अगदी स्ट्रीट मार्केटपासून, हायएण्ड मॉल्सपर्यंत सगळीकडे नवीन कलेक्शन सजलं आहे. खूप वेगवेगळे ट्रेंडी आऊटफिट्स सध्या बाजारात दिसत आहेत आणि या आऊटफिट्सबरोबरीने त्यावर वापरायचे दागिनेदेखील ट्रेण्डी बनताहेत. ज्वेलरी ट्रेंडी होत आहे. मधला काही काळ कमीत कमी किंवा छोटे- नाजूक दागिने वापरायचा ट्रेण्ड होता. वेस्टर्न आऊटफिट्स आणि फ्यूजन वेअरवर, तर मोठे दागिने अजिबात वापरले जायचे नाहीत; पण गेल्या दीडेक वर्षांपासून अॅक्सेसरीज म्हणून ज्वेलरी पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर वापरण्यात येत आहे. ज्वेलरीचे भरपूर वेगवेगळे ट्रेण्ड्स यंदाच्या सीझनमध्ये बघायला मिळत आहेत. मोठमोठे ऑक्सिडाइज्डचे चंकी नेकपीसेस मध्यंतरी ट्रेण्डमध्ये होते. त्यानंतर रंगीबेरंगी खडे किंवा मोत्यांच्या ज्वेलरीने वेगळा ट्रेण्ड सेट केला होता आणि आता कलरफुल अशा गोंडय़ांची ज्वेलरी ट्रेंड-सेटर ठरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा