गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपला देश कृषीप्रधान आहे, येथील सर्वाधिक लोक शेती करतात हे अगदीच शालेय पुस्तकांतून आपण अभ्यासले असेल. बहुतांश शहरांत राहणाऱ्या मुलांना भूगोलामधून आपल्या देशातील शेती पिकांचीही माहिती होत असते. पुढे आयुष्यभर शेतीशी संबंध न आल्यामुळे ती माहिती पुस्तकापलीकडे जात नाही. आताच्या पिढीला भूगोल कधी नव्हे इतका सोप्या पद्धतीने यूटय़ूबमुळे शिकविणे सोपे झाले आहे. भूगोलामध्ये दिलेल्या संकल्पना, नद्या- शेतीच्या पद्धती स्वदेशासोबत इतर देशांमध्ये कशा राबविल्या जात आहेत, हे नीट समजावता येऊ शकते. अमेरिका आपल्याला प्रगत देश म्हणून माहिती. भारतातील आत्यंतिक अभ्यास करणाऱ्या, हुशार आणि घराची आर्थिक क्षमता बऱ्या असलेल्या मुलांची ध्येयस्वप्ने अमेरिकेपाशी थांबतात, असे गमतीने म्हटले जाते. इतकी निपुणता अमेरिकेमध्ये दरवर्षी स्थलांतरित होते. देशात ज्ञानाला वाव आणि पुरेसा आर्थिक मोबदला नाही ही गोष्ट त्याला कारणीभूत आहे. हा मुद्दा वादातीत असला, तरी अमेरिका आणि इतर देशांतील लांबलचक शेती आणि त्यातील प्रगत तंत्रज्ञान यांचे व्हिडीओ पाहिले, तर थक्क व्हाल.

पहिला व्हिडीओ आहे ‘डोल’ या अमेरिकेतील शेतमाल कंपनीचा. गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळ नव्वद देशांमध्ये फळांची निर्यात करणारी ही अजस्र कंपनी आहे. कोस्टारिकामधील त्यांच्या केळी शेतीवरचा व्हिडीओ शेतातून माल बाजारात जाण्यापर्यंतच्या प्रक्रियेसह येथे दिसतो. आपल्याकडे या प्रकारे केळीची शेती केली जात नाही. यातील सर्व गोष्टी राबविता येणार नाहीत. तरीही तिकडे कसे होते, हे पाहणे कुतूहल वाढविणारे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नेताना अननस, द्राक्षे, स्ट्रॉबेरीज आणि फळरसाचा उत्तम दर्जा कसा राखला जातो, याची जाणीव या व्हिडीओद्वारे होईल.

दुसरा व्हिडीओ आहे जगभरातील शेतकऱ्यांकडे उत्पादन काढणीसाठी तयार केल्या गेलेल्या यंत्रांचा. पिकाला जराही इजा न करता अल्पवेळेत अधिक काढणी करून देणारी ही यंत्रे कामे किती वेगात करू शकतात हे दाखवून देते. फळ काढणीसाठी माणसांना झाडावर चढावं लागतं तेही सुरक्षेची कोणतीही हमी न देता. पण यालाच पर्याय म्हणून तयार केलेले एक यंत्र तर अफलातून आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये अमेरिकेतील प्रचंड मोठे मक्याचे शेत दिसते. आपल्याकडे एवढय़ा मोठय़ा शेतावर काम करायला अफाट मजूर लागतील. ते काम दोन यंत्रे वायुवेगाने करताना दिसतील. एरियल व्ह्य़ूमुळे आणि सोबतच्या पाश्र्वसंगीतामुळे तो माहितीसोबत मनोरंजकही झाला आहे.

गव्हाच्या शेतीतील कामाचा अफाट वेग दाखविणाराही एक व्हिडीओ उपलब्ध आहे. मका आपल्याकडे अजूनही मानवी श्रमांद्वारेच सोलला जातो. येथे मका सोलण्याचे एक अजब घरगुती यंत्र पाहायला मिळते. काम सोपे आणि सहज करण्यासाठी लोक काय बनवू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. कितीही ठरविले तरी आपण हाताने जितके मक्याचे दाणे काढू शकणार नाही, त्याहून अधिक काम हे यंत्र सेकंदांमध्ये करते. अमेरिकेतच नाही, तर आशियातील प्रगत देशांमध्ये शेती कशी वेगात केली जाते, त्याचे व्हिडीओदर्शन करणारी एक क्लिप आवर्जून पाहावी. शेतातील लावणीपासून काढणीपर्यंतचे आणि प्रक्रियेपर्यंतचेही तपशील त्यात वेगामध्ये पाहायला मिळू शकतील.

डाळी उत्पादनामध्ये ऑस्ट्रेलिया जगभरातील प्रमुख देशांमध्ये गणला जातो. जितके त्या देशात पिकविले जाते, त्याहून कैक प्रमाणात निर्यात होते. भारतही कित्येकदा त्यांचा ग्राहक असतो. तेथील एका शेतकऱ्याचा आणि शेतीचा व्हिडीओ पाहण्याजोगा आहे.

ही इतर देशांची भलामण आणि आपल्या देशाकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब नाही. आपल्याकडे प्रगत शेतकरी अनेक चांगले प्रयोग करीत आहेत. तरीही असल्या प्रकारची यंत्राधिष्ठित शेती आपल्याकडे दिसत नाही. आपल्याकडे रोजगारशक्ती, मानवी श्रम यांच्या वापरातून शेती उत्पादन तुलनेत म्हणावे तितके मोठे नसते. आपली बहुतांश शेतीउत्पादने देशातील नागरिकांच्या खाण्यामध्येच संपतात. मग त्यांची निर्यात काय करणार? कांदा, बासमती तांदूळ, चणे आणि उत्पादन अतिरिक्त झालेल्या गोष्टी आपण जागतिक बाजारपेठेमध्ये नेतो. पाणीप्रश्न, दुष्काळ, वातावरण बदल आणि योग्य दरांत न मिळणाऱ्या मजुरांबाबत जगभरातील शेतकऱ्यांची सारखीच समस्या आहे. त्यांवर मात करीत मोठे उत्पादन घेण्याची इच्छाशक्ती त्यांनी गमावली नाही इतकेच. हे व्हिडीओ निव्वळ शेती माहिती नसणाऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारे नाहीत, तर आपल्या भूगोली पुस्तकांच्या ज्ञानापलीकडचे जग दाखविणारे आहेत.

viva@expressindia.com