आतापर्यंत वन्नाक्राय, रॅन्समवेअर आणि मालवेअर हे त्रिकुट तुमच्या डिक्शनरीचा भाग झालं असेल. रक्त, बंदुकीच्या गोळ्या, हिंसा असलं काहीही न होता तुम्हाला सर्वार्थाने घायाळ करण्याची शक्ती यांच्याकडे आहे. पण हे तर थेट आक्रमण झालं. छुप्या गनिमी काव्याचं काय. कुठला काय विचारता-रोज तर होतो पण जाणवत नाही तो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही एका विशिष्ट कंपनीचं सिमकार्ड वापरता. जेव्हा तुम्ही सिमकार्ड विकत घेतलेलं असतं तेव्हा कंपनीकडे कागदपत्रं आणि तुमचा डेटा सबमिट केलेला असतो. तुम्ही आणि कंपनी यांच्यात झालेला व्यवहार असतो. असं असताना तुम्ही वापरत असलेल्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी सिम कंपनीचा तुम्हाला फोन येतो. मधाळ भाषेत हॅलो विचारतात. तुमची ख्यालीखुशाली विचारून आता आपण बोलू शकतो का विचारतात. आपण हो किंवा नाही काहीही म्हटलं तरी मगापेक्षा आणखी मधाळ भाषेत कंपनीने लाँच केलेला भारी प्लॅन ऐकवला जातो. तुम्ही नाही, नको म्हणता तरी त्या प्लॅनचे फिचर्स तुमच्या कानात ओतले जातात. तुम्ही बिझी आहे सांगता किंवा नको म्हणता किंवा चिडून फोन कट करता. या मधाळ सेल्समनला कुठून मिळतो आपला नंबर? त्यांची कंपनी आपल्या कंपनीची प्रतिस्पर्धी. मग आपल्या कंपनीचा डेटाबेस क्रॅक करून नंबर कसा मिळवला जातो. कोण करतं हा जुगाड? बरं नाव-गाव-फळ-फूल सारखा खेळ नसतो हा रँडमवाला. आपली कुंडली खणल्यानंतरच कॉल आलेला असतो. कोणी दिली परवानगी दुसऱ्या कंपनीचा क्लायंट मिळवून त्याला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवण्याची. आपण आपला नंबर ठराविक माणसांनाच देतो. आपल्या नंबरची प्रायव्हसी परवानगीशिवाय दुसऱ्या कंपनीला विकली जाते का? काय कटकट आहे राव म्हणून आपण सोडून देतो पण कुठेतरी पाणी मुरतंय बॉस.

आठवीत शिकणाऱ्या महेशपासून, आयुष्याच्या संध्याकाळी पोहचलेल्या आजोबांपर्यंत हल्ली स्मार्टफोन असतो. हँडसेट तयार करणारी कंपनी चीनची असो किंवा भारतीय बनावटीची- त्यात प्लेस्टोअर नावाचं दुकान असतं. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये शाखा असणाऱ्या या दुकानात अ‍ॅप विकली जातात. तीही फुकट. रेल्वे-बसची वेळापत्रकं, गाणी डाऊनलोडिंग, शेअरबाजारचं डीलिंग, मंत्रपठणं अशा कशाचंही अ‍ॅप असतं. अ‍ॅप हुडकायला एखादं मिनिटं लागतं, इन्स्टॉल म्हटलं की एक नोटिंग येतं. डोळ्याचं पातं लवेपर्यंत आपण त्याला हो म्हणून मोकळेही झालेलो असतो. हे नोटिंग विचारतं- तुमच्या स्मार्टफोनचं डोकं म्हणजे वेगवेगळ्या कामाचा, मनोरंजनाच्या, दैनंदिन रुटिनच्या फाइल्स तयार झालेल्या असतात. त्या सगळ्याला अ‍ॅक्सेस हवाय असं ते नोटिंग म्हणतं. म्हणजे मोबाइलमधला आपला डेटा आपण आपल्याच परवानगीने त्या अ‍ॅप निर्मिणाऱ्या कंपनीला वापरण्याची मुभा देतो. ही प्रोसेस इतकी क्विक होते की त्यातली मेख आपल्या लक्षात येत नाही. पण दादा, जांगडगुत्ता आहे की नाही? एका अज्ञात कंपनीला तुमच्या मोबाइलमधला डेटा अ‍ॅक्सेस आहे. त्या डेटाचं ते काय करतात माहीत नाही.

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या यादीत ‘वायफाय’ अ‍ॅड झालंय. वायफाय-गरज की चैन असे निबंधही सातवीच्या विद्यार्थ्यांना विचारले जाऊ शकतात. हल्ली सार्वजनिक ठिकाणीही वायफाय देतात. त्या रेडियस सर्कलमध्ये गेलो आणि समोर मोठय़ा होर्डिगवर दिलेला पासवर्ड टाकला की नेटची गंगा स्मार्टफोनमध्ये वाहती होते. ऑफिशियल डेटा रिलीजनुसार, जेन्युइन कामांऐवजी आंबटशौकीन वायफायचा काव्यशास्त्रविनोदासाठी वापर करत असल्याचं उघड झालंय. घरच्या वायफायथ्रू व्हायरस येतात. पण मर्यादित वर्तुळ असल्याने आपण रोखू शकतो. पण आओ जाओ घर तुम्हारा यंत्रणेतून येणाऱ्या व्हायरसचं काय? ओपन सोर्स नेटवर्कवर एथिक्स पाळण्याची जबाबदारी कोणाची? नैतिकतेच्या गप्पा मारताना फुकट ते पौष्टिक अंगीकारण्याची खोड अनेकांना आहे. त्यांच्यामुळे आपलं डिव्हाइस व्हायरसच्या गर्तेत सापडलं तर नुकसानभरपाई कोण देणार?

व्हॉट्सअपवर नसलेल्या माणसाला आपण मागास ठरवतो. खाली मुंडी, पाताळधुंडी होऊन व्हॉट्सअपवर ५७ ग्रुप आणि प्लस वन टू वन असं भराभरा टाइप करणारी माणसं आहेत. पण हा सगळा टेक्स्ट जगातल्या कुठल्यातरी सव्‍‌र्हरवर नोंदला जातो. त्याचं शिस्तबद्ध अ‍ॅनॅलिसिस केलं जातं. लोकं काय बोलतात, कुठल्या निमित्ताने ग्रुप तयार होतात, सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह असण्याच्या वेळा कोणत्या, कोणत्या स्माइली सर्वाधिक वापरल्या जातात असा शास्त्रोक्त अभ्यास होतो. फेसबुकवरही आपण ज्या गोष्टी लाइक करतो, ज्या पोस्ट टाकतो, जे शेअर करतो त्याचं विश्लेषण होऊन त्यानुसार उजवीकडे अ‍ॅड प्रदर्शित केल्या जातात. व्यासपीठ त्यांचं, प्रोफाइल आपलं, डेटाची मालकी त्यांची झाली की राव!

परवा आम्हाला एक स्वप्न पडलं. खरंतर आडवं होताक्षणी झोप लागते आम्हाला आणि सूर्यकिरणांची ब्रन्चची वेळ होते तेव्हा आम्ही डोळे उघडतो. स्वप्न होतं पासवर्डचं. सगळ्या पासवर्डची भेळ होऊन  कल्ला उडालाय. तीन वैैयक्तिक इमेल, ऑफिसचा इमेल, नेटबँकिग, रिझव्‍‌र्हेशन्स, एफबी, इन्स्टाग्राम, लिंक्डिन, लॅपटॉप, सेलफोन अशा साधारण १९ पासवर्डचा कोलाज होऊन अमूर्त शैलीतलं चित्र तयार झालंय असं दिसू लागलं. एकत्र झाल्याने त्यांचं मूळ स्वरुप डोक्यातून नष्ट झालं होतं. बरं प्रत्येक ठिकाणी ‘फरगेट पासवर्ड’ म्हटल्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तरही विसरलोय असं भयप्रद स्वप्न होतं. ‘कुणी पासवर्ड देता का पासवर्ड’ अशी गत झालेली दिसली. झोपेत ‘पासवर्ड हवाय’ असं ओरडत असल्याचं लक्षात आल्यावर घरच्यांनी जागं केलं. आधी थंडगार पाणी आणि नंतर आलं घातलेला चहा दिला. तेव्हा कुठे पासवर्डच्या कोशातून बाहेर आलो आम्ही.

viva@expressindia.com