सायली सोमण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागच्या काही आठवडय़ांपासून आपण फॅशनच्या क्षेत्रात क्रांती कशी झालीकिंवा नवनवीन फॅशन ट्रेंड्स कसे जन्माला आले आणि त्याला कारणीभूत ठरलेल्या काही सामाजिक, राजनैतिक, आर्थिक इत्यादी घटना तसेच व्यक्तिमत्त्वांबद्दल बरंच काही जाणून घेतलं. त्या दरम्यान आशिया खंडात किंबहुना आपल्या देशात पण या घटनांचा बराच प्रभाव पडत गेला आणि लोकांच्या राहणीमानातील आवडीनिवडीत देखील काळाबरोबर बरेच प्रगतीशील बदल होत गेले. मात्र या सगळ्याचा आपल्यावरचा प्रभाव मर्यादित प्रमाणात होत असतानाच देशात इंग्रजांची सत्ता आली आणि भारतीय फॅशन क्षेत्रात एका वेगळ्याच क्रांतीचा जन्म झाला ते म्हणजे ‘खादी’. तब्बल दोन ते तीन शतकांहून अधिक काळ खादी आपल्याबरोबर आहे. गेल्या काही दशकांमध्ये हळूहळू का होईना खादी ही भारतीय फॅ शन जगतातील एक अत्यंत महत्त्वाचा फॅशन ट्रेंड ठरली आहे.

खादी म्हणजे हातांनी चरखा किंवा तत्सम यंत्र फिरवून बनवलेलं कॉटन, सिल्क किंवा लोकरीचं सूत. हे एक अत्यंत व्हर्सेटाईल फॅब्रिक मानलं जातं. खादी हे असं फॅब्रिक आहे जे गरमीत किंवा अगदी कडक उकाडय़ातही थंडपणा देतं आणि कडकडत्या थंडीत तेवढीच ऊबही देतं. याशिवाय ते मजबूत आणि टिकाऊ  कापड तर आहेच. भारतात ब्रिटिशांचे राज्य असताना गांधीजींच्या स्वदेशी चळवळीमुळे कॉटन खादीपासून बनलेल्या कपडय़ांचा सर्वात जास्त वापर केला गेला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जसजसे इतर देशांतील संस्कृती आणि इतर टेक्सटाईल किंवा फॅ शनमधील डेव्हलपमेंट्सभारतात अवलंबायला सुरुवात झाली तसतशी खादीच्या कपडय़ातील मर्यादा लोकांना जाणवायला लागल्या. काळाप्रमाणे विदेशातील कपडे किंवा कापड उत्पादनाला गती मिळाली आणि त्या कपडय़ांमध्ये वैविध्य असल्याने तिकडच्या कापड संस्कृतीला आपल्याकडे पुन्हा वाव मिळाला आणि जास्त वेळात कमी उत्पादन देणाऱ्या खादीचा लवकरच सगळ्यांना विसर पडला. एक विचारधारा त्यामुळे अशीही होती की राजकारणी किंवा सामाजिक कार्यात असणारी व्यक्तीच खादीचे कपडे वापरतात. खादीचा वापर तेवढय़ापुरताच उरला होता. तेव्हा खादी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. त्याचा विसर पडू नये म्हणून १९५७ मध्ये भारतीय सरकारने ‘केव्हीआयसी’ म्हणजेच ‘खादी व्हिलेज अ‍ॅण्ड इंडस्ट्री कमिशन’ची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था खादीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते आहे, खादीच्या उत्पादनातील निरनिराळ्या नवीन तंत्रांबद्दल सतत प्रयोगशील आणि उत्पादकांना प्रोत्साहन देत राहिली. अखेर फॅ शनचे चक्रही नेहमीप्रमाणे फिरून जुन्याकडे परत येते. त्याप्रमाणे १९९० मध्ये के व्हीआयसीने खादीला पुन्हा ओळख मिळवून देण्यासाठी एका फॅशन शोचे आयोजन केले. या फॅशन शोच्या माध्यमातून खादीला नवीन ओळख आणि रूप देण्यात आले. जिथे खादीपासून बनवले गेलेले जवळजवळ ८० फॅशनेबल स्टाइल्सलोकांसमोर सादर झाल्या. यानंतर प्रसिद्ध फॅशनडिझायनर रितू बेरी यांनी दिल्ली क्राफ्ट म्युझियमच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ या शोमधून त्यांचे पहिले खादीचे अत्यंत स्टायलिश कपडय़ांचे कलेक्शन लोकांसमोर आणले. यानंतर वेंडेल रॉड्रिक्स, सब्यसाची, राजेश प्रताप सिंग यांसारख्या अनेक डिझायनर्सनी त्यांच्या कन्टेम्पररी डिझाइन्सद्वारे खादीला फॅशन जगतात एक हाय एंड फॅशन वेअरम्हणून मान्यता द्यायचे मनावर घेतले असे नक्कीच म्हणता येईल. या डिझायनर्सच्या बरोबरीने फॅब इंडियासारख्या इतर खादी आणि कॉटन ब्रॅण्ड्सनीही खादीच्या नवनवीन उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले. म्हणूनच आज हे ब्रॅण्ड्स अशा कपडय़ांसाठीच जास्त ओळखले जातात.

१९९० पर्यंत खादीचं सूत आणि फॅब्रिक हे मोजक्या प्रकारात आणि रंगात मिळत असल्यामुळे त्याचा खप आणि हे कापड विणायला लागणारा वेळ ही प्रामुख्याने खादीच्या कमी खपामागची कारणे होती. पण रितू बेरी, सब्यसाची, रोहित बाल, वेंडेल रॉड्रिक्स अशा अनेक डिझायनर्सनी खादी उत्पादनात निरनिराळे प्रयोग करून बघितले म्हणूनच आपल्याला आज हे सूत किंवा फॅब्रिक अनेक रंगांत बघायला मिळतंच शिवाय खादी कॉटन, खादी लिनेन, खादी सिल्क, खादी वुलन, कॉटन लिनेन खादी, लिनेन सिल्क खादी.. अशा अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आणि शिवाय याच्या उत्पादन तंत्रातही नवनवीन शोध लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यापासून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या मोदी कुर्ता आणि जॅकेटमुळे खादी उत्पादनाला नव्याने परत एक गती आली आहे.

पूर्वी खादी हे मळखाऊ किंवा फिक्या रंगांचे फॅब्रिक म्हणून ओळखले जायचे. पण आज हेच फॅब्रिक अनेक उठावदार, उत्कृष्ट रंगांमध्ये उपलब्ध आहे. फक्त प्लेन खादी फॅ ब्रिक राहिलेलेनाही तर त्यावर केले गेलेले वारली प्रिंटिंग, फ्लोरल प्रिंटिंग किंवा पेंटिंग वेगवेगळ्या प्रकारच्या नाजूक एम्ब्रॉयडरी असे अनेक सरफेस ऑर्नमेंटेशनचे प्रयोगही त्यावर करता येतात. आज खादी ही एक अत्यंत फ्रेश आणि एव्हरग्रीन फॅ शनम्हणूनच ओळखली जात आहे. फक्त अंगात घालण्याच्या कपडय़ांपर्यंत किंवा पांघरायचे कापड इथपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही तर आज होम फर्निशिंग, बॅग्ज अशा विविध उत्पादनांमध्येही खादीला तितकीच मागणी आहे. एवढंच नाही तर खादीपासून बनवले जाणारे शाम्पू, साबण अशी वेगळी उत्पादनेही लोक आनंदाने खरेदी करतात.

त्याकाळी खादीचा शोध एक फॅशनची गरज म्हणून नाही तर आर्थिक आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याची गरज म्हणून झाला होता. पण आज भारतातील अनेक फॅ शन डिझायनर्स खादीला फॅ शनवेअर म्हणून मान्यता मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही तितकेच प्रयत्न करताना दिसतात. २०१६च्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार इतक्या वर्षांत पहिल्यांदा खादी उत्पादनातून तब्बल पन्नास हजार कोटींचा खप झाल्याचे दिसते. त्यामुळे खादीला एक अत्यंत आश्वासक भविष्य आणि वैभवी वर्तमान आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही.