हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

काही माणसं त्यांचं अस्तित्व जाणवू न देताही खूप महत्त्वाची असतात. हीच गोष्ट काही ब्रॅण्ड्सनाही लागू पडते. स्वत:च्या असण्याची जाहिरात न करता अगदी अनोख्या पद्धतीने आपल्या घरात शिरलेला असाच एक ब्रॅण्ड म्हणजे टपरवेअर. समस्त महिलावर्गाला आपलंसं करणाऱ्या या ब्रॅण्डची ही कथा.

amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bacteria in sky
हवेतील जंतू पसरवत आहेत का साथीचे रोग?
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
Ukdiche Modak Recipe
Ukdiche Modak : उकडीचे मोदक फुटतात? टेन्शन घेऊ नका, या टिप्स जाणून घ्या अन् बनवा स्वादिष्ट मोदक
Loksatta kutuhal System Reliability Self Driving Artificial Intelligence
कुतूहल: प्रणालींची विश्वासार्हता
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद

अर्ल टपरवेअर या अमेरिकन सद्गृहस्थाला अशी प्लास्टिक भांडी बनवायची होती, ज्यात दीर्घकाळ अन्न ताजं राहू शकेल. त्याने १९३८ मध्ये तसा प्रयत्नही केला पण तो लोकांपर्यंत फारसा पोहोचला नाही. त्यानंतर त्याने १९४६ मध्ये याच पद्धतीने काही वैशिष्टय़पूर्ण प्लास्टिक बाउल्स बनवले. तिथूनच खऱ्या अर्थाने टपरवेअर विश्वाची सुरुवात झाली. त्याने सुरुवातीला ही भांडी डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये ठेवून पाहिली. स्वत:चं दुकानही थाटलं. पण खूप जाहिरातीनंतरही उत्पादनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याचं मुख्य कारण हेच होतं की त्या काळात प्लास्टिकच्या वस्तूंची संकल्पना लोकांनी स्वीकारली नव्हती. प्लास्टिक म्हणजे विशिष्ट वासाचं, अविश्वासार्ह अशी काहीशी त्या काळची समजूत होती. ती काही अंशी खरीही होती. पण आपलं उत्पादन या समजुतीपेक्षा वेगळं आहे हे अर्ल ला पटवून द्यायचं होतं.

याच काळात अर्ल टपर यांची ओळख वाइज नामक गृहिणीशी झाली. त्यातून महिलांच्या छोटय़ा छोटय़ा ग्रूपना टपरवेअरचा डेमो देण्याची कल्पना विकसित केली गेली. टपरवेअरचे वॉटरटाइट कंटेनर त्या काळात प्रसिद्ध होते. वाइज मॅडमनी टपरवेअरच्या सादरीकरणासाठीचा होम पार्टीजचा विभाग आपल्या हाती घेतला. वितरक, व्यवस्थापक आणि एजंट यांचं एक जाळं तयार केलं. विशिष्ट विभागातील एखाद्या महिलेच्या घरी पार्टी ठेवली जाई. आजूबाजूच्या बायका जमल्यावर टपरवेअरचा डेमो दिला जाई. अतिशय घरगुती वातावरणात या पार्टीज पार पडत. या पार्टीजची जाहिरात करताना, या मार्केटिंगमधून तुमचे तुम्ही पैसे कमवा आणि स्वत:च्या पैशाने कार घ्या, असे स्वप्न त्यांनी स्त्रियांना दाखवले होते. या होम पार्टीजच्या व्यवस्थेत बढतीची शक्यताही ठेवण्यात आली होती. ज्या स्त्रीच्या घरी या पार्टीचे आयोजन केलं जाई, तिच्यासाठी एक खास बक्षीस असायचे. त्या पार्टीत जितका खप जास्त तितकं मोठं बक्षीस दिलं जाई. या होम पार्टीजचं स्लोगन होतं..‘द मॉडर्न वे टू शॉप.’ टपरवेअरमुळे अन्न दीर्घकाळ टिकणं आणि त्यामुळे अन्नाची नासाडी टाळणं या मुद्दय़ांवर या होम पार्टीजमध्ये भर दिला जाई. टपरवेअर..फन वे टू सेव्ह अ‍ॅण्ड अर्न ही टॅग लाइन अर्थपूर्ण होती.

टपरवेअरने निर्माण केलेल्या या साखळीमुळे अनेक गृहिणींना रोजगार मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मंदीच्या आणि महागाईच्या काळात घरच्या घरी होणारा हा व्यवसाय अनेक स्त्रियांना घरखर्चाच्या तरतुदीला हातभार लावणारा होता. टपरवेअरने आपल्या ग्राहक आणि विक्रेत्यांना बांधून ठेवण्यात बिलकूल कसर केली नाही. दर वर्षी ज्युबिली मीटिंगचं आयोजन, त्यात नवीन उत्पादनांचं प्रदर्शन आणि सर्वोत्कृष्ट डेमो देणाऱ्यांना भरघोस बक्षिसं हे ठरलेलं होतं. या जिव्हाळ्यातून टपरवेअरचा व्यवसाय वाढत गेला. आज टपरवेअरचं जाळं १०० देशात विस्तारलेलं आहे. जुन्या टिपिकल भांडय़ांच्या जोडीला मायक्रोवेव्ह, फ्रिजरवेअर आली आहेत.

स्त्री ही घराचा खांब असते. भांडय़ांची खरेदी हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणून नेमकं तिलाच अशा उत्पादन विक्रीत सामावून घेणे, हे टपरवेअरचं मार्केटिंग तंत्र आत्मसात करण्याजोगं आहे. आज या पद्धतीने मार्केटिंग करणारी अनेक उत्पादनं आली आहेत पण टपरवेअर उत्पादनांचा अस्सलपणा त्यात क्वचित मिळतो.

प्लास्टिक भांडय़ांच्या वापराबद्दलची शंका दूर करीत, ‘टपरवेअर आहे म्हणजे टेन्शन नाही’ हा विश्वास निर्माण करणारा हा ब्रॅण्ड म्हणूनच आहे, मच मोअर दॅन अ बॉक्स.

viva@expressindia.com