हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

एखाद्या व्यवसायापासून प्रेरणा घेऊन स्वत:चं अस्तित्व निर्माण करणं सोपं नसतंच, पण आपल्या प्रेरणास्थळासाठीच स्पर्धा निर्माण करणं आणखी कठीण. बर्गर किंग या जगप्रसिद्ध बर्गर चेनने मात्र हे साध्य करून दाखवलं. जगाच्या विशिष्ट कोपऱ्यात प्रसिद्ध असलेलं बर्गरसारखं फास्टफूड संपूर्ण जगभरात नेत शहरी जीवनातील एक महत्त्वपूर्ण फूड आऊटलेट ठरलेल्या बर्गर किंगची ही कहाणी!

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
Mumbai Street Style Masala Pav Easy recipe
मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
Vidarbha special tondlichi masala bhaji recipe in marathi eating pointed gourd is good for health
विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी
Sago French Fries
चटपटीत खावंसं वाटतंय? मग बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; ही घ्या सोपी रेसिपी…

अमेरिकेतील फ्लोरिडामधल्या जॅक्सनव्हिले येथे राहणारा केथ क्रॅमर, ‘मॅकडोनाल्ड’ या सुप्रसिद्ध फूड चेनने अतिशय प्रभावित झाला होता. आपल्या पत्नीचे काका मॅथ्यू बर्नस् यांच्या मदतीने त्याने बर्गर शॉप सुरू केलं.  त्यासाठी स्पेशल ग्रिल मशीन त्यांनी विकसित केली. या इन्स्टा ब्रॉयलरवरुन त्यांनी नाव निश्चित केलं ‘इन्स्टा बर्गर किंग’. हळूहळू जम बसत गेला आणि बर्गर किंगच्या शाखा विस्तारत  गेल्या.

पुढे १९५४ मध्ये कॉन्रेल विद्यापीठातील दोन मित्र जेम्स मॅकलेमोर आणि डेव्हिड एजर्टन यांनी ‘बर्गर किंग’ची शाखा सुरू केली. मियामीसारख्या मेट्रोपोलिटीन भागात उत्तम प्रतिसाद मिळणं स्वाभाविक होतं. इन्स्टा ब्रॉयलरमध्ये सुधारणा करत गॅस ग्रिलवर भर देत त्यांनी फ्लेम ब्रॉयलर आणला. दरम्यान केथ आणि मॅथ्यू यांच्यात काही बिनसल्याने मॅकलेमोर आणि एजर्टन यांनी संपूर्ण कंपनी त्यांच्याकडून विकत घेतली. ‘बर्गर किंग’ची नव्याने रचना केली. आणि मॅकडोनाल्डपेक्षा स्वत:चं वेगळेपण अधोरेखित करत त्यांनी  बर्गर किंगची ओळख असणारा ‘व्हुपर’ आणला. आजही हा व्हुपर बर्गर किंगचं मुख्य आकर्षण आहे.

पिल्सबरी या नामांकित कंपनीने १९६७मध्ये ‘बर्गर किंग’ला विकत घेतलं. एवढय़ा मोठय़ा कंपनीच्या बळावर ‘बर्गर किंग’ हा अमेरिकत मॅकडोनाल्डच्या खालोखाल दुसरी मोठी बर्गर चेन ठरला. विशेष म्हणजे पुढील विकासासाठी पिल्सबरी कंपनीने चक्क मॅकडोनाल्डचे सर्वेसर्वा डोनाल्ड स्मिथ यांनाच आमंत्रित केलं. त्यांनी काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. जी मंडळी ‘बर्गर किंग’ची शाखा सुरू करतील त्यांच्यावर काही बंधनं लादण्यात आली. दुकानापासून घर तासाभराच्या ड्राइव्हवर हवे अशा काही महत्त्वपूर्ण अटी त्यात होत्या. जेणेकरून कामावर कमी दांडय़ा होतील आणि व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित होईल. मॅकडोनाल्डच्या मिस्टर डोनाल्डप्रमाणे मुलांमध्ये ‘बर्गर किंग’ प्रसिद्ध होण्याकरता नवे पात्र आणले गेले. हा ‘बर्गर किंग’ जादूगार होता. ‘विझार्ड ऑफ फायर’ आणि ‘सर शेक अ लॉट’ अशा गमतीदार कल्पना आणल्या गेल्या.

मधला काळ ‘बर्गर किंग’साठी पडता होता. ग्रॅण्ड मेट्रोपॉलिटीन कंपनीने तेव्हा ‘बर्गर किंग’चे हक्क विकत घेतले. त्यांनीही छोटे छोटे बदल केले. सॉफ्ट िड्रक पार्टनर बदलला. डिस्नी फिल्म्ससोबत हात मिळवले आणि संगठन केलं. १९९२च्या हरिकेनमध्ये ‘बर्गर किंग’च्या मुख्यालयाचं मोठं नुकसान झालं. पण त्यावरही मात करत पुन्हा एकदा  ‘बर्गर किंग’ने भरारी घेतली. सध्या सुप्रसिद्ध कॅनेडियन साखळी टीम हॉर्टन्सकडे ‘बर्गर किंग’ची मालकी आहे. १३,००० आऊटलेटमधून ‘बर्गर किंग’ जगभर विस्तारलं आहे. फक्त ऑस्ट्रेलियात कॉपीराइट अडचणीमुळे बर्गर किंग ‘हंग्री जॅक्स’ नावाने ओळखलं जातं.

‘बर्गर किंग’चा लोगो हा पाहताचक्षणी बर्गरचा अनुभव देतो. त्यांची टॅगलाइन वर्षांनुवष्रे ‘हॅव इट युअर वे’ अशी होती ती आता ‘बी युअर वे’ अशी बदलली गेली आहे. तुम्हाला हवं तेच करा असा सकारात्मक विचार त्यात दडलेला आहे.

बर्गर हे पूर्णान्न नाही. ते फावल्या वेळातलं चटकदार खाणं म्हणता येईल. तरी या इतक्या लहानशा खाद्यपदार्थाच्या मार्फत बाजारपेठेत स्वत:चं नाव निर्माण करता येणं, ही निश्चितच दखल घेण्याजोगी गोष्ट! ‘बर्गर किंग’चा व्हुपर भल्याभल्यांना एका फटक्यात गार करतो. पोट भरल्याचं समाधान देतो. हे पौष्टिक खाणं नाहीच उलट असंख्य कॅलरीज पोटात ढकलल्या जाण्याची ही शाश्वतीच! तरी इथे गर्दी होते. त्यामागची कारणमीमांसा बर्गरबद्दलचं प्रेम अशी केली तरी त्याहून अधिक सतत केलेले व्यावसायिक प्रयोग, व्यावसायिक क्लृप्त्या यांना अधिक श्रेय द्यावं लागेल. भल्या मोठय़ा बर्गरचा चावा घेताना त्या विशाल ‘आ’काराने र्अध पोट भरल्याचा भास होतो. बाकीचं काम आतले चटकदार घटक करतात. म्हणूनच निव्वळ जिभेच्या चोचल्यांकरता या किंगपुढे भलेभले पुन्हा पुन्हा शरणागती पत्करतात.

viva@expressindia.com