स्वप्निल घंगाळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१ डिसेंबरपासून देशामध्ये ड्रोन उडवण्याला कायदेशीर मान्यता मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोन उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मात्र ड्रोन म्हणजे नक्की काय? त्याची तरुणाईला इतकी भुरळ का आहे? आत्तापर्यंत ड्रोन कसे उडवले जायचे? जगभरामध्ये ड्रोनबद्दल काय स्थिती आहे? नियम बनवल्याने काय आणि कसा फायदा होणार यासारख्या प्रश्नांची अगदी सोप्प्या भाषेत उत्तरे शोधण्याचा केलेला हा प्रयत्न..

ड्रोन म्हणजे काय? या प्रश्नाचे तांत्रिक भाषेतील उत्तर जरा क्लिष्ट असले तरी साध्या भाषेत सांगायचे तर एक प्रकारचे मानवरहित विमान. हे विमानसदृश यंत्र रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने उडवले आणि नियंत्रित केले जाते. आपल्याकडे ड्रोन म्हणजे आकाशातून टिपलेले फोटो आणि व्हिडीओ असा थेट समज जनसामान्यांमध्ये आहे. भारताचा विचार केल्यास बऱ्याच अंशी तो योग्यही आहे, असे म्हणता येईल. आपल्याकडे ड्रोन वापरण्याची परवानगी आत्तापर्यंत केवळ सरकारी संस्थांना होती. अर्थात नियमांमध्ये राहून काही स्टार्टअप कंपन्यांनी या क्षेत्रात उडी घेतली आहे हा अपवाद यातून वगळता येईल. भारतामध्ये आजपर्यंत ड्रोन या संकल्पनेचा वापर सामान्यांशी थेट संबंध येईल अशा केवळ मनोरंजन क्षेत्रात केला जातो. येथे मनोरंजन क्षेत्राच्या व्याख्येत व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन रेसिंग, ड्रोन मेकिंग यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील एका प्रसंगामुळे ड्रोन म्हणजे रिमोटवर चालणारे चार कोपऱ्यांवर चार पंखे असणारे आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडीओ रेकॉर्डिग करणारे उडू शकणारे यंत्र अशी तोंडओळख सामान्यांना पहिल्यांदा झाली. असे असले तरी सरकारी यंत्रणा किंवा संरक्षण खाते वगळता ड्रोनचा भारतातील प्रवास स्टार्टअप्सच्या माध्यमातून सुरू होऊन अवघी पाच वर्षे झाली आहेत. सामान्यपणे लष्कराकडून हेरगिरी किंवा हल्ले करण्यासाठी ड्रोन्सचा वापर होतो. या ड्रोन्सचा आकार आणि बांधणी ही साध्या छोटय़ा ड्रोन्ससारखी नसून अगदी एखाद्या छोटय़ा विमानाप्रमाणे असते. मात्र सामान्यांमध्ये, खास करून तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारे मध्यम आकाराचे ड्रोन्स हे वेगवेगळ्या वेबसाइटवरून विकत घेता येतात. आता तरुणाईत ड्रोन्सची क्रेझ का आहे हे सांगायचे झाल्यास पहिले कारण म्हणजे त्यावरून व्हिडीओ शूट करता येतात. आपल्याकडे आजही ड्रोन्स म्हणजे व्हिडीओ शूटिंग असे सरळ गणित आहे. आकाशातून शूट केलेले व्हिडीओ जास्त छान आणि आकर्षक वाटतात. त्यामुळे ड्रोन्स आणि त्यातून शूट होणारे व्हिडीओ याबद्दल भारतीय तरुणांना विशेष आकर्षण आहे आणि या आकर्षणाचा अंदाज युटय़ूबवर असणाऱ्या व्हिडीओजला मिळालेल्या हिट्समधून दिसून येते. तसेच ड्रोन हा प्रकार तरुणाईला ट्रेण्डी आणि इतरांहून आपले वेगळेपणे दाखवण्यासाठी योग्य पर्याय वाटतो. म्हणजे ड्रोन विकत घेऊन उडवणे थोडे खर्चीक असले तरी त्यामधून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो, कारण सामान्यपणे लोक जे करत नाही असं काही तरी आपण करतोय हे समाधान अनेकांना मिळतं. ड्रोन्सच्या लोकप्रियतेचे आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्टार्टअप्स. आजपर्यंत ड्रोन्स नियंत्रणासंदर्भात योग्य नियमावली नसली तरी ड्रोन्स स्टार्टअप्सची धूम भारतामध्ये आहे. ड्रोन्स बनवणाऱ्या कंपन्या भारतात कमर्शियल तसेच सुरक्षा या दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

भारतातील प्रमुख ड्रोन्स स्टार्टअप कंपन्यांची यादी पुढीलप्रमाणे.. एअरपिक्स (एरियल फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी काम करणारी कंपनी), सोशल ड्रोन्स (या कंपनीच्या ड्रोन्सने २०१३ साली आलेल्या उत्तराखंड येथील पुरामध्ये औषधे तसेच मदतीचे सामान गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.), इडल सिस्टीम्स, आयडीयाफ्रोज, गरुडा रोबोटिक्स (ड्रोन्सच्या मदतीने डेटा अ‍ॅनालिसीस करणारी कंपनी). या सर्वच स्टार्टअप कंपन्या तरुणांनी सुरू केल्या असून त्या ड्रोन्ससंदर्भात काम करतात तरी त्यांचे क्षेत्र वेगवेगळे आहे. त्यामुळेच नियमावली आणि सरकारी स्तरावर नियंत्रण आल्यानंतर या कंपन्यांच्या कामाचे क्षेत्र विस्तारेल. या कंपन्यांकडून सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल. ड्रोन उद्योगातील आर्थिक आकडेमोड किती आहे, अगदी १९९९ साली भारतीय लष्कराने पहिल्यांदा केलेल्या ड्रोन्सच्या वापरापासून अगदी आजपर्यंतचा ड्रोन्सचा प्रवास, ड्रोन्सच्या किमती, ड्रोन्स कसे विकत घेता येतात या संदर्भातील सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. सांगायचा मुद्दा इतकाच की, आजपर्यंत कुठे तरी अडखळत प्रवास करणाऱ्या या कंपन्यांना नियमावलीमुळे फायदा होईल आणि भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात ड्रोन उद्योगाला भरभराटीचे दिवस येतील. सामान्यांच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास केवळ व्हिडीओ शूटिंग किंवा लग्नातील शूटिंगसाठी अथवा मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दिसणारे ड्रोन्स आता खरोखरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जीवनमान सुधारण्यासाठी आणि कामे अधिक वेगाने करण्यासाठी वापरले जातील. याचा अर्थ असा नाही की, उद्यापासून तुम्ही ऑर्डर केलेले खाणे किंवा एखादी ऑनलाइन शॉपिंग डिलिव्हरी ड्रोनने तुमच्या दारात येईल, कारण सध्या तयार करण्यात आलेली नियमावली ही प्राथमिक स्वरूपातील असून केवळ मर्यादित क्षमतेमध्ये ड्रोन्स उडवण्यासंदर्भातील आहे.

ड्रोन्सच्या माध्यमातून गडकिल्ले जगभरात पोहोचवण्याचा प्रवास

ड्रोन्स आणि व्हिडीओ म्हटल्यावर मराठी नेटकऱ्यांच्या परिचयाचे पहिले नाव म्हणजे ‘रानवाटा’चा संस्थापक स्वप्निल पवार. महाराष्ट्रातील ५० हून अधिक गडकिल्ल्यांवरून ड्रोन उडवून राज्यातील गडकिल्ले इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात पोहोचवणारा स्वप्निल २०१५ पासून ड्रोनने शूटिंग करतोय. ५०हून अधिक ड्रोन व्हिडीओ शूट त्याने केलेत. आत्तापर्यंत त्याने महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यांबरोबरच चार देशांमध्ये ड्रोन उडवले आहे. स्वप्निलने ड्रोन या विषयावर ‘लोकसत्ता व्हिवा’शी खास बातचीत केली.

ड्रोन उडवायला परवानगी मिळण्यासंदर्भात स्वप्निल म्हणतो, ‘ड्रोन जेव्हा भारतात वापरायला सुरुवात झाली तेव्हा यासाठी परवानगी असावी की नाही इथून सुरुवात होती. परवानगी कोण, कधी आणि कशी देणार इथून संभ्रम सुरू होता. माझा विषय गडकिल्ले असल्याने तिथे कोणी अडवायला नव्हतं. रानवाटांमध्ये जाऊन ड्रोन उडवायचे आणि शूट करायचं. आधी यासाठी कधीच अडचण आली नाही; पण ड्रोनची संकल्पना जनमानसात लोकप्रिय होऊ लागली तशी परवानगी आणि नियमांचा दबाव येऊ  लागला. गडकिल्ल्यांवर उडवण्यासाठी परवानगी मागायची झाली तरी स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज द्यावा लागतो. मग ते वरिष्ठांकडे पाठवतात आणि हो, अशी कधी परवानगी येतच नाही.’ स्वप्निलप्रमाणेच मुंबईमधील किंवा देशातील इतर राज्यांमध्येही स्टार्टअप कंपन्या स्थानिक पोलिसांना कोणत्या प्रकारचे ड्रोन उडवतोय, त्याचे कारण काय, असा अर्ज करूनच आत्तापर्यंत ड्रोन्स उडवत होते.

मात्र सर्वच जण परवानगी घेतात असं नाही. याबद्दल बोलताना स्वप्निल म्हणतो, ‘तंत्रज्ञान जसं स्वस्त होतंय तसं ते जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होतंय. आज मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी आहे तरी काही जण ड्रोन उडवतात. यूटय़ूबवरून आपल्याला त्याचे व्हिडीओ दिसतात. अवघ्या दहा मिनिटांचे काम असते ते. या अशा लोकांना ट्रेस करणे कठीण जाते.’ २०१४ साली पहिल्यांदा मुंबईमध्ये ड्रोनने पिझ्झा डिलिव्हरी करण्यात आल्यानंतर या संदर्भात खूपच गाजावाजा झाल्याने पोलिसांनी शहराची सुरक्षा धोक्यात येईल, असे कारण देत ड्रोन उडवण्यावर बंदी घातली.

नवीन नियमांबद्दल बोलताना नियम आले तरी ते जाचक असतील किंवा उगाच आडकाठी आणणारे असतील तर विषय आणखीन कठीण होईल, असे मत स्वप्निलने नोंदवले. बदलणारे तंत्रज्ञान आणि सामान्यांची आवड लक्षात घेऊन नियम बनवायला हवेत.

उगाच नियम जाचक आणि कठोर करण्यात अर्थ नाही, असेही स्वप्निल सांगतो. इतर देशांमधील स्थितीबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘आज अनेक देशांमध्ये ड्रोन उडवणे मानवी हक्कांअंतर्गत येते. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हानी न पोहोचवता, राष्ट्रीय सुरक्षेच्या मर्यादेत राहून ड्रोन उडवण्यास अनेक देशांमध्ये परवानगी आहे. तर याउलट काही देशांनी ड्रोनवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आधी ड्रोन वापरणे जरा त्रासदायक होते.

ड्रोनचा वापर सध्या कुठे होतो

सरकारी यंत्रणा, सुरक्षेच्या दृष्टीने मोठय़ा प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी, ड्रोन-रेसिंग, ड्रोन-मेकिंग, हेरगिरी, मोर्चे-आंदोलनांवर नजर ठेवण्यासाठी, मोठय़ा कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासाठी, फोटोग्राफी, सिनेमांचे शूटिंग.

भविष्यात कुठे होणार

शेती, रेल्वे, बांधकाम, सर्वेक्षण, मॅपिंग, डेटा अ‍ॅनालिसिस, ऑनलाइन डिलिव्हरी, आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवणे, मनोरंजन क्षेत्रात याचा वाढता वापर.

आता सेन्सर्स आल्याने ड्रोन आपटत किंवा फुटत नाहीत. त्यामुळे एका अर्थाने नवीन तंत्रज्ञानाबरोबर ड्रोन उडवणे जास्त सुरक्षित झाले आहे.’

viva@expressindia.com