हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
मजबुती, टिकाऊपणा हा काही ब्रॅण्ड्सचा इतका स्वाभाविक गुणधर्म असतो की तीच त्यांची खासियत बनून जाते. आऊटडोअर अॅडव्हेंचर्ससाठी उपलब्ध शू ब्रॅण्डमधलं असं मजबूत नाव म्हणजे वुडलॅण्ड शूज. याला आऊटडोअर अॅडव्हेंचर शूजमधला सनी देओल ब्रॅण्ड म्हणायला हरकत नाही. ढाई किलोका वुडलॅण्ड शूजवाला पैर किसीके पैरोंपर पडता है ना.. ज्याने हा अनुभव घेतलाय तो याविषयी अधिक सांगू शकेल. तर अशा या ब्रॅण्डची ही कहाणी.
क्वेबेक कॅनडा येथील एरो (ई१) ग्रूप म्हणजे आऊटडोअर शूज उत्पादनातील मोठं नाव. १९५० पासून कार्यरत असलेल्या या कंपनीचा अधिकतर व्यवहार रशियाशी होता. पण रशियाचं विभाजन झाल्यानंतर तिथल्या निर्यातीवर अनेक बंधनं आली. आणि त्यामुळे कंपनीने नव्याने भारतीय बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय घेतला. १९९२ साली एरो कंपनीने प्रथमत: हाताने शिवलेले अस्सल लेदर शूज भारतीय मार्केटमध्ये नव्याने आणले, तोच हा ब्रॅण्ड ‘वुडलॅण्ड’. एरोसारख्या कंपनीची भारतातील सुरुवात तशी धमाकेदार वगैरे नव्हती. प्रारंभीच्या काळात वुडलॅण्डचा खप मर्यादित होता. पण जसजसं ट्रेकिंग, हायकिंग या गोष्टी छंद म्हणून न राहता अधिक नियमितपणे आणि गांभीर्याने होऊ लागल्या तसतसा वुडलॅण्डला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला.
मातकट किंवा शेवाळी हिरवट असे मातीशी इमान राखणारे वुडलॅण्ड शूज आणि दर्जा यांना आपण वेगळं करू शकत नाही. या ब्रॅण्डचं उत्पादन एकाच एका देशात होत नाही आणि त्याचप्रमाणे एकाच टेक्नॉलॉजीनेही होत नाही. शू मेकिंगमधल्या विभिन्न सर्वोत्तम तंत्रांचा वापर वुडलॅण्ड ब्रॅण्ड करतो. फिनिशिंगसाठी इटालियन मशिनरी वापरली जाते तर रबर सोल जर्मन टेक्निकने बसवला जातो. विविध देशांत उत्पादन होत असल्याने एकाच नाही तर विविध प्रकारच्या वातावरणात हे शूज उत्तम कामगिरी करू शकतील याची व्यवस्थित चाचणी होते आणि या सगळ्याचं फलित वुडलॅण्डच्या रफ अॅण्ड टफ अवतारात दिसतं.
वुडलॅण्ड शूजचे विविध पर्याय इतक्या वर्षांत बाजारात आले आहेत पण सर्वात लोकप्रिय मॉडेल म्हणजे भारतात लॉन्च झालेलं जी-००९२. आऊटडोअर अॅडव्हेंचर्स मंडळींचा हा अत्यंत आवडता ब्रॅण्ड आहे. जगभरातील ३००० मल्टीब्रॅण्ड आऊटलेट्समध्ये तो उपलब्ध आहे. तर वुडलॅण्डची स्वत:ची ३५० आऊटलेटस् आहेत. या ब्रॅण्डला तशी प्रसिद्धीची गरज नाही, पण तरीही या ब्रॅण्डने केलेली ब्रॅण्ड अॅम्बेसेडरची निवड खास आहे. कुणा कलाकार वा नामवंत खेळाडूची निवड न करता वुडलॅण्डने विंडसर्फर, स्कूबाडायव्हर, हॉर्सरायडर, फुटबॉल प्लेअर मलायका वाझ या तरुणीची निवड ब्रॅण्ड प्रमोशनसाठी केली आहे. जी सार्थच आहे.
वुडलॅण्डचा लोगो आहे फळता फुलता वृक्ष. वुडलॅण्ड एक इकोफ्रेंडली ब्रॅण्ड आहे हे तर त्यातून दिसतंच त्याशिवाय टच द अर्थ, ब्रीद द विंड, टेस्ट द वॉटर ही साहस प्रकार अनुभवण्यास उत्सुक मंडळींना घातलेली सादही हा लोगो व्यक्त करतो. ‘एक्स्प्लोर मोअर’ ही टॅगलाइन निसर्गाची विविध रूपं उलगडायला उत्सुक हायकर्स ट्रेकर्स मंडळींना प्रेरित करणारी आहे. वुडलॅण्ड हा आऊटडोअर शू ब्रॅण्ड असला तरी रोजच्या वापरासाठी वुडलॅण्डला पसंती देणारे अनेक आहेत. त्या शूजकडे पाहिल्यावर त्यांचा रांगडेपणा, दणकटपणा भावतो. स्वस्थ बसू नका, चला उठा, बाहेर चला ही साद हे शूज नकळत देतात. अशा वेळी कोणाला मोह होणार नाही बाहेर पडण्याचा? उत्साहाने काम करण्याचा? मरगळलेलं मनही वुडलॅण्डसोबत नक्कीच म्हणतं, येस्स. लेट्स एक्स्प्लोर मोअर..!
viva@expressindia.com