संगीताच्या दुनियेतलं एक तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या ‘म्युझिशिअन्स इन्स्टिटय़ूट’मध्ये आपल्या छंदाला करिअरच्या रूपात साकारायचा प्रयत्न करतेय मूळची मुंबईकर असलेली ऐश्वर्या. लॉस एंजेलिसमधले तिचे संगीतमय अनुभव..
हाय फ्रेण्ड्स! मी पाल्र्याच्या सेंट जोसेफ शाळेची विद्यर्थिनी. चित्रकला आणि भरतनाटय़मची आवड. पुढं चित्रकार व्हायचा बेत होता खरा. पण घरी संगीताची पाश्र्वभूमी नसतानाही मला सुरांची गोडी लागली. गेली सात र्वष गिटार शिकतेय. शाळेपासूनच ही आवड लागली. शाळेतल्या पिकनिकच्या फोटोंचा व्हीडिओ तयार करून त्याला इंग्रजी गाण्याच्या सुरावटींची जोड दिली. पुढं जयहिंद कॉलेजमध्ये आर्ट्सला अॅडमिशन घेतली. कॉलेजमध्ये मी सीनिअर ग्रुपसोबत परफॉर्म करायला लागले. लाईट-साऊंड नि रेकॉर्डिगही ट्राय करून बघितलं.
कॉलेजमधल्या परफॉर्मन्सनंतर कळलं की, हेच आपलं फिल्ड आहे. खूप वेगळं नि चॅलेंजिंग आहे. मग ठरवलं की, ‘म्युझिक’च करायचंय. तेव्हा मी गिटार शिकायला ‘म्युझिशिअन्स इन्स्टिटय़ूट’मध्ये जाणार होते. पण रेकॉर्डिगमध्ये रस वाटल्यानं पुढं ऑडिओ इंजिनीअरिंगकडे वळायचं ठरवलं. मला म्युझिशिअन नव्हे तर रेकॉर्डिग इंजिनीअर व्हायचं होतं. मी स्वत: गिटार शिकत होते. मला मेंटॉर नव्हता. म्युझिक थिअरी करायची होती, पण त्यासाठी फीचा खर्च खूप होता. कॉलेजमध्ये असताना माझा परफॉर्मन्स पाहून अनेकांनी सल्ला दिला म्युझिक करायचा. शेवटी बारावीनंतर मी म्युझिक थिअरी केलं.
त्यानंतर साँग राइटिंग- गीतलेखनाची गोडी लागली. वाचन लहानपणापासून चांगलं होतं. फ्रेंच विषयही घेतला होता. जयहिंद कॉलेजला पुढं इंग्लिश ल्रिटेचरमध्ये बी.ए. झाले. या सगळ्या गोष्टींचा गीतलेखनात खूप उपयोग झाला. मला वाटलं की गिटार, गीतलेखन, म्युझिक शिकतेय, ही एका अर्थी कला जोपासतेय.. पण एक करिअर म्हणून विचार करता, रेकॉर्डिगमध्ये करिअर करता येईल नि कलाही जोपासता येईल.
अठरा वर्षांची झाल्यावर आपल्याकडच्या रेकॉर्डिग स्टुडिओत ट्राय केलं. इंटर्नशिपच्या किंवा शिकण्याच्या दृष्टीनं. पण तशी संधी मिळाली नाही. कारण मुंबईत रेकॉर्डिगसाठी अठरा वर्षांच्या विद्यार्थ्यांना घेत नाहीत. बेसिक शिकून म्युझिशिअन्स इन्स्टिटय़ूटमध्ये आले असते, तर पुष्कळ फरक पडला असता. या फिल्डमध्ये यायचं झाल्यास अभ्यास आणि अनुभव गाठीशी असलेला बरा. आपल्यापेक्षा तिथल्या पद्धतीत खूप फरक आहे. सुरुवातीला थोडा स्ट्रगल करावा लागला, पण हळूहळू सूर गवसू लागले..घरच्यांचा पाठिंबा असतानाही, मला इथं यायला तीन वर्षं लागली. आपल्याकडं या फिल्डसाठी बँकांचं लोन मिळत नाही. कारण या प्रकारच्या क्रिएटिव्ह फिल्डमध्ये गुंतवलेला पैसा परत मिळण्याची हमी बँकांना वाटत नाही. त्यामुळं आर्थिक पाठबळ उभारण्यात वेळ गेला. इथं आलेल्या इतर भारतीय विद्यार्थ्यांना थोडय़ाफार फरकानं याच समस्येला सामोरं जावं लागलं. या फिल्डमध्ये विद्यर्थ्यांची क्षमता आणि त्यांना मिळणाऱ्या संधीवर पुढचं करिअर अवलंबून असतं. हेच नव्हे तर कोणतंही क्रिएटिव्ह फिल्ड घेतलंत तर पैशांचा प्रश्न असतो, ही मानसिकता बदलायला हवी.
इथं फक्त ऑडिओ इंजिनिअरिंग घेतलेली मी एकटी भारतीय आहे. एका भारतीय मैत्रिणीचा विषय ऑडिओ इंजिनिअरिंग आणि व्होकल प्रोग्रॅम असा आहे. आम्हाला कॉन्सोल, मिक्सिंग-ऑपरेटिंग, म्युझिक थिअरीशी संबंधित गोष्टी शिकवल्या जातात. ऑडिओ इंजिनिअरिंग, लाइट-साउंड, पोस्ट प्रॉडक्शन असा हा वर्षांचा कोर्स आहे. इथं येऊन सहा महिने झालेत. माझा ऑडिओ इंजिनीअरिंग कोर्स पूर्ण झालाय. आता माझा लाइट-साऊंडचा कोर्स सुरू होतोय. त्यात स्टेज सेटअप, लाइव्ह परफॉर्मन्स रेकॉर्ड करणं वगैरे भाग शिकवले जातील. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनमध्ये एडिटिंग, साउंड डिझाइनिंग वगैरे शिकवलं जाईल.
मुंबईत नवीन दोन म्युझिक स्कूल सुरू झाल्याचं कळतंय. मी शोधत होते, त्यावेळी भारतात, स्पेसिफिकली ऑडिओ इंजिनीअरिंग शिकवणारी संस्था नव्हती. आपल्याकडे बॉलीवूडचं साम्राज्य वाढत असलं, तरी म्युझिक इंडस्ट्रीची अजून म्हणावी, तेवढी स्वतंत्रपणं वाढ झालेली नाहीये. युरोप किंवा यूएसएच्या इंडस्ट्रीएवढा इम्पॅक्ट अजून आलेला नाहीये. त्यामुळं तुलनेनं संधी कमी आहेत. मला स्वत:ला फिल्ममध्ये जायचं नव्हतं. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. मुंबईत लोअर परळला द ट्र स्कूल ऑफ म्युझिक आणि चेन्नईला साऊंड ऑफ म्युझिक आहे. शिवाय दिल्ली, बंगलोर आदी ठिकाणी परफॉरमन्सेस प्रोग्रॅम्ससाठी शिकवलं जातं. त्याखेरीज साऊंड इंजिनीअरिंगसाठीचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. द ट्र स्कूल ऑफ म्युझिकमध्ये अलीकडं ऑडिओ इंजिनीअरिंग सुरू केलंय. पण माझ्या माहितीत स्पेसिफिकली ऑडिओ इंजिनीअरिंगसाठीचं स्कूल अजून चालू झालेलं नाहीये.
मी अपार्टमेंट शेअर करतेय, एका मैत्रिणीसोबत. आपल्या बजेटनुसार इथली घरं निवडावी लागतात. इथल्या प्रोफेसर्सनी गेल्या सहा महिन्यांत खूप गोष्टी शिकवल्यात. आपल्या शंका-प्रश्नांचं लगेच निरसन केलं जातं. आपली शिकायची तयारी असेल तर प्रोफेसर्स मदतीस तत्पर असतात. माझ्या स्ट्रगलच्या काळात कॉन्सोलमध्ये फार गती नव्हती. पण नेटानं ते शिकत राहिल्यानं ते कळलं. त्यासाठी प्रोफेसर्सनी मदतीचा हात दिला. इथं संधी खूप आहेत. इथल्या ओपन काऊन्सेलिंगमध्ये फ्री कन्स्लटेशन दिलं जातं. आमच्या फायनल प्रोजेक्टमध्ये रेकॉर्डिग ते मिक्सिंग आम्हांला स्वत:ला करायला लागतं. मी सातत्यानं माझ्या ओपन काउन्सेलिंगमध्ये जात होते आणि रेकॉर्डिगमध्ये इनपुट्स घेत होते. लॅब प्रॅक्टिकल आणि थिअरी असणार होती. रेकॉर्डिगसाठी माईक कसे सेट करायचे, रेकॉर्ड कसं करायचं वगैरे विचारलं जातं. माझ्या रेकॉर्डिगमध्ये प्रोफेसरनी दिलेल्या इनपुट्समधून मी खूप काही शिकले.
अमेरिकन्सखेरीज इंडोनेशिया, साउथ अमेरिकेतले फ्रेण्ड्स एकमेकांना मदत करतात. एकत्र ग्रुपमध्ये काही वेळा कल्चरल शॉक बसतो, पण नंतर आपण स्थिरावतो. अनेकदा भारताविषयी खूप प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आपण ब्रिटिश इंग्लिश वापरतो, ते अमेरिकन इंग्लिश वापरतात. त्यांची स्लँग समजायला वेळ लागतो. तिथं पर्सनल स्पेसला जास्त महत्त्व दिलं जातं. भारतीयांच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचं, सर्वसमावेशक संस्कृतीचं त्यांना आश्चर्य वाटतं. ठरावीक बजेटमध्ये गोष्टी बसवायच्या असल्यानं आपसूक त्यानुसार कामं केली जातात. अभ्यास आणि घरकामामुळं बाहेर फारसं फिरणं वगैरे होत नाही. स्वावलंबी आयुष्य जगावं लागतं. आता मी टाइम मॅनेजमेंटमध्ये पटाइत झालेय. त्यालाही जणू एक ऱ्हिदम आलाय. एकटीनं सगळी जबाबदारी पार पाडावी लागतेय. लॉस एंजेलिसमधलं हवामान खूप अनप्रेडिक्टेबल आहे. या हवामान बदलांशी जुळवून घ्यावं लागतं. इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी आहे. स्वत:ची गाडी असायला हवी. काही वेळा पाहायला गेलो, ख्रिसमस साजरा केला. इथं बाहेर जाणं खूप महाग पडतं. रविवार संध्याकाळ अनेकदा घरीच प्रॅक्टिसमध्ये जाते. मी गीतलेखनही करतेय. माझं गाणं आता रेकॉर्ड होतंय. बाकीच्या छंदांना मात्र वेळ नाही. आता इंटर्नशिप करायची आहे. पुढच्या करिअर प्लॅनिंगवर विचार करण्यातही काही वेळ जातो. म्युझिक प्रॅक्टिस आणि वाचन अजूनही चालू आहे. सलमान रश्दी, कमला दास आदी माझे आवडते लेखक. बाबांमुळे मला वाचनाची आवड लागली. त्यातूनच लिखाण सुरू झालं. सध्या मी देवदत्त पटनायक यांची महाभारत-रामायणावरची लिहिलेली पुस्तकं वाचतेय. कॉलेजमध्ये खूप सेलेब्रेटीज येतात. मी मुंबईचीच असल्यानं सेलेब्जविषयी फारसं आकर्षण वाटत नाही, तसंच तिथल्याही सेलेब्रेटीजविषयी वाटत नाही. मला फ्रान्सिस बकले, माइकल रिड, इव्हान झविंन्युल आदी मान्यवरांचं मार्गदर्शन लाभतंय. गेस्ट प्रोफेसर म्हणून ग्रॅमी पुरस्कार विजेत्या संगीतकारांचं मार्गदर्शन लाभलंय.
घरची सपोर्ट सिस्टिम मिस करतेय. मी अमेरिकेला जातेय, म्हटल्यावर अमेरिकेतल्या लाइफविषयी काहींनी भारतात बसून कवीकल्पना केल्या होत्या. पण मी प्रत्यक्षातलं जीवन अनुभवतेय. सुरवातीला मी फक्त घर-अभ्यासातच वेढलेली होते. इतरांशी कॉन्टॅक्ट कमी झाला होता. या सगळ्या गोष्टींना तोंड दिल्यावर पुढं त्यांची सवय होते. करिअर करण्यासोबत इतर जबाबदाऱ्या वाढतात. सुरुवातीला वाईट वाटायचं. कधीकधी एकटं पडल्यासारखं वाटायचं.. म्युझिक स्कूलमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन भरपूर आहे. सगळे स्वत:च्या करिअरला आकारायच्या प्रयत्नात असतात. तसा सपोर्ट कमी असतो, पण हळूहळू तेही मन स्वीकारतं.. ऑस्कर सेरेमनी आमच्यापासून दोन ब्लॉक सोडून झाला, पण अभ्यासामुळं तो बघायला गेलो नाही. या क्षेत्रात पुढं काम मिळवण्यासाठी प्रयत्न करायचेत. इथलं शिक्षण संपल्यावर घरी यायचंय. कारण मला मुंबईचं म्युझिक फिल्ड खूप आवडतं. एखादी स्वतंत्र कॉन्सर्ट करायचेय.. म्युझिक माझं पॅशन आहे.. माझ्या ध्येयाच्या स्वप्नांच्या ऱ्हिदमचं रेकॉर्डिग करायला सुरुवात केलेय.. हे रेकॉर्डिग थोडंसं लांबणारं असलं तरी हवंसं असल्यानं अविरत सुरू राहणारेय, हे नक्की..
– ऐश्वर्या गोवेकर
लॉस एंजेलिस, कॅलिफॉर्निया
(शब्दांकन : राधिका कुंटे)
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com