प्रशांत ननावरे

माणसं शहराला सुंदर बनवतात की शहर माणसांना सुंदर बनवतं हे सांगणं कठीण आहे. कारण प्रत्येक शहराची खासियत वेगळी असते. तुम्ही ज्या नजरेतून पहाल त्या नजरेतून ते शहर, शहरातील जागा आणि माणसं तुम्हाला वेगवेगळी भासतील. सुंदरतेच्या व्याख्येत या दोन्ही गोष्टींचा मिलाप कुठल्या जागी होतो, असं विचारलं तर चटकन फ्रान्समधील ‘पॅरीस’ शहराचं नाव डोळ्यासमोर येतं. याच शहराच्या गुणधर्माशी साधर्म्य साधणारा आणि तिथूनच प्रेरणा घेऊन नाव धारण केलेला एक कॅ फे १९३५ साली मुंबईत अस्तित्त्वात आला.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
two friends shopkeeper samosa having here or parceli joke
हास्यतरंग :  एक प्लेट…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
hotel Photo Viral
बायकोला वैतागलेल्या नवऱ्यांसाठी खास ठिकाण! हॉटेलच्या नावाची पाटी वाचून चक्रावले नेटकरी, पाहा Viral Photo
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

गिरगावच्या भटवाडीत अवंतिकाबाई गोखले पथच्या तोंडाशीच ब्रिटीशकालीन बांधकाम असेलेली चार मजली, दगडी पाया, प्रत्येक घराला बाल्कनी, फिक्या पिवळ्या रंगाची, रेखीव आणि भक्कम इमारत आहे. या इमारतीचे गुजराती मालक प्रताप कधीकाळी पॅरीसला गेले होते आणि त्या शहराच्या सौंदर्याच्या, तिथल्या कॅ फेंच्या प्रेमात पडले. भारतात परतल्यावर त्यांनी १९३५ साली या इमारतीची बांधणी केली आणि त्याला नाव दिलं ‘विला बेलव्ह्यू’. फ्रेंच भाषेत याचा अर्थ होतो सुंदर देखावा. त्याच काळात गुस्ताद दिनशाह इराणी हॉटेलच्या व्यवसायासाठी जागेच्या शोधात होते. प्रताप यांनी त्यांना इमारतीच्या तळमजल्यावरची जागा देऊ केली पण एक अट घातली की या जागी सुरू होणाऱ्या कॅ फेचं नावं ‘कॅफे ड ला पेक्स’ असं ठेवायचं. फ्रेंच भाषेत याचा शब्दश: अर्थ ‘कॅ फे ऑफ पीस’ असा होतो. गुस्ताद यांनी अगदी हसतमुखाने ती अट मान्य केली आणि गिरगावच्या गजबजलेल्या चौकात थेट ‘पॅरीस’शी नातं सांगणारा कॅ फे सुरू झाला.

गोलाकार इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कॅफेची जागा चौकोनी असल्याचं लक्षात येतं. मग तुम्ही खुर्चीवर विराजमान होऊ न छताकडे पाहता तेव्हा मधल्या एका भक्कम खांबामुळे छताचा एक कोपरा षटकोनी असल्याची जाणीव होते. निरखून पाहिल्यास हे विविध आकार कॅफेचं सौंदर्य खुलवण्यास हातभार लावतायेत असं लक्षात येतं.

गुस्ताद दिनशाह इराणी यांनी कॅ फेची सुरूवात केली तेव्हा बाजूलाच डायमंड मार्केट होतं. नुकतीच ऑटोमोबाईलची बूम सुरू झाली होती. त्याचे पार्ट्स मिळणारी अनेक लहानमोठी दुकानं या भागात सुरू झालेली. त्यावेळी गिरगावात सिनेमागृहांची संख्याही लक्षणीय होती. हाकेच्या अंतरावर ऑपेरा हाऊस आणि तिथून पुढे काही अंतरावर चौपाटी. कॅ फेच्या अगदी दारात ट्रामचं मुख्य जंक्शन होतं. आठ नंबरच्या ट्रामचं सुरूवातीचं आणि परतीला शेवटचं स्थानकही हेच जंक्शन होतं. गिरगाव हे निवास आणि व्यापाराचं केंद्रस्थान होतं. अर्थात ‘कॅफे ड ला पेक्स’ त्यामध्ये रक्तवाहिनीचं काम करत होता.

या कॅ फेमध्ये सुरूवातीपासूनच छापील मेन्यू कार्ड नाही. कॅ फेच्या आतल्या भिंतींना असलेल्या मोठाल्या काचांवर इथे मिळणारे पदार्थ त्यांच्या वैशिष्टय़ासह नमूद केलेले आजही आढळतात. बटर मिल्क, शरबत, समोसा, खारी, बिस्किट, वेफर्स, कॉफी, आइस्क्रीम आणि फालूदा, हॉट आणि कोल्ड मायलो हे ते पदार्थ. यातील अनेक पदार्थ आज मिळत नाहीत. सध्याचा मेन्यू तर अगदीच साधा आहे. त्यात ब्रून मस्का, बन मस्का, अंडा भुर्जी, अल्टी-पल्टी, चहा, कॉफी, चीज ऑमलेट, स्क्रॅम्बल्ड एग यांचा समावेश होतो.

गुस्ताद दिनशाह इराणी यांच्यानंतर त्यांचा मुलगा दिनशाह गुस्ताद इराणी यांनी कॅ फेची धुरा हाती घेतली. दिनशाह आता ८२ वर्षांचे आहेत. दिनशाह यांच्या जोडीने तिसरी पिढी या व्यवसायात उतरली असून आता त्यांचा मुलगा गुस्ताद (हे त्याच्या आजोबांचंच नाव) कॅ फेसांभाळतोय. वडिलांना हातभार लावायला म्हणून लहानपणापासूनच गुस्ताद येथे येतात. कॅ फेबद्दलच्या आठवणी सांगताना गुस्ताद एक मनाला चटका लावून जाणारी आठवण सांगतात. ऐंशीच्या दशकात कॅ फेच्या उजव्या बाजूच्या फुटपाथला आता जिथे सिंडीकेट बँकेचं कार्यालय आहे तिथे एक कुंटणखाना होता. त्या कुंटणखान्यात मुख्यत: दक्षिणेतून पळवून आणलेल्या मुली-महिला असत. समाज भलेही त्यांच्याकडे तिरस्काराच्या नजरेनं पाहत असेल पण त्यांच्या मर्जीने त्या इथे आल्या नव्हत्या याची प्रचिती त्यांना अनेकदा आल्याचं गुस्ताद नमूद करतात. एका दिवसात त्यांना त्यांची दोन रूपं पहायला मिळत असत. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर नटल्यावर त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असे. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी चहाला कॅ फेमध्ये आलेल्या असताना त्याच डोळ्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावलेल्या असत. काही गोष्टी बोलून शब्दाविनाच कळतात, त्यातलाच हा प्रकार होता. अनेकजणी कॅ फेमध्ये येऊन ग्राहकांसोबत चहा-कॉफी घेत असत, रोजच्या वापरातील वस्तू खरेदी करत, गप्पा मारत आणि अय्यय्यो करून विनोदही करत असत. पण त्यांनी आपली मर्यादा कधीच सोडली नाही, असं गुस्ताद सांगतात. कॅ फेचं आणि त्यांचं एक वेगळं नातं तयार झालं होतं. कालांतराने कुंटणखाना बंद झाला आणि त्यांचं इथे येणंजाणंही.

कॅफेमध्ये भिंतीला लावलेल्या मोठाल्या काचा आहेत. काचेवर केलेली हँडपेंटींग आजही आपला फ्रेशनेस राखून आहेत हे विशेष. भिंतींना सर्व बाजूंनी लाकडी फडताळं असून त्यावर पत्र्याचे जुने डबे मांडलेले दिसतात. लाकडाची आणि काचेची जुनी कपाटं आहेत. एका कपाटात गुस्ताद यांनी अलिकडेच आपल्या वडिलांनी ठेवलेल्या (किंवा शिल्लक राहिलेल्या म्हणूयात) जुन्या प्रॉडक्टच्या तेलाच्या बाटल्या, बुट पॉलिश, टूथ पावडरच्या डब्या मांडलेल्या आहेत. कॅफेमध्ये येणाऱ्यांसाठी ते कपाट आता खास आकर्षण झालंय. इटालीयन स्टाईल फ्लोरींग, चौकोनी लाकडी टेबलं आणि त्यावर ब्लॅक मार्बल, त्याकाळी ३२ रूपये डझन या भावाने घेतलेल्या बेंटवूडच्या खुर्च्या आजही तशाच आहेत. कॅ फेच्या मधल्या चौकोनी खांबावर गुस्ताद यांच्या मित्राने भेट दिलेलं आयफेल टॉवरचं रेखाचित्र कॅ फेचं पॅरीस कनेक्शन अधोरेखित करतं. एका भिंतीच्या अगदी वरच्या अंगाला लावलेलं जुनं घडय़ाळ निरखून पाहिल्यास त्याची गंमत लक्षात येते. या घडय़ाळाचे आकडे ‘कॅफे ड ला पेक्स’ (café de la paix) या नावांच्या इंग्रजी अक्षरांचे आहेत. योगायोगाने नावातही बाराच अक्षरं असून शेवटचा एक्स हा रोमन अक्षरांनुसार एक्स आणि त्यामध्ये उभ्या दोन दांडय़ा जोडल्याने बाराचा आकडा दर्शवतो.

अनेक हौशी आणि अभ्यासू मंडळी हेरीटेज वॉक अंतर्गत या कॅ फेला भेट देतात. खरंतर अर्थार्जनाच्या दृष्टीने काळानुरूप आपणही बदलायला हवं याची गुस्ताद यांना पूर्ण जाणीव आहे. पण दुसरीकडे त्यांना असंही वाटतं की, इथली प्रत्येक गोष्ट स्वत:बद्दल बोलते आणि म्हणूनच ते आहे तसंच जतन करणं ही त्यांना जबाबदारी वाटते. शेवटी सौंदर्य बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं याची जाणीव हा कॅ फे तुम्हाला नव्याने करून देतो.

viva@expressindia.com