‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जग सपाटीकरणाच्या काळाआधीच जगाला भारतीय चित्रपट आणि त्यातील नृत्यगीतांविषयी कुतूहल होते; पण सपाटीकरणानंतर खऱ्या अर्थाने बॉलीवूड परदेशात लोकप्रिय झाले. आफ्रिकी आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये भारतीय चित्रपट निर्यात होत होते. नायजेरियामध्ये आज चित्रपटनिर्मिती कुटिरोद्योगासारखा फोफावण्याआधी स्वस्तात मिळणारे भारतीय चित्रपटच मनोरंजनाचे उत्तम साधन होते. मारधाड, प्रेमगोष्टी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नृत्यातून कथानकातील भाव पोहोचविणारी गाणी कितीही गमतीशीर वाटली, तरी जगात किती गांभीर्याने घेतली जातात हे अनुभवण्याचे ताजे व्यासपीठ अलीकडे यूटय़ूबच्या माध्यमाने विकसित झाले आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील भारतीयांची संख्याच इतकी आहे, की त्यांनी तिथे दुसरे भारत बनविले आहे. खानपान व्यवहारांपासून मनोरंजनाच्या साधनांपर्यंत त्यांना आयुष्यात कधीही भारतापासून दुरावल्याचे जाणवत नाही. तिथल्या गोऱ्या माणसांच्या बॉलीवूड स्टाइल नृत्य-गानात त्यामुळेच नावीन्य राहिलेले नाही. ‘स्लमडॉग मिलिऑनेर’नंतर ‘जय हो’ हे गाणे हजारो प्रकारांनी बनविल्याचे व्हिडीओज उपलब्ध आहेत. अमेरिका-ब्रिटन वगळता इतर देशांमध्ये बॉलीवूड नृत्याची निर्यात कशी झाली हे पाहणे महत्त्वाचे आहे.
अमेरिकी टॅलेण्ट शोच्या जगभरामध्ये अनधिकृत शाखा फोफावल्या. भारतातही ‘आयडॉल’ वगैरे आले. तशा प्रकारच्या स्पर्धा चिनी स्थानिक टीव्हीवरही एकाच समयी प्रसिद्ध होत्या. येथील एका स्पर्धकाने चक्क ‘तुझमें रब बसता है’ हे ‘रबने बनादी जोडी’ चित्रपटातील गाणे शाहरूख खानहून कमी ओव्हरअॅक्टिंगमध्ये सादर केले आहे. या व्हिडीओतील गंमत म्हणजे उच्चार सफाईदार नसतानाही कलाकाराचा आत्मविश्वास तगडा आहे. दर्शक आणि परीक्षक या गाण्यावर कुतूहलयुक्त चेहरा करून आहेत. गाणे सुरू झाल्यानंतर मात्र प्रत्येक शब्द इंग्रजी आणि मांडरिनमध्ये सबटायटलसह दर्शकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा नृत्यात आणि गाण्याच्या संपूर्ण दोन्ही कडव्यांत रममाण कसा झाला आहे ते पाहायला मिळेल. त्या कलाकाराला मिळालेल्या मार्काचीही माहिती या व्हिडीओत उपलब्ध झालेली पाहायला मिळेल.
उझबेकिस्तानमधील एक संपूर्ण कुटुंबच बॉलीवूडमधील गाण्यांचा कार्यक्रम करते. ‘गोरो की ना कालो की, दुनिया है दिलवालो की’ हे गाणे अत्यंत भावोत्कट होत या बॅण्डने सादर केले आहे. आपल्याकडच्या टॅलेण्ट शोजमध्ये त्यांनी पाहुणे म्हणूनही काम केले आहे; पण त्यांचे पूर्ण गाण्यांचे व्हिडीओज पाहणीय आहेत. अरबी नृत्य स्पर्धेमध्ये भारतीय गाणी पाहताना तिथला अरबी थाट पाहून थक्क व्हायला होते. ‘मुन्नी बदनाम हुई’ या गीतावरचे एक अदबशीर देखणे नृत्य येथे पाहायला मिळते. त्याशिवाय याच कार्यक्रमासाठी करिना कपूरला पाचारण केल्याने त्यांचे व्हिडीओ बजेट इथल्या सिनेमाहून अधिक असल्याचे एक व्हिडीओ पाहून लक्षात येते. अरबांचे बॉलीवूड प्रेम जितके मोठे आहे, तितकेच युक्रेन गॉट टॅलेंटमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्याचा मेळ घातला आहे. स्वेतलाना तुलसी या अर्धभारतीय आणि रशियाई असलेल्या ललनेने उत्तम असे शास्त्रीय नृत्य त्या कार्यक्रमांत करून परीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले आहे. भारतीय पेहरावात या मुलीने केलेल्या अनेक नृत्यगीतांचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.
भारतीय आयटम साँग म्हणजे नृत्यठेक्यातील गीतांवर भारताबाहेर सर्वच फिदा आहेत. पंजाबी ठेक्याची गाणी पूर्वीपासून लोकप्रिय होती; पण आता बॉलीवूड चित्रपटातील गाण्यांना भारताइतकीच पसंती भारताबाहेर दिसते. ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर रशियन तरुणींनी केलेल्या नृत्याचा व्हिडीओ खूप लोकप्रिय आहे. या गाण्यात भारतीय पोशाखातील लावणी कम बॉलीवूड डान्सभरीत नृत्य आणि त्यावर भरते आलेल्या भारतीयांच्या कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत. काही भारतीयांनी कॅटरिना कैफपेक्षा या नृत्यात मध्यभागी नाचणाऱ्या नृत्यांगनेला पसंत केले आहे. नीट पाहिल्यास आपलेही मत तसेच होईल, इतके जीव ओतून केलेले हे नृत्य आहे. सगळ्याच रशियन नृत्य कलाकारांनी केलेला अचूक भारतीय डान्स वेगवेगळ्या गाण्यांसोबत पाहायला मिळतो.
आपण भारतीयांना रोजचे झाल्यामुळे आपल्याच गोष्टीतले सौंदर्य चटकन लक्षात येत नाही. या व्हिडीओजमधील सारेच हौशी आणि भारतीय नृत्याच्या प्रेमाने झपाटलेले पाहायला मिळतात. आपली तरुणाई एकीकडे पाश्चात्त्य नृत्य-गीतांना सर्वाधिक पसंती देणाऱ्या काळात बॉलीवूडाळलेले हे परदेशी पाहणे मोठे गमतीचे आहे. भारतीय नृत्य निर्यातीचा पल्ला कळण्यासाठी ते महत्त्वाचेही आहे.
https://www.youtube.com/watch?v=AycdIcFWcQI
https://www.youtube.com/watch?v=Uq_Kbdmq9Ho
https://www.youtube.com/watch?v=RjDxMMl9Yw0

https://www.youtube.com/watch?v=2wjIa0NLQI0&list=RDRjDxMMl9Yw0
https://www.youtube.com/watch?v=JZUpEbtdQRE
https://www.youtube.com/watch?v=2P7FLmc4i24
https://www.youtube.com/watch?v=IVnZHIO8MdE
https://www.youtube.com/watch?v=9I4IpBaHQ6o

पंकज भोसले viva@expressindia.com