राजश्री जगताप, त्सुकुबा, जपान

आपण लग्नानंतर परदेशी जाणार याचा खूप आनंद वाटत होता, पण मला त्याहून अधिक आनंद आपला नवरा डॉ. सतीश लक्ष्मण शिंदे ‘शास्त्रज्ञ’ असल्याचा होता. लग्नानंतर पंधरवडय़ाने आम्ही जपानमध्ये आलो. त्सुकुबा या इथल्या सायंटिस्ट सिटीमध्ये आम्ही राहायला आलो. इथे आल्यावर लगेचच एका आलिशान हॉटेलमध्ये आमच्यासाठी लग्नाच्या पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं. माझा भारतीय पेहराव पाहिल्यावर त्सुकुबा सिटीतील नावाजलेले शास्त्रज्ञ तदाकी नगाव-सन यांनी भारतीय वस्त्राभूषणांची सविस्तर माहिती विचारून घेतली. माझ्या आवडीनिवडींबद्दल जाणून घेत त्या अनुषंगाने जपानमधल्या गोष्टींबद्दलची माहितीही त्यांनी मला दिली. नंतरचा काही काळ मी माझ्या बदलत्या आयुष्याबद्दल विचार करत होते, कारण एवढय़ा मोठय़ा मान्यवरांकडून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालंच, पण त्यांनी केलेलं माझं कौतुक मला प्रोत्साहन देणारं ठरलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा विनम्रता हा गुण. जपानमधल्या या गुणाबद्दल मी ऐकून होते, पण जेव्हा तिथल्या पहिल्याच माणसाला भेटले आणि त्याचा एवढा छान स्वभाव प्रत्यक्ष अनुभवला तेव्हा खरं म्हणजे क्षणभर त्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. एक जपानी शास्त्रज्ञ जर इतका साधा, मनमोकळ्या स्वभावाचा असेल तर संपूर्ण जपान किती सुंदर असेल याचा विचार मी करत होते. आणि खरंच गेल्या तीन वर्षांत जपानमध्ये अनेक चांगल्या लोकांच्या गाठीभेटी झाल्या आहेत.

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह

जपानमधल्या तरुण पिढीबद्दल मला फारच नवल वाटलं. मुलं वयात आली की त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्यांनी आई-वडिलांपासून वेगळं राहावं अशी संस्कृती इथे आहे. पण माझ्या एका सीनिअर मैत्रिणीचा मुलगा वेगळा राहायला निघाला आणि त्याच्या तयारीत त्या असताना आमची भेट झाली. तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्ही हे सत्य कसं स्वीकारता? त्यावर त्या फारच दु:खी होऊन उत्तरल्या की, हल्लीची पिढी या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावते आहे. त्यांना गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळते आहे. त्यामुळे ते कोणतीही जबाबदारी स्वीकारत तर नाहीच, परंतु आई-वडील किंवा त्यांच्या घराकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. पालक आणि मुलांचं खूपच छान नातं असेल तर एखादं घर याला अपवाद ठरतं. त्यांचा पहिला पगार आवर्जून आई-वडिलांना देतात. पण पालकांनी मुलांकडून पैसे घेणं हीसुद्धा इथली संस्कृती नाही. त्यामुळे पालक त्यांच्याकडून फारशी अपेक्षाही ठेवत नाहीत. जी मुलं पालकांच्या हक्काची नाहीत ती मित्र-मैत्रिणी, पती-पत्नी आदी नात्यांना महत्त्वाचं स्थान कसं देऊ शकतील? त्यांना कोणीही प्रश्न विचारू शकत नाही किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हक्कही गाजवू शकत नाही. माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीशी या विषयावर बोलताना मी तिला ही परंपरा आणि भारतातील परंपरा यातील फरक समजावून सांगितला. तेव्हा तिचे डोळे भरून आले आणि तिला भारतीय परंपरेचं अप्रुप वाटू लागलं.

‘त्सुकुबा’ हे शहर सायन्स सिटी म्हणून ओळखलं जातं. इथे बऱ्याच सायन्स इन्स्टिटय़ूट्स आहेत, मात्र इथल्या तरुणाईला अवघड प्रकारचं शिक्षण नकोसं वाटतं. डॉक्टर, इंजिनीअर, सायन्टिस्ट, पोलीस, डिफेन्स अशा उच्चपदांचं शिक्षण घेण्याकडे त्यांचा तितकासा कल दिसत नाही. या क्षेत्रातील नोकरीच्या संधीला त्यांच्याकडून तुलनेने दुय्यम स्थान दिले जाते. शिक्षक म्हणून शाळेत किंवा हॉटेल, हॉस्पिटल आदी खूप वर्दळीच्या ठिकाणी काम करणं म्हणजे त्यांना वेळ वाया घालवल्यासारखं वाटतं. ओव्हर टाइम वगैरे गोष्टींमुळं ते हे काम शक्यतो टाळतात. ठरावीक वेळ असणाऱ्या नोकऱ्यांना ते प्राधान्य देतात. एमबीए, मार्केटिंग, अ‍ॅनिमेशन, नवनवीन वेबसाइट लाँच करणं या प्रकारचे व्यवसाय त्यांना आवडतात. परदेशातील शिक्षणाचं त्यांना फारच आकर्षण आहे. फार काही मोठ्ठी स्वप्नं बघून ती साध्य करण्याचं ध्येय ते डोळ्यापुढे ठेवत नाहीत. ज्युदो, कराटे, मार्शल आर्ट, जिम, कॅलिग्राफी, पियानो-गिटारवादन, पैसा कमावणं हे त्यांचे छंद. माझ्या दोन समवयस्क मैत्रिणींपैकी एक मोठय़ा हॉटेलमध्ये मॅनेजर आणि दुसरी डेंटिस्ट आहे. पण त्या या कामाला कंटाळलेल्या आहेत. कामाची वेळ आणि पगार या दोन्ही गोष्टी फारच किचकट वाटतात त्यांना.

खेळामध्ये जपान फारच अग्रेसर देश आहे. मध्यंतरी झालेल्या एशियन गेममध्ये चीन प्रथम आणि जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. अगदी लहानपणापासूनच स्विमिंग, बेसबॉल, बॅटमिंटन, टेनिस, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक, सायकलिंग, ज्युदो-कराटे आदी विविध खेळांमध्ये बहुसंख्य जपानी लोक आवडीने सहभागी होतात. त्यांच्या या जीवनशैलीचा प्रभाव आमच्यावर न पडता तरच नवल. त्यामुळे आम्ही दोघंही दर वीकएण्डला बॅटमिंटन, बास्केटबॉल असे अनेक खेळ खेळू लागलो. काही दिवसांनी मी जिमला जाणं सुरू केलं. या जिमची खासियत म्हणजे दिवसभरात आपण कितीही तास आणि केव्हाही जाऊ  शकतो. तिथे सगळ्याच प्रकारचे स्टुडिओ प्रोग्राम आहेत. उदाहरणार्थ- जिम्नॅस्टिक, मार्शल आर्ट, ज्युदो-कराटे, स्विमिंग, बेली डान्स अशा अनेक गोष्टी एकाच ठिकाणी शिकायला मिळतात. माझ्या जिम ट्रेनरला जगातला सर्वोत्कृष्ट जिम ट्रेनर व्हायचं असून तो त्यासाठी आवश्यक असणारी मेहनतही घेतो आहे.

जपान डिजिटल टेक्नॉलॉजीचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणजेच सगळी कामं आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली जातात. त्यामुळे देश प्रगत आहे, परंतु पुढच्या पिढय़ा खूपच आळशी आणि बेजबाबदार होत चालल्या आहेत. तरुणाईला परदेशाचं आकर्षण असलं तरी ते काही गोष्टींसाठी किंवा तात्पुरतंच ठरतं. कायमस्वरूपी त्यांना जपान सोडून राहता येणं शक्य नाही. जपानसारखा विकसित आणि सुरक्षित देश दुसरा कोणताच नाही, हे या मुलांना माहिती आहे. स्मार्ट फोन्स वापरण्याचं त्यांचं प्रमाणही फारच वाढतं आहे. वयात आलेली ९५ टक्के मुलं फोन आणि टॅब्ज वापरत आहेत. इथे प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर चालणारी-जोडलेली आहे. काही मिनिटांसाठीदेखील इंटरनेट सेवा बंद आहे, असं कधीही अनुभवाला आलेलं नाही. तरुणाईला जंक फूड फारच प्रिय आहे. त्यामुळे घरी स्वयंपाक करण्याची ते जराही तसदी घेत नाहीत. जपानमध्ये बाहेर जे काही मिळतं तेच घरातही असतं. त्यामुळे ते कुठं खातोय, याला काही फारसं महत्त्व नाही. मी काही भारतीय पदार्थ माझ्या मैत्रिणींना शिकवले, ते पदार्थ त्या आवर्जून करतात. सुपर मार्केट, रेस्टॉरंट, मॉलसारख्या ठिकाणी ते खाणं पसंत करतात. त्यांच्या या चुकीच्या सवयीमुळे त्वचेच्या अ‍ॅलर्जीचं प्रमाण वाढतं आहे. ऑरगॅनिक फूडचा जेवणात समावेश नसल्यामुळे पोषक आहाराचा अभाव आढळू लागला आहे. ड्रिंक्सचं प्रमाण फारच आहे. ‘जपानीज साके’ हे पेय फार प्रसिद्ध असून ते सगळेच घेतात.

लग्नाच्या बेडीत अडकणं जपानी तरुणाईला पसंत नाही. ते हा विषय खूप लांबणीवर टाकतात किंवा लग्न करतच नाहीत. कारण त्यांना स्वातंत्र्य हवं असतं आणि जबाबदारीचं ओझं नको असतं. स्वत:चा पैसा दुसऱ्यासाठी खर्च करायला ते तयार नसतात. त्यामुळे त्यांना आमच्याविषयी नेहमीच कुतूहल वाटतं. आपली भारतीय कुटुंबपद्धती ही जपानी लोकांना फार आवडते. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात ते फारसा रस घेत नाहीत. ४३ टक्केतरुणाई व्हर्जिन तर ६४ टक्के कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध नसलेले लोक आहेत. पुरुष स्त्रियांबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी घाबरतात. उरलेल्यांपैकी काही शक्यतो लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहणं पसंत करतात. त्यातही कुणाला हवा तसा योग्य जोडीदार मिळाला नाही तर शारीरिक उपभोगासाठी पॉर्न बघतात. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बाहुल्या किंवा अन्य काही उपकरणांचा वापर केला जातो. प्रत्येक गोष्टीसाठी मानवीच साथ हवी असं ते गृहीत धरत नाहीत. समलिंगी संबंधांना इथे सरकारमान्यता आहे. जपानची लोकसंख्या कमी होण्याचं हेदेखील एक मुख्य कारण आहे.

तरुणाईने पाश्चात्त्य पद्धतीचा पोशाख स्वीकारलेला दिसतो. ‘किमोनो’, ‘युकाता’ हे त्यांचे पारंपरिक पेहराव काही ठरावीक कार्यक्रमांत किंवा सणावारालाच घालतात. हिनामसुरी, सकुरा, समर फेस्टिवल, स्नो फेस्टिवल, चेरी ब्लॉसम अशा प्रसंगी ते किमोनो आवर्जून घालतात. बाकीच्या वेळी ग्लोबल फॅशन स्वीकारली जाते. माझ्याकडचा ‘किमोनो’ मी सणावाराला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी नेहमी घालते. भूकंप, त्सुनामी, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींना तरुणाई सहजपणे सामोरी जाते. त्यांच्या रोजच्या कामात फारसा खंड ते पडू देत नाहीत. पहिल्यांदा भूकंपाचे हादरे अनुभवल्यावर मी खूप घाबरले होते. लाकडाचं घर संपूर्ण हलतं, भांडी-वस्तू पडतात. भूकंप आल्यास त्वरित घराबाहेर पडायचं असतं. सगळ्यांच्या दारात नेहमी अर्थक्वेक फूडकिट ठेवलेला असतो आणि तो घेऊन पळायचं असतं. या गोष्टीचा विचार करताना लक्षात आलं की, आपत्तीच्या वेळी या गोष्टी लक्षात राहणं आणि त्यांचं उपयोजन होणं गरजेचं आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे कितीही मोठी आपत्ती असली तरी चार-सहा दिवसांत पुन्हा सगळं सुरळीत होतं. तरुणाईचा कल झालेलं नुकसान भरून काढण्याकडे जास्त असतो. देवधर्मावर तरुणाईचा फारसा विश्वास नाही. बौद्ध धर्म मोठय़ा प्रमाणात स्वीकारला गेल्यामुळे शांतीचा मार्ग अवलंबला जातो. तसंच नवीन वर्षांसाठी, नैसर्गिक आपत्तींतून संरक्षण व्हावं म्हणून, बदलत्या ऋतूंसाठी ते प्रार्थना करतात. काही प्रमाणात ख्रिस्त धर्मही मानला जातो. इथल्या बहुतांशी बौद्ध मंदिरांत आम्ही गेलो.

जपान हा खूप निवांत देश आहे. इथे मला ‘स्व’चा शोध लागला. स्वत:साठी मिळालेल्या वेळेचं सोनं करायचा प्रयत्न मी केला. जपानी संस्कृती जाणून घेत घेतच मी जपानी भाषाही शिकते आहे. इथे आल्यापासून ध्यान करण्याची सवय लागली. चित्ती असो द्यावे समाधान, ही वृत्ती अंगी बाणवता आली पाहिजे हे कळलं. राजकारणात तरुणाईला फारसा रस दिसत नाही. अत्यल्प प्रमाणात मतदान होताना दिसते. राजकारणातील नेत्यांची नावं-कामं त्यांना माहिती नसतात. या परिस्थितीत बदल होण्यासाठी जपानी सरकार प्रयत्नशील आहे. ऑफिसमध्येही फारसं राजकारण खेळलं जात नाही. नेमक्या भाषेत आपल्या चुका सांगितल्या जातात. टीमवर्क खूप छान आहे. मी फूड फॅक्टरीत काम करते, पण मला कधीही कामाचा ताण जाणवला नाही. विनम्रपणा, आदर, वक्तशीरपणा, मदतीसाठी तत्परता, स्वच्छता, शिस्तबद्धपणा आणि निसर्गसौंदर्याचं जतन या गोष्टींमुळे इथल्या परंपरा आणि नवता अधिकाधिक जाणून घ्याव्याशा वाटू लागतात.

viva@expressindia.com