S, M, L, XL, XXL हे शब्द एखाद्या तयार कपडय़ाच्या लेबलवर वाचले की, आपल्याला लगेच लक्षात येतं की, हे कपडय़ाच्या मापाबद्दल लिहिलं आहे. साइझ दर्शविण्यासाठी हे संकेत वापरले जातात. S म्हणजे स्मॉल, M म्हणजे मध्यम साइझ, L म्हणजे एक्स्ट्रा लार्ज; पण कधी कधी या S, MX सारख्या साइझ लेबलखेरीज इतरही काही लेबल्स कपडय़ांवर दिसतात. बऱ्याचजा त्यावर त्रिकोण, गोल, इस्त्रीसारखे आकार असतात. या सगळ्यांचा अर्थ आपल्याला माहिती असतो का? या केअर लेबलविषयी थोडंसं..

नवनवीन स्टाइलचे मस्त ब्रॅण्डेड कपडे घालून मिरवायला कोणाला आवडत नाही. स्टाइल स्टेटमेंटसाठी, उठून दिसण्यासाठी आपण चांगल्या ब्रॅण्डचे महागडे कपडे तितकेच चांगले पैसे देऊन मॉलमधून खरेदी करतो; पण कधीकधी एका धुलाईत कपडय़ांची पार रया जाते, तर कधी कपडे इस्त्रीला दिले की, परत येताना वेगळेच होऊन येतात. मग आपण इस्त्रीवाल्याला दोष देत बसतो आणि एवढा महाग कपडा तरी असा कसा निघाला म्हणून स्वत:ला कोसत बसतो; पण कुठलाही तयार कपडा पहिल्यांदा धुताना त्यावर लिहिलेल्या सूचना वाचणं आवश्यक असतं. ब्रॅण्डेड जमान्यात वेगवेगळ्या प्रकारची टेक्स्टाइल वापरात आली आहेत. प्रत्येक कापडाचा पोत वेगळा तशी त्यांची काळजी घ्यायची पद्धतही वेगळी. कोणताही कपडा जास्त काळ आणि नव्यासारखा राहावा असं वाटत असेल तर कपडय़ाची योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. विशेषत: कपडा धुताना आणि इस्त्री करताना कशी काळजी घ्यावी याविषयी ब्रॅण्डेड कपडय़ांवर सूचना लिहिलेल्या असतात. त्या बऱ्याच वेळा चिन्हांकित भाषेत असतात. त्यांचा अर्थ माहीत असावा लागतो.

 

कधी तरी इस्त्री करताना एखादा ड्रेस पटकन जळतो, तेव्हा आपल्याला वाटतं की, बाकीच्या कपडय़ांना तर बरोबर इस्त्री झाली. मग हाच ड्रेस जळला कसा? असंच कधी कपडे धुताना एखाद्या ड्रेसचा रंग जातो आणि त्यामुळे त्याबरोबरीच्या इतर कपडय़ांचीदेखील वाट लागते. कपडय़ांची काळजी कशी घ्यायची याचं उत्तर  कपडय़ावरच्या अति दुर्लक्षित केअर लेबल्समध्ये दडलेली असतात. चौकटीत काही महत्त्वाची केअर लेबल्स चिन्हं आणि त्यांचे अर्थ त्यासाठीच देत आहोत.

viva5-chart

viva@expressindia.com

Story img Loader