हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्योग आणि नशीब यांची गणितं न कळणारी असतात. प्रचंड मोठय़ा उद्योगाचा ध्यास घेणारा, त्यासाठी भली मोठी गुंतवणूक करणारा एखादा व्यावसायिक काही वेळा तोंडावर आपटतो तर अगदी नगण्य किमतीच्या गुंतवणुकीसह सुरू झालेला एखादा व्यवसाय जग जिंकतो. व्यवसायाची गणितंच निराळी असतात. ती कधी, कशी बदलतील सांगता येत नाही. जगातील सर्वात मोठी पिझ्झा रेस्टॉरंट साखळी ठरलेल्या ‘पिझ्झा हट’ला हा न्याय अगदी तंतोतंत लागू होतो.

अमेरिकेतील कॅनसास भागात राहणाऱ्या दोन भावांनी पिझ्झा पार्लर सुरू केलं तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार होता, ‘विंचिटा स्टेट युनिव्हर्सिटीत शिकता शिकता सहज म्हणून एक लहानसा व्यवसाय करावा. ‘डॅन आणि फ्रँक कार्ने अशी त्या दोन भावांची नावं. आपल्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची खाऊची थोडी सोय आणि आपला पॉकेटमनी निघेल इतपत व्यवसाय त्यांना अपेक्षित होता. पिझ्झा बनवण्याचं किंवा व्यवसायाचं विशेष ज्ञान होतं असंही नाही. पण आईकडून ६०० डॉलर्स घेऊन हा व्यवसाय सुरू झाला. सगळ्याच गोष्टी थोडक्यात भागवायच्या असल्याने एका बऱ्याशा इमारतीत सेकंडहॅण्ड साधनांसह दोघा भावांनी आपलं बस्तान थाटलं. ‘पिझ्झा हट’ नाव देण्यामागचं कारणंही गमतीशीर होतं. त्यांनी नावासाठी जे चिन्ह विकत घेतलं त्यावर फक्त नऊ अक्षरंच मावत होती आणि त्यामुळे त्यात बसेल असंच नाव निश्चित झालं. पिझ्झा हट. पार्लर सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी दुकानाची प्रसिद्धी व्हावी म्हणून विद्यार्थ्यांत पिझ्झा मोफत वाटला गेला. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. फक्त विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता पिझ्झाप्रेमींची गर्दी होऊ  लागली. या दोघा भावांना मिळालेलं यश पाहता त्यांच्याच मित्राने ‘पिझ्झा हट’ची शाखा उघडायचं ठरवलं आणि बघता बघता सहज म्हणून ६०० डॉलर्समध्ये सुरू झालेला व्यवसाय झपाटय़ाने वेगवेगळ्या शाखांमधून विस्तारत गेला. १९५८मध्ये सुरू झालेली पिझ्झा हटची ही साखळी रेस्टॉरंट्स १९७१पर्यंत अमेरिकेतील सर्वात मोठी साखळी ठरली. ज्या कॅनसास इथून हा प्रवास सुरू झाला त्या इमारतीचं ‘रेड रूफ’ लाल छतच पिझ्झा हटच्या लोगोत अवतरलं. अर्थात वेळोवेळी या लोगोत बदलही करण्यात आला. पेप्सिको कंपनीने १९७७ मध्ये  कार्ने बंधूंकडून ‘पिझ्झा हट’ विकत घेतलं आणि त्यापुढे या साखळीचा अधिक सुसूत्र विस्तार होत गेला. २०१५पर्यंत जगभरातील ९० देशांतून १६,००० आऊटलेटसह ‘पिझ्झा हट’ जगातील क्रमांक एकचं पिझ्झा रेस्टॉरंट ठरलं.

केवळ व्यावसायीकरण नाही तर पिझ्झाच्या दर्जातही त्यांनी वेळोवेळी चविष्ट बदल केले. पिझ्झा हटने पर्सनल पॅन पिझ्झा आणला १९८३ साली. ज्यामुळे एक प्रकारे ग्राहकाची आवड आणि ताजेपणा या गोष्टी अधोरेखित झाल्या. तर २०१४ मध्ये खपाच्या बाबतीत घसरण अनुभवताना पिझ्झा हटने रिब्रॅण्डिंग केलं. तब्बल ११ नवे पिझ्झा प्रकार त्यांनी आणले. शिवाय कर्मचाऱ्यांच्या पोशाखापासून अनेक गोष्टी बदलल्या. त्याचा निश्चितच फायदाही झाला. एका कंपनीने २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वात प्रभावशाली २०० ब्रॅण्डमध्ये पिझ्झा हट २४व्या क्रमांकांवर होते.

पिझ्झा हटची लोकप्रियता मान्य केली तरी भारताचा विचार करता पिझ्झा हट म्हणजे काटेचमचे संस्कृतीचं  रेस्टॉरंट राहिलं होतं. इथे पिझ्झा हटचा प्रतिस्पर्धी डॉमिनोजने बाजी मारली. हाताने खाण्यातली गंमत सांगत औपचारिकतेला दिलेला वळसा तिथे महत्त्वाचा ठरला. पिझ्झा हटमधून पिझ्झा तर मागवला जातो. पण तिथे बसताना रेस्टॉरंटच्या काटेचमचे संस्कृतीत भारतीय जरा अवघडलेलेच दिसतात. त्यामुळे भारतात हा ब्रॅण्ड बऱ्याच अंशी उच्च मध्यमवर्गीयांचा झालेला आहे, या बाबीकडे दुर्लक्ष करता येत नाही.

तरीही जागतिक पातळीवर हा ब्रॅण्ड निश्चितच मोठा आहे. दोन भावांनी सहज म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आज प्रचंड विस्तारला आहे. ‘मेक इट ग्रेट’ ही या ब्रॅण्डची टॅगलाइन सर्वार्थाने महत्त्वाची आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून मोठं साम्राज्य उभारता येतं हे तर या ब्रॅण्डमुळे पटतंच पण अत्यंत चकचकीत सरंजामासह जेव्हा हा पिझ्झा समोर येतो तेव्हा कॅलरीजची समीकरणे गळून मनात एकच विचार येतो..‘लाइफ इज सिम्पल. लेटस् मेक इट ग्रेट विथ एव्हरी चिजी बाइट..’

viva@expressindia.com