गायत्री हसबनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकाल सोशल मीडियावरून खरेदी करत असताना नवीन प्रॉडक्ट्स अजमावून पाहण्याचा मोह आपल्याला होतो आणि तसा प्रयत्नही आपण करतो. त्यामुळे ऑनलाइन बाजारात सर्वसाधारणपणे नव्या रूपात आलेले काही महत्त्वपूर्ण ब्रॅण्डचे प्रॉडक्ट्स योग्य आहेत की नाहीत याकडे आपण कमी लक्ष देतो. यंदा सीझनमध्ये आणि सीझनच्या आधीही अनेकविध विंटर प्रॉडक्ट्स आले आहेत. या प्रॉडक्ट्सचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यापैकी विंटर केअर प्रॉडक्ट्सवर टाकलेली एक नजर. यंदा बॉडी लोशन आणि क्रीम्स हे काही नामवंत ब्रॅण्डकडून आले आहेत. त्यामुळे दोन्हींचा फायदा यंदा करून घ्यायलाच हवा.

बॉडी लोशन्स

* तुमच्या खिशाला परवडतील असे खास थंडीसाठीचे बॉडी लोशन्स स्वस्त दरात बाजारात उपलब्ध आहेत. ‘स्नेटेक्स’ या ब्रॅण्डकडून २८५ रुपये एवढय़ा किमतीत नॅचरल विंटर बॉडी लोशन मिळेल जे स्नॅपडीलवर १० टक्के सूटसह उपलब्ध आहे. ‘हिमायला’चेही नरिशिंग बॉडी लोशन १८५ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे, तर ‘लोटस’चे हर्बल्स आमंड नरीश बॉडी लोशन २७० रुपयांत मिळेल.

* लॅक्मे, डव्ह, निव्या, बायोटिक या ब्रॅण्डकडून अनुक्रमे ३३०, ६९९, ४४०, ५९० रुपये अशा विविध किमतींत बॉडी लोशन उपलब्ध आहे. ‘लॅक्मे’कडून फ्रुट मॉइश्चरायझर विंटर लोशन्स आहे जे ११०, २१० रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे. ‘निव्या’चे नरिशिंग बॉडी मिल्क विथ आमंड ऑइल हे प्रॉडक्ट ७५ एमएलमधील ६० रुपये, तर ४०० एमएलचे २५५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ‘निव्या’प्रमाणे ‘व्ॉसलिन’कडूनसुद्धा इन्टेसिव्ह केअर डीप रिस्टोअर बॉडी लोशन ४० एमएल ४५ रुपये, तर १०० एमएल ८९ रुपये आणि ४०० एमएल २३३ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. याच ब्रॅण्डकडून कोकोआ ग्लो बॉडी लोशन २६० रुपये एवढय़ा किमतीत मिळेल.

* ‘एवेन’कडून कोल्ड क्रीम बॉडी लोशन ६६८ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे. ‘पॅरेशूट अ‍ॅडव्हान्स’ डीप नरीश बॉडी लोशन २० रुपयांपासून मिळेल. ‘लॅक्मे’चे पीच मिल्क बॉडी लोशन २१७ रुपयांत उपलब्ध आहे. हिमालया आणि निव्याचे दोन महत्त्वाचे प्रॉडक्ट एक म्हणजे कोको बटर आणि अ‍ॅलोवेरा हायड्रेशन हे दोन्ही बॉडी लोशन १९३ आणि २७३ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत. ‘डव्ह’चे विंटर केअर बॉडी लोशन लिमिटेड एडिशन २,८१८ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे.

* ‘न्यासा’ या ब्रॅण्डकडून डिवाइन लोटस बॉडी लोशन ४२५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल, तर याच ब्रॅण्डकडून ‘लिली ऑफ द व्हॅली’ हे बॉडी लोशनही ४२५ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे. ‘बॉडी क्युपिड’ या ब्रॅण्डकडून अ‍ॅपल ब्लोसम आणि टय़ुबरोझ या दोन फ्लेवरचे बॉडी लोशन ४९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल.

विंटर क्रीम्स

* ‘बायोकेअर’ या ब्रॅण्डकडून अ‍ॅवाकाडो, आमंड ऑइल, कॅरेट सीड ऑइल या फ्लेवरमध्ये बॉडी क्रीम्स मिळतील. १२१, ३०८ आणि ४०० रुपये या विविध किमतीत सिंगल आणि डबल पॅक्सही मिळतील. ‘व्हीएलसीसी’कडून मॉइश्चरायझर कोल्ड क्रीम ५१ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे.

* ‘हिमायला’कडून नरिशिंग स्कीन क्रीम १२० रुपये एवढय़ा किमतीत आहे. ‘द बॉडी शॉप’कडून स्ट्रॉबेरी सॉफ्टनिंग क्रीम ६०० रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ‘कामा आयुर्वेदा’कडून मुलांसाठी नाइट क्रीम १,६९५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल.

* ‘न्यूट्रोजिना’चं फेशियल मॉइश्चरायझर ३३४ रुपये एवढय़ा किमतीत आहे. मुलांसाठी ‘गार्निअर’कडून मेन पॉवर व्हाइट फेअरनेस क्रीम १६५ रुपये या दरात आहे. ‘लोट्स हर्बल्स’चे व्हीट नरीश क्रीम २५९ रुपये या किमतीत मिळेल. ‘आयुष’कडून सॅफरॉन फेस क्रीम ११८ रुपये एवढय़ा किमतीत आहे. ‘बायोटिक’चे बायो व्हाइट जर्म, बायो विंटर ग्रीन हे दोन क्रीम्स २०७ रुपये आणि १७९ रुपये या दरात उपलब्ध आहे.

* ‘डाबर’चे गुलाबरी विंटर क्रीम (कोल्ड क्रीम) ४७, ८० रुपये एवढय़ा किमतीत मिळेल आणि ‘पॉन्ड्स’चे मॉइश्चरायझर कोल्ड क्रीम ४०, ४४ रुपयांपासून सुरू आहे. तसेच ‘ओले’कडून मॉइश्चरायझर स्कीन क्रीम २७५ रुपये एवढय़ा किमतीत आहे. ‘बॉडी क्युपिड’ या ब्रॅण्डकडून चार वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये म्हणजे पिंक लोटस, शिया ऑरगन ऑइल, रेड पल्म आणि एम्ब्रोसियामध्ये १,०९९ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत.

यंदाचे सर्व प्रॉडक्ट्स मॉइश्चरायझर आणि हायड्रेशनयुक्त असल्याने थंडीच्या हिशोबाने अशा प्रॉडक्ट्सवर भर द्यावा. प्रत्येक प्रॉडक्टवर त्याच्या गुणधर्मासह त्याचे नाव असल्याने हायड्रेड, मॉइश्चराइज्ड आणि नरेशिंग असे गुणधर्म असलेले प्रॉडक्ट्स विकत घ्यावेत. आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सही तुम्ही वापरू शकता. यंदा विंटर प्रॉडक्ट्सवर १० ते २० टक्के सूट पाहायला मिळते आहे. हे प्रॉडक्ट्स फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझोन आणि स्नॅपडीलवर उपलब्ध आहेत.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Body lotions for winter winter care products body creams for winter