क्रिकेट प्रेमींची संख्या आपल्याकडे खूप मोठी आहे आणि त्याच बरोबर त्यांचा क्रिकेटचा क्रेझीनेस तर अगदी उघडपणे दिसतोय. अशातच सध्या टी २०चे वारे वहात असतानाच कधी अंगाला तिरंगी रंगांनी रंगवणे, टीम जर्सीज घालून मिरवणं, एखाद्या खेळाडूची जर्सी तशीच्या तशी शोधून विकत घेऊन घालणं, कधी मास्क लावणं तर कधी आणखी काही.. त्यात आता क्रिकेटपटूंच्या स्टाइल्सची चलती आहे. फूटबॉलपटूंप्रमाणे हल्ली क्रिकेटपटूंच्या हेअरस्टाइलही चर्चेचा विषय असतात. धोनी, कोहली, शिखर धवन, रैनासारखी हेअरस्टाइल हवी, असं सांगणारे त्यांचे फॉलोअर्स कमी नाहीत.

हेन्कल ब्युटी केअर इंडियाचे स्टाइलिस्ट आणि श्वारकोफ प्रोफेशनल पार्टनरशिप सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख नजीब उल रेहेमान यांनी असे वैशिष्टय़पूर्ण हेअरकट्स आणि स्टाइल्स कशा करायच्या, त्या स्टाइल्सना काय म्हणतात याविषयी माहिती दिली.

एम. एस. धोनी
धोनीच्या हेअरकट्सची चर्चा सुरुवातीपासून असते. धोनीची सध्याची स्टाइल नीट अँड क्लीन आहे. कोणत्याही ऑकेजन ला सूट होईल असा हा हेअरकट आहे. या हेअरकटला ‘युनिफॉर्म विथ क्रू कट’ म्हणता येईल. हा कट करण्यासाठी हेअर क्राउनवर हॉर्स शू सेक्शन करून घेऊन आणि त्याला छान युनिफॉर्म लेयर्स द्यायचे असतात. हेअरकटची ‘सीझर्स ओवर कोंब’ ही पद्धती वापरून डोक्याच्या मागच्या बाजूला आणि साईड्स ला कट करून घेऊन दोन्ही लेन्थला टेक्शर आणि ब्लेंड करून हा हेअर कट पूर्ण होईल.

सुरेश रैना
सुरेश रैनाचा हेअरअट ‘डिस्टिंक्टिव्ह अंडर कट’ प्रकारात मोडतो. या हेअरकटच्य बरोबरीने असलेली सॉफ्ट बियर्ड त्याला वेगळाच पण मॅच्युअर लुक देऊन जाते. टॉप क्राउनवर काही सेक्शन्स करून घ्यायचे आणि हेअर क्लिपर्स वापरून साईड्सना आणि मागे अर्धा-अर्धा इंच केस कापून घेऊन वारचे केस तसेच ठेवायचे. या केसांना फक्त टेक्श्चर दिलं की, रैना सारखा हेअर कट मिळेल.

विराट कोहोली
विराटची हेयर स्टाइल सध्याच्या ट्रेण्डमधली सगळ्यात इन स्टाइल आहे. त्यामुळे ती अनेकांना करावीशी वाटते. डोक्याच्या दोन्हीकडच्या बाजूंना कमी लेन्थचे केस आणि डोक्यावर मिडीयम लेन्थचे केस अशी हेअरस्टाइल. पण त्याबरोबरच वेल मेण्टेण्ड दाढी हवी. त्यामुळे मस्क्युलाइन आणि वेल डिफाईन्ड लुक मिळतो.

रवींद्र जडेजा
क्लासिक बार्बरिंग टेक्निक बरोबरीनी क्रॉप्ड टॉप टेक्निक आणि टेक्शरिंग सीझर्स या सगळ्यामुळे रवींद्रला एक प्रकारचा किलर लुक मिळतो.

Story img Loader