हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
स्त्री-पुरुष आकर्षणात शरीरगंध हा अगदी पुराणकाळापासून महत्त्वाचा मुद्दा ठरत आला आहे. विविध उंची अत्तरं, सुगंध यांचा वापर आदिम काळापासून आहे. याच मुद्दय़ाचा जाहिरातीसाठी वापर करून एखादं उत्पादन केवळ विकणं नाही तर त्यावर तसा शिक्कामोर्तब होणं ही आधुनिक काळातील चतुराई आहे. असा स्मार्ट ब्रॅण्ड म्हणजे अॅक्स. सुगंधाच्या दुनियेतील मादक गंध म्हणून अॅक्स जगप्रसिद्ध आहे. अॅक्स डिओड्रंट, बॉडी स्प्रे यांची मोहिनी जगभर पसरली आहे. १९८३ मध्ये युनिलिव्हर कंपनीनं ‘इम्पल्स’ या स्वत:च्याच एका सुगंधी उत्पादनावरून हा ब्रॅण्ड बाजारात आणला. मात्र ट्रेडमार्कच्या समस्येमुळे युके, आर्यलड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन या देशांत मात्र हा ब्रॅण्ड ‘लिंक्स’ या नावानं आणला गेला. दक्षिण आफ्रिकेत यालाच ‘इगो’ या नावाने ओळखलं जातं.
हा ब्रॅण्ड जेव्हापासून बाजारात आला तेव्हापासून या ब्रॅण्डने ‘अॅक्स इफेक्ट’ ही संकल्पना कायम ठेवली. डिओड्रंटच्या गंधाने पुरुषांकडे खेचल्या जाणाऱ्या मुली किंवा स्त्रिया हेच गणित या ब्रॅण्डने वर्षांनुवर्षे गिरवलं. याचं मुख्य कारण हा ब्रॅण्ड बाजारात आला तेव्हा १५ ते २५ वयोगटातील तरुण हे त्याचे ग्राहकलक्ष्य होते. त्यामुळे एखाद्या हॅण्डसम तरुणाने आपलं शरीरसौष्ठव दाखवत अॅक्स फवारणं आणि मुलींनी आकर्षित होणं हे अनेक जाहिरातींमध्ये दाखवलं गेलं. त्यानंतर अगदी सामान्य किंवा बावळट मुलगा ज्याच्याकडे कुणीही बघत नसताना अॅक्सच्या फवाऱ्यानंतर मादक मुली आकर्षित होतात अशी थीम आणली गेली. एकूणच एखाद्या सामान्य मुलाचं कूल, ट्रेंडी आणि आत्मविश्वासपूर्ण तरुणात रूपांतर करणं हे अॅक्सचं इतिकर्तव्य म्हणून अधोरेखित झालं.
सुरुवातीच्या काळातील अॅक्स मस्क, अॅक्स स्पाईस, अॅम्बर, ओरीएन्टल, मरीन ही नावं गंधांवरून प्रेरित होती. १९९०-१९९६ काळात भौगोलिक ठिकाणांचा वापर केला गेला. १९९९ मध्ये अॅक्स भारतात दाखल झाला आणि तितकाच लोकप्रिय ठरला. अॅक्सच्या सुगंधी बाटलीवर नेहमी विविध प्रयोग केले गेले. २००४ मधली आठ सेंटीमीटरची अॅक्स बुलेट असो किंवा अगदी अलीकडची ‘पॉकेट साईज’, ‘अॅक्स तिकीट’ असो या नावीन्यपूर्ण पॅकिंगमुळेही अॅक्स गाजत राहिले.
अॅक्सच्या जाहिराती सेक्स, आकर्षण अशा मुद्दय़ांभोवती फिरत नेहमी मादकता मांडत आल्या. त्यातील सुगंधाचा प्रभाव महत्त्वाचा असूनही या मादकतेचं समीकरण या ब्रॅण्डभोवती कायम राहिलं. हे या ब्रॅण्डचं यशही आहे आणि मर्यादाही. डिओड्रंटसाठी अॅक्सच्या वेगवेगळ्या टॅगलाइन आहेत. ‘फाइंड युअर मॅजिक’, ‘द अॅक्स इफेक्ट’, ‘स्प्रे मोअर गेट मोअर’ तर बॉडी स्प्रेसाठी टॅगलाइन आहे, ‘डोन्ट रिलाय ऑन फेट’ ३५वर्षांचा हा सुगंधी प्रवास नेहमीच तरुण तरतरीत राहिलेला आहे.
काही उत्पादनं आपल्याला छान आत्मविश्वास देतात. त्यांच्याशी जोडलेल्या संकल्पनांचा तो प्रभाव असतो. स्त्रियांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर अनेकींना एखादी विशिष्ट लिपस्टिक लावल्यावर छान वाटतं. म्हणजे लिपस्टिकशिवाय त्या वाईट दिसतात किंवा त्यांना वाईट वाटतं असं नव्हे. पण काही उत्पादनं ‘फिल गुड’चा अनुभव देतात हे नक्की! अॅक्सच्या बाबतीतही तेच सांगता येईल. हा सुगंध इतर कोणत्याही चांगल्या डिओड्रंट इतकाच छान आहे. पण त्याच्याशी जोडलेली मादकतेची संकल्पना उगाचच एक वेगळा आत्मविश्वास देऊन जाते. म्हणूनच सुगंधाच्या दुनियेतील हा अॅक्स इफेक्ट तुम्हाला तुमची जादू शोधून देतो.
viva@expressindia.com