती. मग या संदर्भात सखोल विचार करून तिने एक ज्वेलरी ब्रँण्ड सुरू करायचं ठरवलं आणि अस्मिता जावडेकर यांच्या ‘आत्मन’ ब्रँडचा जन्म झाला. दागिने हा अनेकींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ते खरेदी करणं आणि ते घालून मिरवण्याची हौस अनेकींना असते. प्रत्येकीच्या मनानुसार, मागणीनुसार त्या दागिन्याला कल्पकतेनं आणि आत्मीयतेनं घडवल्यावर तर तो दागिना अनेकींची मनं जिंकतो. ‘आत्मन’नं हेच करून दाखवलं. ‘आत्मन’बद्दल अस्मिता सांगते की, ‘आत्मन हा मूळचा संस्कृत शब्द आहे. ‘आत्मन’ म्हणजे सोल किंवा आत्मा. ‘आत्मन’ म्हणजे एका प्रकारचा अभिजातपणा, सुरेखपणा, प्रमाणबद्धता. परंपरा आणि नवतेचा मेळ साधताना या शब्दाचे अर्थ सांगणारे सगळे गुण आमच्या दागिन्यांमध्ये उतरतील अशा पध्दतीने त्याची घडण केली जाते म्हणूनच ‘आत्मन’ हा शब्द मी आमच्या ब्रँण्डसाठी निवडला’.
‘आत्मन’च्या ज्वेलरी कलेक्शनचा श्रीगणेशा अगदीच छोटेखानी स्वरूपात एका सोशल मीडियावर त्याचे पेज तयार करून झाला. अस्मितानं डिझाईन केलेल्या दागिन्यांना त्यावेळी खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुढे ‘आत्मन‘ने मागे वळून पाहिलंच नाही. प्रतिसाद वाढत गेला तसं ते एक पेज ‘आत्मन’च्या वेबसाईटमध्ये रुपांतरित झालं. परंपरेचा वसा जपत आणि त्याला कल्पकतेची जोड देत हे दागिने सादर करताना त्यांच्या घडणीतही वर्तमानाचं भान ठेवलं गेलं. दागिन्यांच्या डिझाईनमधलं हे वेगळेपण अनेकींना भावलं. केवळ पुणे-मुंबईच नव्हे तर बंगलोर, दिल्ली, कोलकत्ता आणि अमेरिका आदी ठिकाणी आत्मनचे दागिने पोहचले. या दागिन्यांचे अनोखे डिझाईन ही आत्मनची ताकद आहे. त्यामुळे त्याचं डिझाईनिंग करताना त्यामागचा विचार महत्वाचा ठरतो. ‘ज्वेलरी डिझायिनग म्हणजे माझ्यासाठी केवळ एक दागिना घडवण्याची कृती नसते. तर तो दागिना बनविताना माझ्या मनाला आणि लोकांना ते डिझाईन किती पटेल, याचा विचार मी नेहमी करते. दागिने विकत घेणाऱ्याला ते केवळ डिझाईन न वाटता त्यात आपलेपण वाटलं पाहिजे. तो दागिना पाहून घालण्याची इच्छा मनात निर्माण झाली पाहिजे, या विचारानेच डिझाईन करत असल्याचं अस्मिताने सांगितलं.
दागिने घडवताना डिझाइनमध्ये नाविन्य आणण्यासाठी आवश्यक ते संशोधन आणि अभ्यास नेहमीच केला जातो. एखादं नवीन डिझाईन हे फार सहजासहजी घडत नाही. एखादं नवीन डिझाईन रेखाटणं हा प्रत्येक वेळी एका नव्या कल्पनेचा जन्म असतो. ती कल्पना लोकांनाही रुचेल आणि भावेल, अशा पद्धतीनं दागिने घडवावे लागतात. हा विचार माझ्यापुरता नाही तर ‘आत्मन’च्या पूर्ण टीमने तो आत्मसात केला आहे आणि त्यानुसार प्रत्यक्षातही आणला आहे. ‘आत्मन’च्या दागिन्यांची नाळ परंपरा आणि सांस्कृतिकतेशी जोडतानाही त्याच्या डिझाईनमध्ये नवनवीन प्रयोग करताना आम्ही वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास केला आणि त्या संशोधनातून वेळोवेळी आमची कलेक्शन्स लाँच झाल्याचं ती सांगते. या प्रयोगात अनुभवी कारागिरांची मोलाची साथ असल्यानेच हे कलेक्शन्स लोकांसमोर आणणं शक्य झाल्याचं सांगायलाही ती विसरत नाही. ‘ट्रॅडिशनल टचेस’,‘मॅजिक ऑफ पर्ल’, ‘आत्मन रेकमेन्डेशन्स’, ‘एव्हरीडे वेअर ज्वेलरी’, ‘फ्युजन’, ‘हॅण्डिक्राफ्ट ज्वेलरी’, ‘हँण्डमेड ट्रायबल ज्वेलरी’, ‘महाराष्ट्रीय हेरिटेज ज्वेलरी’, ‘राजपुताना’ अशी ‘आत्मन’ची प्रसिध्द ज्वेलरी कलेक्शन्स आहेत.
दागिने हा स्त्रियांसाठी फक्त आवडीचा विषय नाही. कधीकधी या दागिन्यांशी त्यांचे भावनिक बंध जुळलेले असतात, याचा एक अविस्मरणीय अनुभव ‘आत्मन’च्या निमित्ताने आल्याचं तिने सांगितलं. कित्येकदा ज्वेलरी कलेक्शन घेतल्यावर काहीजणी आपले फोटो किंवा अभिप्राय आठवणीने शेअर करतात. अनेकजण वेबसाईटवरचे ब्लॉग फॉलो करतात, फोटो पाहतात. पण हा अनुभव वेगळाच होता. रात्री उशिरा मला अननोन नंबरवरून फोन आला. नंबरवरून तो यूएसहून आला होता हे समजलं. मी फोन उचलला. अमृताचा फोन होता. ती म्हणाली, ‘मला सोन्याचा पारंपरिक वजट्रिक घ्यायचा आहे. पाडव्याच्या दिवसापर्यंत तो मिळेल का? वजट्रिक घेण्यासाठी तुमच्याशिवाय मला इतर कोणाचंही नाव सुचलं नाही. मी तिला धन्यवाद म्हटलं आणि तू ऑनलाईन विकत घेशील का?, हेही विचारलं. मात्र त्यावर काही न बोलता तिने त्यामागची तिची भावना उलगडून सांगितली. ‘माझ्या आईला तिचं लग्न झाल्यापासूनच वजट्रिक घेण्याची इच्छा होती. परंतु तेव्हा माझ्या बाबांना ते परवडू शकलं नाही. त्यांनी तिला पाडव्याला वजट्रिक देण्याचं कबुल केलं होतं. मी तुमचं पेज फॉलो करते, तुमचे ब्लॉग वाचते. माझ्या आईसाठी तुम्ही पाडव्यापर्यंत वजट्रिक द्या आणि तो देताना मराठीत काही मेसेज लिहून द्याल का?, अशी विनंती अमृताने केली. त्यावर मेसेज लिहिण्याची जबाबदारी आपण तुझ्या वडिलांवरच सोपवूया, असं मी बोलून गेले. मात्र त्यावर ‘नाही ते मागच्या वर्षी गेले..’, हे अमृताचं उत्तर ऐकताच मी काही क्षण सुन्न झाले. त्यावेळी तिच्या आईला वजट्रिकही दिला आणि ‘कुठेही असलो तरी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. तुला दिसत नसलो तरी आपल्या अमृताच्या रूपाने मी अस्तित्वात असेन’, असा मेसेज मी त्यांच्यासाठी लिहिला. असे अनेक भावनिक क्षण शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचे अनुभव या व्यवसायाने दिले असल्याचं अस्मिता सांगते.
केवळ दागिन्यांची निर्मिती करून ती स्वस्थ बसली नाही. तिचा सामाजिक कामांतला रस आणि त्याविषयीची कळकळही तिने या व्यवसायाला जोडली. बेताची परिस्थिती असणाऱ्या स्त्रियांना स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने सोप्या पद्धतीने दागिने बनविण्याचं प्रशिक्षण तिने दिलं. यातूनच ‘निर्मिती कलेक्शन’चा जन्म झाला. सगळ्यांना परवडेल, अशी किंमत असणारं हे होममेड ज्वेलरी कलेक्शन असून त्याद्वारे ते घडवणाऱ्या या स्त्रियांना मदतीचा छोटासा हात दिला जातो. पुण्यात ‘आत्मन’चा ज्वेलरी स्टुडिओ सुरू झाला आहे. देशात आणि बाहेरही ‘आत्मन’च्या कलेक्शनची प्रदर्शनं भरवली जातात. ‘आत्मन’ला सोशल मिडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. फेसबुक पेजचे १,३५,००० फॅन्स असून ५००० इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स पु. ना. गाडगीळ यांच्या शोरूममध्ये ‘आत्मन फॉर पीएनजी‘ हा हॅन्डक्राफटेड चांदीच्या दागिन्यांचा काउंटर चालू झाला आहे, अशी भरभरून माहिती ती देते.
‘आत्मन’चा व्याप सांभाळता सांभाळता अस्मितानं तिचे छंदही जोपासले आहेत. तिला निर्मितीचा आनंद दागिने घडवताना मिळतो, तसाच आनंद तिला लेखनातही मिळतो. लेख, लघुकथा आणि ब्लॉगच्या माध्यमांतून ती व्यक्त होते. तिने जवळपास पन्नास लघुकथा लिहिल्या आहेत. कामाच्या निमित्ताने आलेले अनेकविध अनुभव, मानवी स्वभावाचे नाना कंगोरे तिनं या लेखनात मांडलेले दिसतात. हे लिखाण मुळातूनच वाचायला हवं. पुण्यातल्या साडी पॅक्ट ग्रुपमध्ये ती आवडीनं सामील होते. तिच्या साड्यांच्या आवडीचं प्रतििबब तिच्या पोर्टवरही दिसतं. ‘आत्मन‘ ब्रँण्डअंतर्गत हातमागाच्या साड्या विकत घेता येतात. Happiness is contagious, let it spread ही ‘आत्मन’ची टॅगलाईन आहे. अनेकींसाठी ती खरी ठरली आहे आणि ठरणारही आहे..
ज्वेलरी डिझायिनग म्हणजे माझ्यासाठी केवळ एक दागिना घडवण्याची कृती नसते. तर तो दागिना बनविताना माझ्या मनाला आणि लोकांना ते डिझाइन किती पटेल, याचा विचार मी नेहमी करते.
– अस्मिता जावडेकर, ज्वेलरी डिझाइनर
viva@expressindia.com