हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

नावात काय आहे? असं कितीही म्हटलं तरी ब्रॅण्ड्सच्या दुनियेत नावावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. काही ब्रॅण्ड्सची नावं आपल्याला त्यांच्या भारतीय असण्याची ग्वाही देतात त्याच वेळी काही ब्रॅण्ड्स नावावरून पाश्चात्त्य असतील असा ठाम विश्वास वाटतो. या अर्थाने परकीय वाटणारा पण प्रत्यक्षात भारतीय असणारा पुरुषांच्या शर्ट, ट्राउझर, जीन्सचा सुप्रसिद्ध ब्रॅण्ड म्हणजेच पीटर इंग्लंड.

Shubman Gill and Avneet Kaur dating
शुबमन गिल ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण, कोण आहे जाणून घ्या?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
devara trailer release jr ntr saif ali khan action scene
Devara: Part 1 Trailer: पाण्यातील लढाई आणि धमाकेदार अ‍ॅक्शन, ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?
ankita lokhande nia sharma viral ganpati dance video
Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
actress spruha joshi made modak on the occasion of ganesh festival video viral on social media
गणेशोत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, तिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत म्हणाले…
Vijay Verma
“माझ्या बँक अकाउंटमध्ये फक्त १८ रुपये…”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली संघर्षाच्या काळातील ‘ती’ आठवण
Telegram ceo arrested in france
टेलीग्रामच्या संस्थापकाला फ्रान्समध्ये अटक; कोण आहेत पावेल दुरोव्ह? दुबईतील महिलेचा त्यांच्या अटकेशी काय संबंध?
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!

आर्यलडमधल्या लॉण्डनडेरी येथे १८८९ मध्ये ‘ओल्ड इंग्लंड ब्रॅण्ड’ या नावाने या ब्रॅण्डचा जन्म झाला. पण हा ब्रॅण्ड प्रसिद्ध झाला युद्धकाळात. ब्रिटिश सैनिकांसाठी तयार खाकी कपडे शिवण्याचं मोठं काम फॅक्टरीला मिळालं. ब्रिटिश सैनिकांसाठी कपडे शिवणारा ब्रॅण्ड म्हणजे मजबूत व टिकाऊ असणार या गृहीतकामुळे या ब्रॅण्डचा खप विलक्षण वाढला. १९५७ मध्ये जुनं नाव बदलून ‘पीटर इंग्लंड’ हे नाव ब्रॅण्डने धारण केलं. त्यामागे विशेष कारण आढळत नाही. याच नावाचा ब्रिटिश अभिनेता असला तरी तो खूप अलीकडच्या काळातील आहे. एकूणच सुरुवातीपासून या ब्रॅण्डने ब्रिटिशांचा ठसा स्वत:वर उमटवलेला दिसतो.

भारतामध्ये १९९७ साली पीटर इंग्लंड शर्ट्स, ट्राऊझर्स दाखल झाले. २०००साली आदित्य बिर्ला ग्रूपने हा ब्रॅण्ड खरेदी केला. त्यामुळे नावात इंग्लंड असलं तरी ब्रॅण्ड मात्र भारतीय झाला. तरुणांसाठी कार्यालयीन वापराचा एक महत्त्वपूर्ण फॉर्मल ब्रॅण्ड म्हणून पीटर इंग्लंडने आपले स्थान निश्चित केले. शिवाय डेनिम, लिनन, सणासुदीसाठीचे शर्ट्स, कुर्ते या श्रेणीतही हा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. ऑफिससाठी वापरल्या जाणाऱ्या शर्ट ट्राऊझरचा ठरावीक साचा मोडत तरुणांची आवडनिवड या ब्रॅण्डमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. भारतातील १८ वर्षांच्या काळात या ब्रॅण्डला अनेक बाबतींत आद्यत्वाचा मान द्यावा लागतो. भारतीय ग्राहकांसाठी ‘िरकल फ्री’ अर्थात सुरकुत्याविरहित पहिले शर्ट्स याच ब्रॅण्डने आणले. पीई जीन्स हा पाण्याचा कमीत कमी वापर करणारा जीन्स ब्रॅण्ड ठरला. त्यांची सर्वात लोकप्रिय श्रेणी म्हणजे इंग्लिश कॉटन. या व्यतिरिक्त, ‘ऑक्सिजिन्स’ही लोकप्रिय होते आहे. पुरुषांच्या कपडय़ांच्या श्रेणीतील सर्वाधिक  लोकप्रिय अशापाच ब्रॅण्डमधील एक ठरण्याचा मान सलग सात वर्षे पीटर इंग्लंडने पटकावलेला आहे. १५० शहरं, ७०० आऊटलेट्स, ४ लाखांहून अधिक ग्राहक आणि १० लाख कपडय़ांची निर्मिती यामुळे हा पुरुषांच्या कपडय़ांच्या श्रेणीतील मोठा ब्रॅण्ड ठरतो. ‘ऑनेस्ट शर्ट’, ‘ऑनेस्टली इम्प्रेसिव्ह’ या जुन्या तर ‘बिगनिंग ऑफ गुड थिंग्ज’ या नव्या टॅग लाइन अगदी योग्य आहेत.

भारतीय होऊनही ब्रिटिश नाळ नावातून जपणारा हा ब्रॅण्ड. अर्थात वैश्विक बाजारपेठेचा विचार करून हे नाव वापरण्याचा सध्याच्या निर्मात्यांचा हेतू स्पष्ट होतोच आहे. किंबहुना परदेशी ब्रॅण्डविषयीचे भारतीय आकर्षण आणि मानसिकतेचा विचार करता हे नाव सार्थकी लागते. नावात सगळे काही नसले तरी आपला ठसा उमटवण्याची ताकद निश्चितच असते. तो उमटवत असताना हा ओल्ड इंग्लंड ब्रॅण्ड भारतीय पुरुषांसाठी इमानदार ठरतो.

viva@expressindia.com