चीजच्या वेटोळ्याप्रेमात अडकवणारा अग्रगण्य पदार्थ म्हणजे ‘पिझ्झा’ होय. इटलीत आजोळ असलेल्या या पिझ्झाचा नैसर्गिक स्वाद टिकवत, त्याच्यावरचं चिजीप्रेम अधिक स्वादिष्ट करत खास व्हिवाच्या तरुण वाचकांसाठी शेफ अमृता रायचंद यांनी पिझ्झाच्या भन्नाट पाककृती शेअर केल्या आहेत.
घरगुती पिझ्झा बेस
साहित्य : पाऊण कप मैदा, १ चमचा ड्राय यीस्ट, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, पाव कप कोमट पाणी
कृती : एका भांडय़ात थोडे गरम पाणी घ्या. त्यात ड्राय यीस्ट, साखर घालून एकत्र करा आणि झाकून ठेवा. १० मिनिटांनी या मिश्रणाला फेस आलेला दिसेल. दुसऱ्या भांडय़ात पाऊ ण कप मैदा घ्या. त्यात हे मिश्रण ओता. थोडे मीठ आणि तेल घाला. मग हळूहळू हवे तसे गरम पाणी घालत मऊ सर पीठ मळून घ्या. ताणलेल्या रबरासारखे ते पीठ झाले पाहिजे. पीठ झाकणबंद भांडय़ात किमान दीड तास उबदार ठिकाणी ठेवा, म्हणजे चांगले फुगून वर येईल. पीठ वर येऊ लागले असे वाटले की ओवन २५० डिग्री सेल्सिअसला प्रीहिट करा.
यीस्टमुळे पीठात हवेचे बुडबुडे तयार होत असल्याने तेलाचा हात लावून पुन्हा ते थोडे मळून घ्या. पीठाचा मोठा गोळा घेऊन सुक्या मैद्यावर मध्यम गोलाकाराची जाडसर पोळी लाटावी. बेक करताना पोळी फुगू नये म्हणून पोळीवर काटय़ाने (फोर्क) टोचावे. प्रीहिटेड ओवनमध्ये साधारण ६ ते ८ मिनिटे बेक करून घ्यावे. अशाप्रकारे ताजाताजा पिझ्झा बेस पिझ्झासाठी वापरू शकता.
मिक्स व्हेजिटेबल पिझ्झा
साहित्य : पिझ्झा बेस, १ कप फ्लॉवर, पाव कप वांगी, पाव कप कांदा, पाव कप गाजर, पाव कप सिमला मिरची, अर्धा कप पालक, १ टोमॅटो, अर्धा कप पिझ्झा सॉस (किंवा टोमॅटो केचअप), २ चमचे लिंबाचा रस, १ चमचा गरम मसाला पावडर, पाव कप चाट मसाला पावडर, १ चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा ऑलिव्ह तेल, चीझ, ब्लॅक ऑलिव्ह.
कृती : पिझ्झा सॉस, लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, चाट मसाला पावडर, ऑलिव्ह ऑइल, हळद आणि लिंबाचा रस एकत्र करा. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात फ्लॉवर, वांगी, गाजर, सिमला मिरची आणि कांदा घालून परतून घ्या. पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉसचे मिश्रण पसरवा. थोडे मिश्रण राखून ठेवा. परतलेल्या भाज्या, टोमॅटो वरून घाला. त्यावर उरलेले पिझ्झा सॉसचे मिश्रण घाला. वरून चिरलेले ब्लॅक ऑलिव्ह आणि किसलेले चीझ घाला. प्रीहिटेड ओवनमध्ये पिझ्झा १० मिनिटांसाठी ठेवा. ओवनमधून काढून पाहिजे त्या आकारात तुकडे करून गरमगरम पिझ्झा सव्र्ह करा.
पिझ्झा चीझी बाईट
साहित्य : ४ मध्यम आकाराचे उकडून सोललेले आणि कुस्करलेले बटाटे, पाव कप बारीक चिरलेली रंगीत मिश्र सिमला मिरची, ५ ते ६ मशरूम बारीक चिरलेले, १ छोटा चमचा बारीक चिरलेला लसूण, चवीनुसार मीठ, ३ मोठे चमचे स्लाइस सॅण्डविच स्प्रेड, आवश्यकतेनुसार मैदा, तळणीसाठी तेल, ब्रेडचा चुरा, सव्र्ह करण्यासाठी लेटय़ूसची पाने, सव्र्ह करण्यासाठी चीज, सजावटीसाठी ताजी कोथिंबीर.
कृती : बटाटे, रंगीत सिमला मिरची, मशरूम, लसूण, मीठ आणि स्लाइस सॅण्डविच स्प्रेड एका वाडग्यात एकत्र करा. तयार मिश्रणाचे गोळे तयार करा. गोळे ब्रेडच्या मध्ये घोळवून त्यावरचे आवरण तयार करा. कढईत तेल गरम करा आणि सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत गोळे तळून घ्या. गरम गरम पिझ्झा चिझी बाईट्स लेटय़ूसच्या पानांसमावेत चीज आणि जॅलापानो डीपबरोबर सव्र्ह करा. त्यावर थोडी कोथिंबीर भुरभुरा.
पिझ्झा बॉल्स
साहित्य : पिझ्झा सॉस- पसरविण्याकरिता, बाजरीचे पीठ- आवश्यकतेनुसार, मैद्याचे पीठ- आवश्यकतेनुसार, तेल, मोझरेला चीझ आवश्यकतेनुसार, ३ सिमला मिरच्यांचे उभे काप- १ कप, मीठ चवीनुसार, मिरपूड चवीनुसार, लहान लाल सिमला मिरचीचे त्रिकोणी काप आवश्यकतेनुसार आणि काळ्या ऑलिव्हचे तुकडे, टोमॅटो केचअप.
कृती : १८० डिग्री सेल्सिअसवर ओव्हन गरम करा. बेकिंग ट्रेवर तेल लावा. ओटय़ावर थोडे पीठ भुरभुरून, कणीक नीट मळून घ्यावी. त्या कणकेचे समान गोळे बनवावे. प्रत्येक गोळ्याला पुरीच्या आकारात लाटून घ्यावे. प्रत्येक पुरीवर पिझ्झा सॉस पसरवा. किसलेले मोझरेला चीझ आणि रंगीत सिमला मिरचीचे काप ठेवा. आवश्यकतेनुसार मीठ आणि मिरपूड टाका. आणि त्या पुरीचे पुन्हा गोळे करा. त्यांना बेकिंग ट्रेवर ५ ते १० मिनिटे बाजूला ठेवा. बेकिंग ट्रेला आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये ठेवून १५ मिनिटे बेक करा. तयार पिझ्झा बॉल्स थंड करण्यासाठी बाजूला काढा. गरमागरम पिझ्झा बॉल सवर्ि्हग प्लेटवर काढून टोमॅटो केचअपसह सव्र्ह करा.
चीज रागी पिझ्झा
साहित्य : मोझेरेला चीज- ६ छोटे चमचे, बाजरीचे पीठ- अर्धा कप, मैदा- अर्धा कप, तेल, मीठ (चवीनुसार), ताजे यीस्ट- १० ग्रॅम, साखर अर्धा टीस्पून, हिरवी, पिवळी, लाल सिमला मिरची- प्रत्येकी एक, पिझ्झा सॉस- ३ छोटे चमचे, हिरवे दोडके-पिवळे दोडके अर्धा, मक्याचे दाणे- दोन मोठे चमचे, ऑलिव्ह गरजेनुसार
कृती : सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसवर गरम करावा. बेकिंग ट्रेला थोडे तेल लावून घ्यावे. एका भांडय़ात मैदा, बाजरीचे पीठ, लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा मीठ घालून एकजीव करा. दुसऱ्या भांडय़ात यीस्ट घ्यावे त्यात कोमट पाणी व साखर घालून एकजीव करावे. हे तयार मिश्रण थोडय़ा वेळासाठी बाजूला ठेवून द्यावे. मऊ सर कणीक भिजवून त्यात तयार यीस्ट घालावे. आवश्यकता असल्यास त्यात पाणी घालून कणकेचा गोळा तयार करावा. हा गोळा मऊ कापडात बांधून गरम जागी ठेवावा. हा गोळा फुलून तयार होईपर्यंत सिमला मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. ओटय़ावर मैद्याचे पीठ भुरभुरून तो कणकेचा गोळा पुन्हा एकदा नीट मळून त्याचे मध्यम चौकोनी काप करावेत. हे काप बेकिंग ट्रेवर ठेवून त्यावर पिझ्झा सॉस पसरावा. त्यावर तीन मोठे चमचे चीझ घालून दोडक्याचे काप, बारीक चिरलेली रंगीत सिमला मिरची आणि मक्याचे दाणे पसरवावेत तसेच चवीनुसार मीठ भुरभुरावे. उरलेल्या दोडक्याचे, रंगीत सिमला मिरच्या आणि ऑलिव्हच्या तुकडय़ांचा उपयोग करून एक चेहरा बनवावा, तो ट्रे ओव्हनमध्ये १५ मिनिटे बेक करावा आणि गरम गरम पिझ्झा सव्र्ह करावा.