हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या नव्या सदरातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही खुणा, काही रेषा सोबत नशीब घेऊन येतात. त्या रेषांमध्ये असं काय विशेष असतं? ना कोरीव नक्षी ना जगावेगळा आकार; तरी त्या रेषा जग जिंकतात. अशी तीन रेषांची ही कहाणी. मात्र त्या रेषांमागे आहे विश्वास, मेहनत आणि प्रभाव. या तीन रेषा बुटांवर उमटतात तेव्हा बुटांसोबत उमटणारी पावलं आत्मविश्वासाची, खात्रीची असतात. युरोपातील नंबर वन आणि जगभरातील दुसरा सर्वात मोठा शू ब्रँड ‘अदिदास’. त्या तीन रेषांची कहाणी इथे उलगडते.

भारतीय मनाला अदिदास नाव जवळचं वाटणं स्वाभाविक आहे, पण नावाचं काही सांगता येत नाही. मराठी पारकर इंग्लिश Parker कधीही चकवा देऊ  शकतात. अदिदास या नावातही असाच जर्मन चकवा आहे. मात्र तो जाणून घेण्यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल.

जर्मनीतल्या Herzogenaurach (या नावाचा उच्चार करण्यापेक्षा कोण्या एका गावी म्हणणं जास्त सोपं व्हावं) या गावी ख्रिस्टोफ वोन विल्यम डॅसलर एका शू कंपनीत काम करत असे. त्याची बायको घरच्याघरी लॉण्ड्री चालवायची. यांना दोन मुलं रुडॉल्फ म्हणजेच रुडी डॅसलर आणि अडॉल्फ अर्थात अदि किंवा एडी डॅसलर. यातल्या अडॉल्फने आईच्या या छोटय़ाशा लॉण्ड्रीत स्वत:च स्पोर्ट्स शूज बनवायला सुरुवात केली. जुलै १९२४ मध्ये रुडॉल्फ फॅक्टरीतला जॉब सोडून भावाच्या या छोटय़ाशा व्यवसायात सामील झाला. महायुद्धाच्या काळात वीजपुरवठा अनियमित होता त्यामुळे या छोटय़ाशा घरगुती फॅक्टरीत शूज तयार करण्यासाठी दोन्ही भावंडं चक्क काही वेळा स्टेशनरी बायसिकलवर पॅडल मारून त्यातून निर्माण होणाऱ्या विजेवर आपली उपकरणं चालवत. डॅसलर ब्रदर्स शू फॅक्टरीची ही सुरुवात होती.

१९३६ मध्ये अदी डॅसलरला एक संधी खुणावू लागली. १९३६ मध्ये भरलेले समर ऑलिम्पिक्स आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल हे त्याने जाणलं. स्पाइक्सने भरलेली बॅग घेऊन अदी डॅसलर ऑलिम्पिकनगरीत दाखल झाला. त्याने अमेरिकेचा धावपटू जेस्सी ओवेन्स याला आपले स्पोर्ट्स शूज स्पॉन्सर केले. त्यावर्षी जेस्सी चार सुवर्णपदकं जिंकला. यशाइतकी दुसरी उत्तम प्रसिद्धी नसते. जेस्सीच्या पदकांनी डॅसलर शू फॅक्टरीचं नाव सर्वदूर झालं. दुसऱ्या महायुद्धाआधीपर्यंतच्या काळात डॅसलर शू फॅक्टरी वर्षांला दोन लाख शूज विकण्यापर्यंत भक्कम परिस्थितीला पोचली.

प्रत्येक व्यवसायाला यशाच्या शिखरावर पोहचल्यावर दुहीचा शाप असतो का? दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान काही गैरसमजांमुळे डॅसलर बंधूत वितुष्ट आलं. १९४७ मध्ये अधिकृतपणे हे दोघं भाऊ  वेगळे झाले. रुडॉल्फने स्वत:ची शू कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव होतं a RUDA (रुडा) रुडॉल्फ डॅसलर या नावातील सुरुवातीची दोन अक्षरं घेऊन हे नाव गुंफलं गेलं. कालांतराने हाच ‘रुडा’ ब्रॅण्ड नव्या नावासह समोर आला. तो आहे आताचा PUMA हा शू ब्रँड. अदीने हाच फंडा नावासाठी वापरला Adolf  Dassler मधली सुरुवातीची अक्षरं वापरून तयार झाला नवा ब्रॅण्ड Adidas. याचा उच्चार एडिडास, अदिदास असा विविध पद्धतीने होत असल्याने नेमक्या उच्चाराबाबत गोंधळ होतो. मात्र भारतीय मंडळी अदिदास हाच उच्चार बहुतांश वेळा करतात. जो चूक नाही, पण हे इंडियन नाही तर जर्मन कनेक्शन आहे हे बऱ्याचदा ज्ञात नसतं. एकदा एखाद्या ब्रॅण्डचं नाव झालं की मग काय हवे ते संदर्भ त्याला जोडता येतात. अदिदास मधल्या अडॉल्फने डॅसलरला बाजूला ठेवून All day I dream about sports असाही या आद्याक्षरांचा अर्थ काढला गेला, पण ती केवळ गंमत ठरावी.

अडॉल्फने आपल्या लोगोसाठी फार खोल विचार वगैरे न करता त्याच्या शूजवरील तीन स्ट्रिप्सचं- रेषांचं डिझाइनच लोगो म्हणून पुढे आणलं जे आजही साऱ्या जगात विख्यात आहे. अडॉल्फच्या या व्यवसायाची सुरुवातीची ओळखच Three strips company अशी होती. मधल्या काळात या तीन रेषांना त्रिदलातून साकारलं गेलं. कंपनीच्या भरभराटीचा, विस्ताराचा विचार त्यातून दर्शवायचा होता. आताही हा लोगो काही क्लासिक प्रॉडक्ट्ससाठी वापरला जातो. नव्या लोगोतही तीन रेषा आणि अदिदास नाव कायम आहे. काहींना या चढत्या श्रेणीच्या रेषा पर्वताची आठवण देणाऱ्या वाटतात. कंपनीचा चढता आलेख त्यातून दिसतो.

हाथो की चंद लकीरों का ये खेल हे बस्स तकदीरोंका. या तीन लकीरींनी अडॉल्फची तकदीर बदललीच, पण जगभरातल्या स्पोर्ट्स शूजप्रेमींसाठी एक उत्तम पर्यायही निर्माण केला. छोटय़ा लॉण्ड्रीरूममधून सुरू झालेला प्रवास व्हाया ऑलिम्पिक, भावांमधील भाऊबंदकीच्या विरामासह पुन्हा वेगवेगळ्या रेषांवर सुरू होण्याची, विस्तारण्याची ही कथा. म्हणूनच तीन रेषांची ही कहाणी सुफळही आहे आणि संपूर्णही.

रुडॉल्फ म्हणजेच रुडी डॅसलर आणि अडॉल्फ अर्थात अदि किंवा अ‍ॅडी डॅसलर या जर्मन बंधूंनी अगदी तरुणपणीच आईच्या छोटय़ाशा लॉण्ड्रीत स्पोर्ट्स शूज बनवायला सुरुवात केली. डॅसलर ब्रदर्स शू फॅक्टरीची ही सुरुवात होती. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान काही गैरसमजांमुळे डॅसलर बंधूत वितुष्ट आलं. रुडॉल्फने स्वत:ची शू कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव होतं RUDA (रुडा) रुडॉल्फ डॅसलर या नावातील सुरुवातीची दोन अक्षरं घेऊन हे नाव गुंफलं गेलं. कालांतराने हाच ‘रुडा’ ब्रॅण्ड नव्या नावासह समोर आला. तो आहे आताचा PUMA हा शू ब्रँड. अ‍ॅडीने हाच फंडा नावासाठी वापरला Adolf  Dassler मधली सुरुवातीची अक्षरं वापरून तयार झाला नवा ब्रॅण्ड Adidas.

viva@expressindia.com