हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयुष्य एक जबरदस्त चकवा आहे. ‘‘जाना था जापान पहुँच गए चीन’’ अशी वेळ तर अनेकदा येत असते. काही वेळा नशीब आपला एक दरवाजा बंद करून निघून जातं. मात्र जाता जाता त्याने खुंटीला दुसऱ्या दरवाजाची चावी लटकवलेली असते. ती जो आजमावून पाहतो तोच यशस्वी होतो. जगभरात नावाजलेला ब्रँड म्हणजे मॅकडोनल्डस् हीच कहाणी सांगतो. ही कहाणी खरंच वेगळी आहे. खूप वळणावळणाचा रस्ता, दऱ्याखोरी ओलांडून सरळ रस्त्याला लागावं आणि नंतर झाला तितका प्रवास खूप झाला म्हणत दुसऱ्याच्याच हाती सुकाणू सोपवावे तशी ही कथा पुढे सरकते.

‘ब्रँडनामा’त यशस्वी भावांच्या अनेक जोडय़ांबद्दल आपण वाचलं आहे. महामंदीच्या काळात अमेरिकेतील हॅम्पशायर भागातील रिचर्ड आणि मॉरीस मॅकडोनल्ड हे दोघं भाऊ  चित्रपटात आपलं नशीब आजमावण्यासाठी शहरातील विविध सेटवर फेऱ्या मारत फिरत. कभी तो किस्मत चमकेगी ही आशा मनात होती. पण मॉरीसने वयाची ३७ आणि रिचर्डने ३१ र्वष पूर्ण केल्यावरही फुटकळ कामांशिवाय पदरात काहीच पडलेलं नाही, याची  दोघांना जाणीव झाली. दोघांनीही आयुष्याची नाव भरकटण्याआधी, फिल्म नहीं तो कुछ और सही म्हणत पूर्णत: वेगळ्या व्यवसायात शिरायचं ठरवलं. मात्र कोणतीही बँक कर्जाऊ  पैसे द्यायला तयार नव्हती. अखेर बँक ऑफ अमेरिकाकडून पाच हजार डॉलर्सचं कर्ज मिळालं आणि दोन्ही भावांनी कॅलिफोर्निया बेर्नार्डिनो येथे १९४० साली सुरू एक रेस्टॉरंट सुरू केलं, त्याचं नाव होतं, ‘‘बार्बेक्यु मॅकडोनल्डस्.’’ इथं बीफ, हॅम, पोर्क सँडविच असे पदार्थ ३५ सेंट इतक्या माफक किंमतीत मिळत. अगदी मोजक्या टेबलांनिशी हे ड्राइव्ह इन हॉटेल बरं चालू होतं. स्वस्त खायला मिळतं म्हणून येणारी कुटुंबं आणि कारहॉप गर्ल्सशी (कारपाशी खाद्यपदार्थ आणून देणाऱ्या वेट्रेसेस) चेष्टामस्करी करता यावी या हेतूने येणारे तरुण यांचा ग्राहकांमध्ये अधिक भरणा होता. वीकेण्डच्या काळात कार्सची भरपूर गर्दी होई. प्रवासात असलेल्या मंडळींसाठी झटपट केलेली ही खाऊगिरीची सोय प्रसिद्ध होऊ  लागली. या रेस्टॉरंटच्या एकूण उत्पन्नापैकी ऐंशी टक्के उत्पन्न एकटय़ा हॅमबर्गरमधून येत होते. चांगला जम बसल्यावर दोघा भावांनी थोडं थांबून अधिक चांगल्या सेवेसह लोकांसमोर यायचं ठरवलं. कारहॉप गर्ल्सपेक्षा इथली चव, सेवा लोकांनी ध्यानात ठेवावी असं त्यांना वाटू लागलं. त्यासाठी त्यांनी चक्क ३ महिने रेस्टॉरंट बंद ठेवलं. रेस्टॉरंटच्या अंतर्गत रचनेत काही बदल केले.

तीन महिन्यांनी रेस्टॉरंट सुरू झालं ते पूर्णपणे नव्या रूपात. बदलाची सुरुवात नावापासून झाली. ‘‘बार्बेक्यू मॅकडोनल्डस्’’ ऐवजी केवळ ‘‘मॅकडोनल्डस्’’ असं नाव कायम झालं. खूप साऱ्या पदार्थाऐवजी निवडक नऊ  पदार्थ ठेवण्यात आले. डिशेसच्या जागी पेपर रॅपिंग आलं. त्यामुळे डिशवॉशरची गरज संपली. सेल्फ सव्‍‌र्हिस सुरू झाली. एकूणच रेस्टॉरंटचं स्वरूप सुटसुटीत करण्यात आलं. कमी किमतीत जलद सेवा आणि स्वच्छता हा दोघा भावांचा विचार पक्का होता.

१९५४ मध्ये मल्टीमिक्सर विक्रेता क्रॉक रे या भावांच्या  संपर्कात आला. त्याला या रेस्टॉरंटमधील पदार्थ, जलद सेवा, स्वच्छता बेहद्द आवडली. नव्या व्यवसायाची संधी त्याला या रेस्टॉरंटमध्ये दिसली. या रेस्टॉरंटच्या काही शाखा एव्हाना आजुबाजूच्या प्रदेशात विस्तारल्या होत्या. क्रॉक रे ने १९५५ साली मॅकडोनल्डस् कॉर्पोरेशनची स्थापना केली. त्याची स्वप्नं मोठी होती. त्याला मॅकडोनल्डस्ची साखळी जगभरात न्यायची होती. तर मॅकडोनल्ड बंधूंना आपला विस्तार फार वाढवण्यात रस नव्हता. या विषयावरून त्यांच्यात मतमतांतरे झाली आणि क्रॉक रेने मॅकडोनल्ड कॉर्पोरेशन विकत घेण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला. मॅकडोनल्ड बंधूंनी २७ लाख रुपयांच्या आणि वार्षिक १.९% रॉयल्टीच्या बदल्यात आपले हक्क त्याला विकले. वास्तविक ही संपूर्ण संकल्पना दोघा भावांची होती. पण कदाचित व्यवसाय विस्ताराच्या फंदात त्यांना पडायचे नसल्याने त्यांनी हा सूज्ञ निर्णय घेतला असावा. यात त्या दोघांचे दुर्दैव मानावे का मॅकडोनल्डस्चे नशीब? काही प्रश्न सोडून देणेच इष्ट. या बंधूंनी भविष्यात ‘बिग एम’ नावाचं रेस्टॉरंट काढण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही.

क्रॉक रेच्या हाती मॅकडोनल्डस् आल्यावर त्याने आधी असलेल्या व्यवस्थेला अधिक नेटके व व्यापक केले. गुणवत्तेशी अजिबात तडजोड केली नाही. जगभरातील सगळ्या  मॅकडोनल्डस् आउटलेटमध्ये समान चव असेल याची काळजी त्याने घेतली. त्यासाठी मॅकडोनल्डस् प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. आजतागायत ८०,००० मंडळींनी हे प्रशिक्षण घेतले आहे. मॅकडोनल्ड्स बंधूनी प्रस्थापित केलेला दर्जा राखत रेने खरंच मॅकडोनल्डस् जगभरात नेलं. आजघडीला मॅकडोनल्डस्ची जगभरात ३६,००० आउटलेट आहेत.

मॅकडोनल्ड्सचे स्लोगन आहे ‘‘आय एम लव्हिंग इट.’’ इथले खाद्यपदार्थ आरोग्यास किती योग्य किती अयोग्य हा मुद्दा बाजूला ठेवता बच्चे कंपनीपासून मोठय़ांपर्यंत सारेच इथे रमतात. मॅकडोनल्डस्च्या प्रत्येक रेस्टॉरंटबाहेर बसलेला विदूषक हीसुद्धा मॅकडोनल्डस्ची ओळख आहे. हा आहे रोनाल्ड मॅकडोनल्ड. याचा वापर अगदी सुरुवातीच्या काळात टीव्ही जाहिरातींसाठी झाला होता. मुलांना लक्ष्य करत एक फँटसीचं जग निर्माण करणं हाच त्याच्या वापरामागचा हेतू होता. तो यशस्वी झाला. सांताक्लॉज इतकाच मिस्टर रोनाल्ड प्रसिद्ध आणि लाडका आहे. आपल्या सर्वाच्या चेहऱ्यावर हास्यरेषा उमटवणं हे त्याचं काम!

तर अशी ही मॅकडोनल्डस्ची कहाणी बुचकळ्यात टाकणारी आहे. फिल्ममध्ये काम करू पाहणारे दोन भाऊ  रेस्टॉरंट व्यवसायात शिरतात. त्यांचा प्रसिद्ध ब्रँड तयार होतो. त्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, पियानो प्लेयर, मल्टीमिक्सर विक्रेता असे असंख्य उद्योग करणारा क्रॉक रे त्यांच्याशी भागीदारी करतो. मॅकडोनल्ड्स इतकं विस्तारतो की हे दोघं बंधू आपला व्यवसाय त्यालाच विकतात. क्रॉक रे मात्र त्यांचं नाव कायम राखत उद्योगाचं नवं पर्व तयार करतो. चित्रपटात शोभेल अशीच ही कहाणी होती. ती पडद्यावरही साकारली गेली. चित्रपट होता, २०१६ मध्ये आलेला ‘द फाऊंडर’

मॅक डी म्हणून ओळखला जाणारा मॅकडोनल्डस् हा आजच्या काळातील प्रस्थापित ब्रँड आहे. अगदी दुरवरूनही तो कमानदार सोनेरी एम आपण ओळखू शकतो आणि ते प्रसिद्ध हसूही. आयुष्य सरळ असावं ही आपल्या सगळ्यांची साधी अपेक्षा. पण प्रत्यक्षात तिरक्या रेषाच वाटय़ाला अधिक येतात. याला अपवाद चेहऱ्यावर हास्य आणणारी मॅकडोनल्डस्ची ती हसरी वक्ररेषा. ती हवीहवीशी वाटते म्हणून तर आपण म्हणतो आय एम लव्हिंग इट..

रश्मि वारंग viva@expressindia.com