एरवी फ्लोरल, फंकी प्रिंट्सचे शर्ट्स, लूझ ट्रॅक पॅण्ट्स घालून पार्टी किंवा प्रसिद्धी कार्यक्रमांना हजेरी लावणारा रणवीर सिंग ‘बाजीराव मस्तानी’च्या प्रमोशनच्या वेळी एका कार्यक्रमामध्ये शॉर्ट कुर्ता आणि स्कर्ट या वेशात दाखल झाला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यातून एका नव्या चर्चेला सुरुवात झाली. अँड्रोजनी फॅशनची. लहानपणापासून मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा रंग इथपासून स्टिरिओटाइपला सुरुवात होते. मुलगा आणि मुलगी यांचं शिक्षण, आवडीनिवडी, करिअर, छंद, जबाबदाऱ्या याबाबत एक ठोकळेबाज वर्गीकरण डोक्यात फिक्स असतं. ते त्यांच्या कपडय़ांच्या निवडीपर्यंत येऊन थांबतं. या ठोकळेबाज फॅशनऐवजी कुणी काही वेगळं करायचा प्रयत्न केला की, चर्चेचा विषय ठरतो. उदाहरणार्थ ‘कि अॅण्ड का’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरमधील अर्जुन कपूरच्या पायातील लाल हील्स, किरण रावचं एका समारंभाच्या रेड कार्पेटवर स्वेटर आणि लेगिंगमध्ये येणं हे सर्व चर्चेचा विषय ठरतं. मुलांनी अमुक आणि मुलींनी अमुक प्रकारचे, डिझाइनचे, कटचे कपडे घालावेत असं न ठरवता वावरताना सोयीचे, आरामदायी कपडे करण्याचा प्रयत्न गेल्या काही सीझनमध्ये डिझायनर्स करत आहेत. त्यांची फॅशन ‘जेण्डल न्यूट्रल’ आहे. त्यातूनच ‘अँड्रोजनी फॅशन’ ही एक वेगळीच शाखा जन्माला आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा