हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी उत्पादन कोणतेही असो, तो वापरणाऱ्या मंडळींसाठी त्याच्या जाहिरातीपेक्षा अनुभव महत्त्वाचा असतो. जाहिरात पाहून उत्पादन घ्यावं आणि वापरल्यावर निराशा यावी असं अनेकदा होतं. अशा वेळी आपण उत्पादनाच्या सच्चेपणाला, पारदर्शकतेला महत्त्व देतो. त्या अर्थाने शब्दश: पारदर्शी ब्रॅण्ड म्हणजे पिअर्स सोप. जवळपास २०० र्वष जुन्या या ब्रॅण्डची कहाणी ब्रॅण्डसारखीच ‘प्युअर अॅण्ड जेन्टल’ आहे.
अॅण्ड्रय़ू पिअर्स हा लंडनमधला एक साधा न्हावी होता. लंडनमधील सोहा या उच्चभ्रू वस्तीत त्याने १७८९ मध्ये आपलं दुकान थाटलं. तो काळ लीड आणि अर्सेनिकचा भरमसाट वापर करून चेहऱ्याला पांढरट गोरं करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा होता. सर्व उच्चभ्रू स्त्रिया त्याचा वापर करत. त्या सौंदर्यप्रसाधनांतील विषारी घटकांमुळे चेहऱ्याचे नुकसान तर होतच असे शिवाय चेहरा कोरडा होई. अॅण्ड्रय़ू पिअर्स अशा मंडळींना क्रीम, पावडर विकत असे. लवकरच त्याच्या लक्षात आलं की त्याची उत्पादनं उच्चभ्रू वर्गात लोकप्रिय आहेत. त्या क्रीमचा वापर कोरडेपणा घालवण्यासाठी होतोय. त्यावरून अॅण्ड्रय़ूला साबण बनवून पाहण्याची युक्ती सुचली. मग अथक प्रयत्नांतून तयार झाला तोच हा पिअर्स सोप. चेहऱ्याला मुलायम बनवण्यासाठी ग्लिसरीन सोबत नैसर्गिक तेलाचा वापर त्याने या साबणात केला होता. तत्कालीन बरेचसे साबण त्वचेसाठी कठोर होते. त्यामुळे पिअर्सचा मृदूपणा विशेष अधोरेखित झाला. त्यापलीकडे पहिल्या साबणापासून अॅण्ड्रय़ूने जपलेली गोष्ट म्हणजे, साबणातील अस्सल ब्रिटिश गार्डनचा सुगंध आणि साबणाची पारदर्शकता. तेव्हाच्याच नाही तर अगदी आताच्या साबणांमध्येही पिअर्स सोपचा तो विशिष्ट ब्रिटिश गंध, त्याची पारदर्शकता आणि तो आकार पूर्णत: वेगळा जाणवतो. पिअर्स सोप बनवण्याची पद्धत अगदी निराळी होती. त्या पद्धतीमुळे तो लंबगोल आकार साबणाला आपोआप प्राप्त होई.
अॅण्ड्रय़ूसाठी साबणाच्या उत्पादनापेक्षा त्याची गुणवत्ता महत्त्वाची होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हा साबण खास करून मागणीनुसार बनवून दिला जाई. हळूहळू उच्चभ्रूंमध्ये साबणाची प्रसिद्धी वाढू लागली. व्यवसायही वाढू लागला आणि अॅण्ड्रय़ू सोहा इथून ऑक्सफर्डला आपल्या व्यवसायाचं स्थानांतरण केलं. १८५१च्या द ग्रेट एक्झिबिशनमध्ये पिअर्स सोपला पारितोषिकही प्राप्त झालं. कालांतराने अॅण्ड्रय़ू यांनी निवृत्ती स्वीकारली आणि व्यवसाय फ्रान्सिस या नातवाच्या हाती सोपवला. फ्रान्सिसने व्यवसाय विस्तार करताना उच्चभ्रूंसोबतच मध्यमवर्गातही पिअर्स सोप प्रसिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यात एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीची साथ त्याला मिळाली. त्याचाच जावई थॉमस बॅरेट. थॉमसला ‘आधुनिक जाहिरात युगाचा शिल्पकार’ म्हटलं जातं. त्याने केलेल्या पिअर्स सोपच्या जाहिराती विलक्षण गाजल्या. त्याने बनवलेलं, ‘गुड मॉर्निग! हॅव यू युज्ड् पिअर्स सोप?’ हे पोस्टर कमालीचं लोकप्रिय होतं. त्याशिवाय काही क्लृप्त्याही त्यांनी वापरल्या. जे पालक बाळाच्या जन्माची वर्तमानपत्रात जाहिरात करत त्या पालकांकडे पिअर्स सोपचं गिफ्ट आणि जाहिरात पत्रक पाठवलं जाई. या जिव्हाळ्याच्या जाहिरात पद्धतीमुळे पिअर्स सोपची जाहिरात अगदी कर्णोपकर्णी झाली. याशिवाय सुप्रसिद्ध चित्रकार सर जॉन मिलेस (Sir John Millais) यांची बहुचर्चित ‘बबल’ ही चित्रकृती वर्षांनुवर्षे पिअर्स सोपची जाहिरात म्हणून वापरली गेली तिचाही प्रभाव खूप खूप महत्त्वाचा ठरला. (पिअर्स सोपच्या भारतीय जाहिरातीतसुद्धा सातत्याने दिसणाऱ्या बबल मागचं रहस्य हेच आहे.)
भारतात पिअर्स सोप येणं अगदी स्वाभाविक होतं. १९०२ मध्ये ब्रिटिश राजवटीत पिअर्स सोप भारतात दाखल झाला. १९१० मध्ये लिव्हर बंधूंनी पिअर्स सोप कंपनी विकत घेतली. पर्यायानं भारतात हिंदुस्थान युनिलिव्हर सध्या पिअर्सचा कारभार सांभाळते. पिअर्स साबण आणि त्याचा तो अंबर, लालसर तपकिरी पारदर्शक तैलरंग हे समीकरण होतं पण सध्या या मूळ रंगासोबत निळ्या आणि हिरव्या रंगांतही पिअर्स सोप मिळतो. आपला २२० र्वष जुना रंग आणि गंध पिअर्सने बदलू नये, तोच कायम ठेवावा यासाठी २००९ मध्ये काही देशांमध्ये चक्क फेसबुक कॅम्पेन झालं होतं.
जगभरातील ८० देशांत पिअर्सचे चाहते पसरले आहेत. ‘प्युअर अॅण्ड जेन्टल’ ही पिअर्सची टॅगलाइन आश्वासक आहे. एखाद्या दिवशी घरातला बेबी सोप संपल्याचं लक्षात आल्यावर घरातली जाणती सहज सांगून जाते की, अगं पिअर्स वापर.. चालेल तो. यातच या साबणाचं यश आलं. कोणताही व्यवहार पारदर्शक असेल तर मनं जिंकतोच. अॅण्ड्रय़ू पिअर्सने निर्माण केलेली ही पारदर्शकता तर २२० र्वष जुनी आहे. तिनं प्युअरली आणि जेन्टलली ग्राहकांची मनं जिंकली नसती तर नवलच!
viva@expressindia.com