लहानपणी आईकडून ऐकलेलं असतं की आम्ही बहिणी एकमेकींचे कपडे वापरायचो. त्यामुळे कपडय़ांमध्ये बरेच पर्याय मिळायचे. काळानुसार ही संकल्पना मागे पडली, पण कपाटात पडून राहणाऱ्या महागडय़ा कपडय़ांचं करायचं काय, हा प्रश्न सुटला नाही. त्यावर तोडगा म्हणून कपडे पुन्हा विकण्याची सोय करणाऱ्या वेबसाइट्सची गरज भासू लागली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवाळीचा मोसम सरला आणि लग्नाच्या मोसमाला सुरुवात झाली. ऐन दिवाळीमध्ये एथनिक ड्रेसेस, ट्रेंड्स, ज्वेलरीची बरीच चर्चा आपण केली. खरेदीही पार पडली. अर्थात हे ड्रेस येणारा लग्नाचा मोसम लक्षात घेऊन खरेदी केलेले असतात. साखरपुडा, संगीत, लग्न, रिसेप्शन अशा वेगवेगळ्या सोहळ्यांसाठी वेगवेगळे कपडे लागतातच. परत ते कपडे शक्यतो पुन्हा वापरायचे नाहीत किंवा सारखेच पाहुणे असतील अशा दोन लग्नांना किंवा कार्यक्रमांना घालायचे नाहीत, हा अलिखित नियम असतोच. आणि त्यासाठी अनेकदा कसरत करावी लागते. मग अशा वेळी हे महागडे ड्रेस पुन्हा कपाटात पडून राहतात. बरं इतर वेळी ऑफिस, कॉलेजला हे फॅ न्सी कपडे घालता येत नाहीत. पार्टीमध्ये हे कपडे घालण्याचे प्रसंगही कमीच येतात. बरं पुढच्या वर्षी नवे ट्रेंड, नव्या स्टाइल येतात आणि मागच्या वर्षीचे कपडे जुने वाटू लागतात. ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’चे बरेच पर्याय या काळात फॅशन लेखांमध्ये सुचवले जातात. पण हे सगळेच उपाय राबवणं शक्य होतंच असं नाही. अशा वेळी महागडे ड्रेसेस कपाटात ठेवून देण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. बरं त्यावर खर्च केलेली किंमत पाहता ते कपडे कुणालाही असेच देऊन टाकायलासुद्धा मन मानत नाही. अशा वेळी या कपडय़ांचं करायचं काय, हा यक्षप्रश्न बनून समोर नाचतो. आणि बाजारात जिथे प्रश्न असतो, तिथे त्याला उत्तर देणारे मार्गही मिळतात. असाच एक मार्ग आहे कपडे पुन्हा विकण्याचा.

तुमचे कपडे कपाटात पडून राहण्याचं कारण काय आहे? वर म्हटल्याप्रमाणे एकतर सणांच्या दिवसांमध्ये घेतलेले कपडे दोन-तीन कार्यक्रमांशिवाय अधिक वापरता येत नाहीत. त्यामुळे साहजिकच हे कपडे पडून राहतात. त्यानंतर बऱ्याचदा हौसेने आपण एखादा ड्रेस, कुर्ता, जीन्स विकत घेतो, पण घरी आल्यावर लक्षात येतं त्याचं फिटिंग बरोबर नाही. एकतर तो ढगळ आहे किंवा घट्ट. किंवा मॉलच्या प्रकाशात सुंदर दिसलेला ड्रेस प्रत्यक्षात मात्र तितका उठून दिसत नाही. कित्येकदा एखादा ड्रेस बरेच दिवस वापरूनही नवाच दिसतो. पण सतत वापरल्यामुळे तो वापरायचा कंटाळा येतो. काही ड्रेस ट्रेंडपुरतेच घेतले जातात. एक-दोनदा वापरले की काम झालं. असं म्हणता म्हणता कपाटात न वापरलेल्या कपडय़ांची यादी वाढतच जाते. बरं ही यादी पाहून नवीन कपडे विकत घेण्यासाठी मनातील आणि कपाटातील जागा कमी होऊ  लागते. साहाजिकच आता करायचं काय, हा प्रश्न असतो. नातेवाईक किंवा मैत्रिणीला हे कपडे द्यायचे म्हटलं, तर त्यावर खर्च केलेल्या हजारो रुपयांवर पाणी सोडावं लागणार. कारण नात्यामध्ये अशा बाबतीत पैसे मागणं अवघडलेपणाचं होतं. बरं त्याच बदल्यात त्यांच्याकडून एखादा छानसा ड्रेस मिळेल अशी अपेक्षा करणंही चुकीचं ठरतं. कित्येकदा इच्छा असूनही आपल्या साइजचं कोणीच नाही, म्हणूनही ड्रेस कोणाला देता येत नाही. त्यात एकमेकांचे ड्रेस वापरायचे म्हणजे ‘इगो’ दुखावण्याचे प्रसंगही येतात. अशा वेळी दोन वर्षांपूर्वी थेट कपडे विकत घेण्याऐवजी भाडय़ाने घेण्याचा उपाय आम्ही तुम्हाला सुचवला होता. महागडे ब्रॅण्ड, डिझायनर यांचे काही हजारांचे ड्रेस, साडय़ा, ज्वेलरी माफक दरामध्ये भाडय़ाने घेण्याची सोय अजूनही काही वेबसाइट करून देतात. अगदी लग्नात नववधूसाठीही डिझायनर लेहेंगा, साडी या पर्यायातून घेता येते. कारण कित्येकदा स्वत:च्या लग्नात घेतलेला लेहेंगा इतर कार्यक्रमांमध्ये अधिकच उठून दिसतो, त्यामुळे घालता येत नाही. अशा वेळी त्या दिवसापुरता भाडय़ाने लेहेंगा घेणं कधीही उत्तम. या पर्यायाने एकच नाही तर प्रत्येक समारंभासाठी डिझायनर कपडे भाडय़ाने घेता येऊ  शकतात. पण तरीही आपली खरेदीची हौस यातून भागत नाही. त्यामुळे यंदा वेबसाइट एक नवा फंडा घेऊन आल्या आहेत. तो म्हणजे वापरलेले कपडे पुन्हा विकण्याचा. तसं एखाद्याने वापरलेले कपडे आपण वापरणं हे काहीसं न पटणारं असतं. एरवी नातेवाईकांमध्ये कपडय़ांची अशी अदलाबदली झालीच आणि ती कोणाच्या लक्षात आली तर त्यामुळे होणारी अगतिकता जीवघेणी असते. त्यामुळे कितीही इच्छा असली, तरी हा पर्याय सहसा निवडला जात नाही. पण या वेबसाइटवरील कारभार दोन अनोळखी व्यक्तींमधील असतो. कित्येकदा दोघेही वेगवेगळ्या शहरातील किंवा राज्यात राहणारे असतात. त्यामुळे त्यांचा थेट संबंध येणं शक्य नसतं. तसंच या वेबसाइट तुमच्यातर्फे तुमची जाहिरात सोशल मीडियावर करत नाही. त्यामुळे या व्यवहारांबाबत गुप्तता ठेवली जाते.

अर्थात रिसेल किंवा वस्तूंची पुनर्विक्री ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाही. ’७ सारख्या वेबसाइट जुने गॅजेट, पुस्तकं, गाडय़ा, फर्निचर अशा कित्येक वस्तू विकण्याची सोय करून देत आहेतच. पण त्या जोडीला कपडे, दागिने, शूज या फॅशन विभागातील वस्तूच्या पुनर्विक्रीसाठी वेगळ्या वेबसाइट्सची गरज आता भासू लागली आहे. त्यामुळे Elanic.in, swap.com, estashee.com, spoyl.in अशा अनेक वेबसाइट सध्या इंटरनेटवर येऊ  लागल्या आहेत. यातील बहुतेकांचे अ‍ॅप आहेत. त्यामुळे मोबाइलवर घरबसल्या कपडे विकण्याची सोय यात आहे. लहान मुलं, स्त्रिया, पुरुष यांचे कपडे यासोबत दागिने, बॅग, शूज, बेल्टसारख्या अ‍ॅक्सेसरीजसुद्धा यावर तुम्ही विकू शकता. याची प्रक्रियासुद्धा तितकीच सोपी आहे. तुम्हाला विकायच्या वस्तूचे फोटो या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर अपलोड करायचे. सोबत त्यांची किंमत लिहायची. काही वेबसाइटवर ग्राहकाच्या मागणीनुसार किंमत वरखाली करायची सोयही असते. नंतर एखादा तुमची वस्तू विकत घेण्यास उत्सुक असेल, तर त्याच्याकडून पैसे घेऊन तुमच्याकडून त्याला वस्तू दिली जाते. ग्राहकाकडून आलेले पैसे वेबसाइटच्या खात्यात जमा होतात. त्यातून त्यांचं ठरावीक कमिशन वजा करून उर्वरित किंमत तुम्हाला परत केली जाते. साधारणपणे तुम्ही वस्तूची निश्चित केलेल्या किमतीच्या ८५ टक्के किंमत तुम्हाला परत मिळते. या किमतीत तुम्हाला वाटल्यास त्या वेबसाइटवरून दुसरी वस्तूही विकत घेऊ  शकता. त्यावर काही प्रमाणात सवलत देण्याची सोयही वेबसाइट करते. या प्रक्रियेत कित्येकदा मूळ किमतीच्या निम्म्या-अधिक किमतीत कपडे तुम्हाला मिळतात. तसेच तुमच्या कपाटातील जुने कपडे काही अंशी का होईना कमी करायलासुद्धा याची मदत होते.

अर्थात, या वेबसाइटवर खरेदी-विक्री करताना त्यांचे नियम पूर्ण वाचून घ्या. तसेच कपडे विकत घेण्याआधी संबंधित मालकाशी नीट चर्चा करून साइज, फिटिंग, कपडय़ांची स्थिती याची नीट माहिती करून घ्या. तसेच कपडे विकताना त्याबद्दल व्यवस्थित माहिती द्या. एखादा डाग असेल किंवा कपडय़ांना रफू केलेलं असेल, तर तशी आगाऊ  माहिती द्या. कारण ग्राहकाने काहीही कारणाने कपडे परत केल्यास तुम्हाला दंडही बसू शकतो. पण सगळ्या बाबींची व्यवस्थित खातरजमा केल्यावर मात्र हा पर्याय सहज वापरू शकता. त्यामुळे कपडे कमी करण्याचा हा नवा ‘’७’ मार्ग तुमच्या पथ्यावर पडणारा आहे यात शंका नाही!

मृणाल भगत viva@expressindia.com