पंकज भोसले viva@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेडियोच्या विविध भारतीवरील प्रायोजित गीते आणि दूरदर्शनवरील चित्रगीत-चित्रहार अनुभवणाऱ्या एका पिढीला कार्यक्रमाची सांगता सांगणारी समारोप गीते अत्यंत परिचयाची होती. ‘चलते चलते, मेरे ये गीत याद रखना’, ‘आज की मुलाखात बस इतनी’ छापाची अलविदा गीतांची ठरलेली माळ या कार्यक्रमांच्या अखेर वाजे. ही गाणी जणू कार्यक्रम अखेरासाठी तयार करण्यात आल्यासारखे वाटे.

सध्या २०१८ वर्षांला समारोप देताना या वर्षभरातील उत्तम गाण्यांचा उजळणी उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. बहुतांश मॉल- कॅफेजमध्ये नाताळवर आधारलेल्या गाण्यांचा उत्सव सुरू आहे.

गेल्या वीस-तीस वर्षांमध्ये आपल्या सांगीतिक भवतालामध्ये अभूतपूर्व बदल झाले. भल्या सकाळी कल्हईवाल्यांसह कित्येक फेरीवाल्यांच्या हाळ्यांनी सुरू होणारा सूरप्रवास पूर्णपणे आटला. घराघरांमध्ये वाजणाऱ्या रेडिओंची संख्या कमी  झाली. रिक्षा-टॅक्सीमध्ये एफएम रेडिओ सुरू असले, तरी त्यात संगीताऐवजी संवादाचाच अतिरेक सुरू झाला. ढिगानी संगीत वाहिन्या आल्यानंतर एकाच वाहिनीवर एखादे गाणे पूर्ण ऐकत पाहण्याचे मानसिक स्थैर्य संपले. यूटय़ूब आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या मनातील चित्रगीत-चित्रहार तयार करण्याची मुभा मिळाली. पॉप-रॉक स्टार्सदेखील या यूटय़ूब वाहिनीवरून तयार व्हायला लागले.

संगीताचे पारंपरिक स्रोत आटून नवे डाऊनलोडिंगचे अनंत प्रवाह उपलब्ध झाल्यानंतर संगीत रसिकांकडे गाणी जीबीच्या प्रमाणात साठून राहायला लागली. पण ती ऐकायला एमबीच्या स्वरूपातीलही वेळ शिल्लक राहिला नाही. रफी-मुकेश-किशोर-लता-तलत- आशा आदी गायक-गायिकांचे जन्मजात चाहते असणाऱ्यांची पिढी गेल्याच दशकात बाद झाली. एखाद्या आवाजाशी फारतर सहा महिने एकनिष्ठ राहणारा संगीतप्रेमी सध्या शोधून सापडायचा नाही.

लोकप्रिय संगीतात समाजबदलासोबत होत जाणाऱ्या फरकाचा फारशा बारकाईने आपल्याकडे कुणी अभ्यास वा निरीक्षण केल्याचेही दिसून येत नाही. दोन हजारोत्तर काळात जगात सुरू असणाऱ्या सर्व सांगीतिक प्रवाहांचा आपल्या हिंदी चित्रसंगीतात आणि पॉप म्युझिकमध्ये समावेश झाला. कॅसेटवरून सीडीवर आणि सीडीवरून पेनड्राइव्हवर आलो, इतका तांत्रिक बदल वरकरणी दिसत असला, तरी गाण्यांमधील शब्दांपासून ते त्यातील भावार्थामध्ये प्रचंड मोठी घुसळण झाली. शोर इन द सिटीमधील ‘कर्मा इज ए बिच’, दिल्ली बेलीमधील ‘डीके बोस’,  गँग्ज ऑफ वासेपूरमधील ‘तेरी केहके लुंगा’ यासारख्या शब्दांची गाणी तयार होऊ शकतील यावर दशकापूर्वी कुणाचाच विश्वास बसला नसता. बरे ही गाणी सांगीतिक प्रयोगांसह समाजाच्या आजच्या जगण्याचे तत्त्वज्ञान अचूक पकडत असल्याने केवळ द्वयार्थी म्हणून निर्थक ठरवता येत नाहीत. या गाण्यांनी पारंपरिक सरधोपट शब्दांना पर्याय करून दिले. प्रेमगीतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘हिरनी जैसी आँख’ आणि ‘मोरनी जैसी चाल’ वगैरे उपमा आजच्या मुख्य प्रवाहातील गीतांमधून हद्दपार होऊ लागल्या आहेत, हे चांगलेच म्हणावे लागेल.

सध्या आपला कान ग्लोकल संगीताच्या कात्रीत सापडलेला आहे. आंतरराष्ट्रीय संगीत वाहिन्यांवरून कोसळणारा जागतिक संगीताचा प्रवाह आपल्याला टाळता येणे शक्य नाही. इथल्या शुद्ध शास्त्रीय-उपशास्त्रीय आणि लोकप्रिय संगीताशी असलेले आपले लागेबांधे मोडता येणारे नाही. कोणत्याही प्रहरी आपल्या कानावर भिन्न प्रवृत्तीचे आणि प्रकृतीचे संगीत कुठल्याही माध्यमातून कानावर पडतच असते. आपापल्या स्वरजाणीवांनुसार प्रत्येक जण त्याचा आनंद घेतो किंवा त्यापासून फटकून लांब राहतो. ताजे संगीत ऐकत छिन्नमनस्क अवस्थेत जाऊ शकणाऱ्या संगीत रसिकाला आपली आवड ठरविणे अवघड बनले आहे. अशा प्रसंगी ट्रेण्डमध्ये असलेल्या पॉप्युलर संगीताच्या ऑनलाइन याद्या काहीच कामाच्या नसतात. त्या निव्वळ मार्ग दाखवू शकतात. मात्र याद्यांमधील सारीच गाणी आपल्याला आवडतीलच अशी नसतात. जन्मापासून आपण भवताली जे ऐकलेले असते, त्या सगळ्यातून आपल्या कानांचा वकूब तयार झालेला असतो.

इंटरनेट आणि विविध डाऊनलोड्स साइट्सचा हा फायदा झाला, की पूर्वी पायपीट करूनही उपलब्ध न होणारी गाणी आज एका क्लिकद्वारे तुमच्या अनुभूतीसाठी सिद्ध होतात. शोध घेतला तर आपल्या आवडीची गाणी मिळविणे कुणालाही आज कुणाच्याही सल्ल्याशिवाय शक्य आहे. बोजड संगीत समीक्षा वाचून, ओळखीतील कानसेनांच्या नाकदुऱ्या काढून आपल्याला समाधान देणारे संगीत मिळविता येत नाही. चांगले ऐकायची आणि न थकता शोधायची तयारी असली, तर आपणच आपले संगीतगुरू बनू शकतो.

वर्षभर सुरू असलेल्या या स्तंभाचा समारोप निरोपासाठी ओळखल्या जाणाऱ्या काही उत्तम गीतांनी करणे इष्ट ठरेल.

म्युझिक बॉक्स

Phillip Phillips – Gone, Gone, Gone

Michelle Branch – Goodbye To You

MAROON 5- NOTHING LAST FOREVER

Westlife – Seasons In The Sun

Dixie Chicks – Wide Open Spaces

Phil Collins- On My Way

Ray Charles – Hit The Road Jack