भक्ती परब, राधिका कुंटे

इतके दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा केला जाणारा दिवस येत्या काही वर्षांनी ‘भावंड दिन’ म्हणून साजरा केला जाईल कदाचित. रक्षाबंधनाच्या निमित्ताने केवळ बहिणीने राखी बांधायची आणि भावाने तिचं रक्षण करण्याचा आपला निश्चय दृढ करायचा, ही संकल्पनाच बदलत चालली आहे. बदलत्या काळानुसार बहीणभावंडं एकत्र येतीलच किंवा येतातच असंही नाही. तरीही रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकमेकांच्या भावना जपण्याचं, विचारांची देवाणघेवाण करण्याचं बंधन जपलं जातं आहे. बदलत्या काळाचा हा कानोसा..

Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार

सकाळपासून लगबगीने उठून क्षमाने मनोहरच्या आवडीचा स्वयंपाक तयार केला. तिची लेक मीनाक्षीलाही मनोहरमामाच्या अजयला राखी बांधायची होती. हा पाहा, मनोहरमामा रजा घेऊ न, अजयबरोबर क्षमाकडे आलादेखील..

’ ’

भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजता उठून सार्थक तयार झालाय. पावसामुळे नेट थोडं ढेपाळलंय, पण ठीक आहे.. ती पाहा, साक्षी ऑनलाइन आलीसुद्धा.. तीसुद्धा नटली आहे, पण थोडीशीच. कारण व्हर्च्युअल औक्षण केल्यानंतर तिला लगेच कॉलेज गाठायचंय..

’ ’

‘सिर्फ एक व्हिडीओ कॉल और दस देश..’ बोले तो, ‘दस का दम.. या दस की टीम..’ या दहाही बहीणभावांपैकी एकही भारतातल्या घरात नाहीत. सगळे जगभर विखुरलेले.. तरीही एकमेकांच्या वेळा सांभाळून ऑनलाइन असलेले..

’ ’

रक्षाबंधनाच्या दिवसाचं चित्र किती नि केवढं पालटलं आहे, पालटतं आहे आणि पालटेल, याची चुणूक दाखवणारी ही उदाहरणं. सध्या झपाटय़ाने बदलणाऱ्या भोवतालात ‘रक्षाबंधन’ ही संकल्पनाही बदलायला लागलेली दिसते आहे. एकेकाळी भावानं बहिणीचं रक्षण करावं, म्हणून बहीणभावाला राखी बांधायची. तो तिच्या घरी यायचा किंवा ती त्याच्याकडे जायची. त्यानंतर झपाटय़ाने काळ पुढे (चित्रपटांत दाखवतात तसा) सरकला. मुली मुलांच्या बरोबरीने किंबहुना अनेक वेळा चार पावलं पुढंच राहू लागल्या. मुलींच्या या पुढं राहण्यात शिक्षण, नोकरी, कार्यक्षेत्र, भावविश्व, राहणीमान इत्यादी सगळ्याच पैलूंचा समावेश होता. अनेकदा भावालाच बहीण मदतीचा हात पुढं करू लागली. त्याच्या सुखदु:खाच्या काळात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहू लागली. त्या ओघातही भावाने रक्षण करण्याची कल्पना मागं पडली असावी, किंबहुना पडते आहे.. मूळचा अहमदनगरचा असलेला ओमप्रकाश शिंदे आता महाराष्ट्राचा लाडका अभिनेता झाला आहे. गेल्या १२-१३ वर्षांपासून घरापासून दूर पुण्या-मुंबईत राहताना त्याला घरच्यांची विशेषत: बहिणीची खूप आठवण येते. कारण केवळ २-३ वर्षच त्यांना प्रत्यक्ष भेटून रक्षाबंधन साजरं करता आलं होतं. त्याची बहीण त्याच्या करिअरची परखड समीक्षक असून त्याला मार्गदर्शनही करते. मोठय़ा बहिणीचे सगळे सल्ले ओमप्रकाशला मोलाचे वाटतात. तो सांगतो की, ‘तिच्यापासून दूर असल्याने ती मला राखी पाठवते. ही राखी कधी आधी पोहोचते किंवा कधी रक्षाबंधनानंतरही पोहोचते. पण हा सण साजरा करायला एकत्र येता येत नाही, याची उणीव भासते.’ त्यामुळे चित्रीकरण नसेल तेव्हा गावाला जाऊ न तो सगळ्यांना भेटतो, तोच त्याच्यासाठी सण असतो. शिक्षणाच्या निमित्ताने ही भावंडं काही वर्ष पुण्यात राहात होती, तेव्हाचे दिवस त्याला आताही आठवतात. तेव्हा ते रक्षाबंधन आणि भाऊबीजेला खूप धमाल करायचे, बाहेर फिरायला जायचे. पण आता ते शक्य होत नाही. त्यामुळे आता तो बहिणीला भेटतो, तोच त्याच्यासाठी रक्षाबंधनाचा सण असतो. ओमप्रकाशची बहीण शिक्षिका आहे. तिचा आवाज खूप चांगला आहे. तीदेखील चांगली अभिनेत्री बनू शकली असती, पण तिनं शिक्षणक्षेत्र निवडलं, असं ओमप्रकाश सांगतो.

सध्या विविध कारणांमुळे बहीणभाऊ  दोघेही किंवा दोघांपैकी एक तरी देशी-परदेशी गेलेला असतो किंवा असते. अशा वेळी भावंडांची प्रत्यक्ष भेट होऊ  शकत नाही. त्यामुळे मग व्हिडीओ कॉलिंगसारख्या आधुनिक सुविधांचा आधार घेतला जातो. किंवा घराबाहेर असलेलं भावंडं घरी आलं की तोच सणावाराचा दिवस ठरतो. मीडियाच्या क्षेत्रात पीआर म्हणून काम करणाऱ्या सुरभि देशपांडेचा एक भाऊ  राजस्थानमध्ये आणि एक भाऊ  तिच्यासोबत मुंबईत असतो. ती स्वत:ही शिक्षणासाठी काही काळ अमेरिकेत होती. तेव्हा या तिघा भावंडांनी व्हिडीओ कॉलवर साग्रसंगीत रक्षाबंधन साजरं केलं होतं. ही तीनही भावंडं भारतात असली तरी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कामात व्यग्र असतात. पण इतर सणांप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशीही सगळ्या कुटुंबातील सदस्यांनी, नातेवाईकांनी एकत्र जमण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. तेही शक्य नसेल तर ही भावंडं भेटतात, तोच त्यांच्यासाठी रक्षाबंधनाचा सण असतो. सुरभि सांगते की, ‘एकदा सणानिमित्त सगळे घरात जमले होते आणि मी भावांसोबत बाहेर जायचा बेत आखला. तिघांनीही मनसोक्त भटकंती केली, शॉपिंग केली. त्यानंतर पोटपूजाही. या वेळात आम्ही एकमेकांशी खूप गोष्टी शेअर केल्या. आठवडय़ातून किंवा महिन्याभरातून ठरवून आम्ही तिघं भेटतो, तोच आमच्यासाठी सण असतो’. सुरभिचे भाऊ  तिच्यापेक्षा लहान असल्यामुळे ती त्यांना करिअरविषयक मार्गदर्शनही करते. तिघांमध्ये कायमच वैचारिक देवाणघेवाण होते.

भावंडं भेटल्यावर अनेकदा लहानपणच्या आठवणी पुन:पुन्हा जागवल्या जातात. जुने फोटो शेअर होतात. मात्र केवळ भावनांनी हळवं न होता सारासारविचार (पान २ वर) (पान १ वरून) करून आणि आपल्या माणसांची तितकीच ओढ असूनही, शक्य होईल तेव्हाच प्रत्यक्ष भेट होते आणि तोच रक्षाबंधनाचा दिवस मानला जातो. किंबहुना त्या राखी बांधण्याच्या ठरावीक सेलिब्रेशनऐवजीही काही महिने किंवा काही वर्षांनी होणारी अल्पकाळाची भेटच महत्त्वाची ठरते. शिक्षणानिमित्त जर्मनीत असणारी प्रियदर्शिनी टिळक ही अभिनेता सुयश टिळकची बहीण. ती सांगते की माझा दादा म्हणजेच सुयश टिळक आणि माझ्याबद्दल सांगायचं तर आमच्या दोघांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातच झाल्यामुळे आम्ही सगळे सण कुटुंबासोबत आनंदाने साजरे करायचो. नंतरच्या काळात दादा अ‍ॅक्टिंगसाठी मुंबईला गेला. त्यानंतर तो पुण्यात यायचा तेव्हाच मी त्याला राखी बांधायचे. पुढे काही वर्षांनी मी जर्मनीमध्ये शिक्षणासाठी गेले आणि त्यानंतर आमचं भेटणं खूप कमी झालं. मला रक्षाबंधन, वाढदिवस, दिवाळी काहीच एकत्र साजरं करता येत नाही. जमेल तेव्हा आईबाबा आणि दादा मला सणासुदीच्या दिवशी व्हिडीओ कॉल करतात. मी भारतात जाते तो दिवस आमच्यासाठी रक्षाबंधन अथवा दिवाळी असते. पण बाकीचे दिवस मी आणि दादा जमेल तसं एकमेकांशी गप्पा मारतो आणि एकमेकांना येणाऱ्या अडचणी शेअर करतो. मला असं वाटतं की बहीणभावाच्या नात्याला खास दिवसाची गरजच नसते मुळी. मी कितीही लांब असले तरी गरज असल्यावर धावून येईल असा आहे माझा दादा..’. हे खरंच आहे की भावंडांनी एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जायला हवं. एकमेकांच्या सुखदु:खात सदैव सहभागी असायला हवं. केवळ महागडं गिफ्ट किंवा पैशांनी हा स्नेहाचा, प्रेमाचा, आदराचा धागा कधीच जुळत नाही.

अनेकदा अनेक कुटुंबांमध्ये बहिणीबहिणी किंवा भाऊ -भाऊ  किंवा एकटा मुलगा किंवा एकटी मुलगी असते. मग काही वेळा बहिणी मानलेल्या, जवळच्या नात्यातल्या भावांना राखी बांधते. किंवा प्रत्यक्ष भेटणं शक्य नसेल तेव्हा परगावच्या भावाला राखी पाठवते. मग तो भाऊ  लहानमोठा असला तरी ती बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असणारी राखी भावापर्यंत पोहोचणं तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. किंवा सगळीच आत्ते-मामे-चुलत-मावस अशी सगळीच भावंडं मिळून मोठाच रक्षाबंधनाचा सोहळाही काही घरांत साजरा होतो. अलीकडे तर बहीण बहिणीला किंवा भाऊ  भावाला राखी बांधू लागले आहेत. या सेलिब्रेशनचे फोटो समाजमाध्यामांवर ‘सिस्टर्स सेलिब्रेशन’ किंवा ‘बंधूमिलाप’ असे टॅग केले जाऊ  लागले आहेत. काही वर्षांपूर्वी एका लेखात ‘सिस्टर्स डे’ ही संकल्पना मांडली होती, ती अनेकांना भावली होती. प्रत्यक्ष भेटून सेलिब्रेशन करणं शक्य नसेल किंवा व्हिडीओ कॉलसाठी सगळ्या भावंडांच्या वेळा जमत नसतील तर फोन करून, समाजमाध्यमांच्या आधारे संपर्क साधला जातो. मात्र काहीवेळा काही जण स्वत:च्या नात्यांच्या चौकटी पलीकडे पाहायला शिकतात आणि एखाद्या अनाथाश्रमात रक्षाबंधन साजरं करतात. तिथल्या मुलींना नव्हे छोटय़ा बहिणींना-भावांना कपडे-भेटवस्तू देतात. अशा वेळी त्या लहानग्यांच्या टपोऱ्या डोळ्यांत त्यांना आपलं भावंडं भेटल्याचा प्रतिबिंबित होणारा आनंद पाहून खरोखरच ‘भावंड दिन’ सेलिब्रेट झाल्यासारखा वाटतो. याच भावना खऱ्या महत्त्वाच्या..

Story img Loader