आजच्या तरुणाईला रफ अॅन्ड टफ गोष्टींची गरज आणि वेड आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना कमीत कमी मेंटेनन्स लागणाऱ्या गोष्टी मिळाल्या तर हव्याच असतात. डेनिम्स किंवा जीन्स लोकप्रिय होण्यामागे हेच कारण आहे.
कमीत कमी काळजी घेतली तरी जीन्स टिकते. त्यामुळेच ती तरुणाईची लाडकी आहे. कॉलेज, कॅज्युअल पार्टी, आउटिंग, अगदी ऑफिसवेअरमध्येदेखील जीन्स लोकप्रिय होत आहे. डेनिम्स मेंटेन करायला सगळ्यात सोप्या समजल्या जातात. मात्र त्यांचीसुद्धा काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक असतं. जीन्स धुवायची ती कशी, त्याला इस्त्रीची आवश्यकता असते का.. असे अनेक प्रश्न मनात येतात. जीन्स धुतली नाही तरी चालते असा एक मतप्रवाह आहे. पण डेनम्स धुण्याची दोन मुख्य कारणं आहेत. म्हणजे स्वच्छता आणि दुसरं म्हणजे वापरल्यामुळे बिघडलेला डेनिमचा ‘शेप’. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून आपण जगाच्या कोणत्या भागात आहोत आणि कोणत्या वातावरणात आहोत ते महत्त्वाचे ठरते. दमट हवामानात असल्यास तीन ते दहा दिवसांनी डेनिम्स धुणं चांगलं. पण कोरडय़ा हवामानात आणि कमी धुळीच्या देशांमध्ये १५- २० वेळा वापरल्यानंतरही जीन्स धुवायची गरज पडत नाही. तुमचा वापर कुठे आणि कसा आहे यावर डेनिम वॉश अवलंबून असतो. डेनिम कशी वापरावी आणि कशी धुवावी याविषयी काही टिप्स..
( ‘स्पायकर जीन्स’चे हेड स्टायलिस्ट अमित सिंग यांनी दिलेल्या माहितीवर आधारित.)

Story img Loader