स्वानंद गांगल

भारतातील खाद्यसंस्कृती आणि खाऊगल्ल्यांची मिजास टप्प्याटप्प्यावर बदलत जाते. कधीकधी तर नाक्यानाक्यावर खाण्यापिण्याच्या आवडी आणि चवी बदलतात. प्रत्येक दिशेला, उपदिशेला खाण्यापिण्याच्या चवी बदलतात. पूर्वेकडील राज्यांमध्ये भटकंती करताना तर खाण्यापिण्याच्या मसाल्यांपासून ते अगदी काही खास प्रकारच्या सामग्रीपर्यंत आणि लोकांच्या जिभेच्या चोचल्यांपर्यंत सर्व काही बदलतं. भारताच्या या भागातील राज्यांवर निसर्गाचा वरदहस्त आहे. पर्यटनाच्या बाबतीतही इथे गेल्या काही वर्षांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. वरुणदेव आणि निसर्गदेवतेचा वरदहस्त असलेल्या अरुणाचल प्रदेशातील खाऊगल्लीचा शोध आज घेऊयात..

Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Technology and Urbanization Human Progress
तंत्रकारण: तंत्रज्ञान आणि नागरीकरण
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
old people amazing kokani dance or balya dance
कोकणातील संस्कृती जपली पाहिजे! कोकणकर वृद्धांनी केले बाल्या नृत्य, Video Viral
Loksatta anvyarth Science Culture India Nuclear Testing and Use of Atomic Power
अन्वयार्थ: विज्ञान संस्कृतीचा मेरुमणी
anis demand narendra dabholkar name to vigyan bhavan inauguration venue
सावरकरांनंतर आता नरेंद्र दाभोलकरांच्या नावासाठी आग्रह; उद्घाटनीय स्थळाला नाव देण्याची ‘अंनिस’ची मागणी
Attempt to spread poison in the name of caste PM Modi criticizes opponents
जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

निसर्गालाच देव मानून पुजणाऱ्या या प्रदेशात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी निसर्ग ज्याप्रमाणे त्याच्या किमया दाखवत असतो त्याचप्रमाणे, इथलं साधं राहणीमान आणि साधं पण तितक्याच चवीचं खानपानही अनेकांची मनं जिंकून घेतल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे इथे आल्यावर नेहमी चटपटीत, मसालेदार किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत बरेच पर्याय मागण्याऱ्या व्यक्तींची मनंसुद्धा बदलतात.

विविध प्रकारच्या आदिवासी प्रजातींचा इथे मोठय़ा प्रमाणावर असलेला वावर आणि त्यांचा प्रभाव इथल्या खाद्यपदार्थावर पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता उपलब्ध सामग्रीतून पूरक आणि पोषक खाद्यपदार्थाची रेलचेल ही इथल्या भागाची खरी ओळख. अरुणाचल प्रदेशच्या बऱ्याच परिसरामध्ये उदाहरणादाखल इटानगरमध्ये आणि काही शहरी भागांमध्ये खाण्यापिण्याचे फार पदार्थ उपलब्ध नाहीत. मात्र स्थानिक स्तरावर जे पदार्थ बनवले जातात त्यातही तुम्ही तुमची खादाडी भागवू शकता. इथल्या भागात चाऊमीनचं प्रस्थ जरा जास्तच पाहायला मिळतं. त्याशिवाय उकडलेल्या भाज्या त्याला काही स्थानिक हर्ब्स आणि मसाल्यांची जोड देऊन वेगळी चव देण्याचा प्रयत्न के लेला दिसून येतो. पोर्क आणि बँबू शूटचा वापरही बऱ्याचदा इथल्या खाद्यपदार्थामध्ये केला जातो. खाऊगल्ली ही संकल्पना अजून अरुणाचल प्रदेशमध्ये फारशी विकसित झाली नाहीये; पण तरीही इथल्या लहानमोठय़ा बेकऱ्या, काही हॉटेल्समधील पारंपरिक पद्धतीचं खाणं पर्यटकांचे लक्ष वेधून घेते यात शंका नाही. इथला एक प्रचलित पदार्थ म्हणजे ‘पिठा’. तांदळाचं पीठ, पोहे, साखर या पदार्थाचं मिश्रण पानात ठेवून ते तळलं जातं किंवा मग वाफवलं जातं किंवा आगीवर भाजलं जातं. प्रत्येकाची पिठा बनवण्याची पद्धत वेगळी आणि तितक्याच वेगवेगळ्या चवींची आहे. सकाळी सहा वाजता इथल्या बेकऱ्या उघडतात. ब्रेड किंवा पावाचे प्रकार म्हटलं की आपल्याकडे साधारण त्यात मिठाचा वापर केला जातो; पण तिथे मात्र स्वीट बर्गर ब्रेडचा वापर मोठय़ा प्रमाणावर के ला जातो. या भागात कॅ फे आणि छोटेखानी हॉटेल्स अगदीच नाहीत असं म्हणता येणार नाही. मात्र इथल्या चवीशी मिळतंजुळतं घेण्यासाठी काहीसा वेळ द्यावा लागतो. इथल्या खाद्यपदार्थाची चवच पूर्णपणे वेगळी असल्याने ते एकदा आपलेसे झाले की मग आवडू लागतात.

कॉफीपेक्षा इथे चहा पिण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यातही ग्रीन टी वगैरेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी इथली च्याय की प्याली खासच ठरेल. पेहक हा इथल्या खाऊगल्ल्यांमध्ये चटकन शोधून न सापडणारा तरीही इथला चविष्ट प्रकार. चटण्यांच्या प्रकारात मोडणारा हा खाद्यपदार्थ. फर्मेटेड सोयाबीन आणि मिरचीच्या चवीचा समतोल राखत बनवला जातो. तसं पाहिलं तर हा प्रकार फारसा विकला जात नाही. त्यामुळे याची चव चाखायची तर इथल्या काही निवडक हॉटेल्स किंवा मग स्थानिकांच्याच घरी अतिथी म्हणून जाण्याशिवाय पर्याय नाही. प्रसिद्ध अशा खाऊगल्ल्या इथे नसल्या तरी नेहरू मार्केट, गंगा मार्केट, बाझार लाइन अशा बाजारहाटाच्या ठिकाणी लोकांची आणि प्रवाशांची खाण्यासाठी गर्दी होते.

अरुणाचल प्रदेश आणि आसपासच्या परिसरांत हॉटेल्स-हातगाडय़ांवर मिळणारे खाद्यपदार्थ किं वा ढाब्यांची फारशी रेलचेल नाही; पण तरीही इथल्या स्थानिकांच्या घरी तुम्ही पारंपरिक पद्धतीचे साधे आणि तितकेच वेगळी चव असलेले पदार्थ खाऊ शकता. त्यातीलच काही पदार्थ म्हणजे अपाँग आणि चुरा सब्जी. अपाँग हे तांदळापासून बनवलेलं एक प्रकारचं पेय आहे. लुगडीच्या जवळ जाणारं हे अपाँग या ठिकाणचं एक महत्त्वाचं पेय आहे. खाऊगल्लीत जितकं वैविध्य पाहायला मिळत नाही तितकं विविध प्रकारचं खाणं इथल्या घराघरांमध्ये बनवलं जातं. मात्र त्यासाठी इथे कुठे तरी स्थानिकांशी घरोबा करण्यावाचून पर्याय नाही. म्हणून जेव्हा केव्हा या भागाला भेट देण्याची संधी मिळेल तेव्हा इथल्या हटके पदार्थाची चव चाखणं जरुरी आहे आणि त्यासाठी कुणी तरी यार-दोस्त इथे असणंही जरुरी आहे हेही लक्षात असू द्या!

Story img Loader