बहुतेक सगळ्या तरुणाईच्या वॉर्डरोबमध्ये ‘डेनिम्स’ हा प्रकार दिसतोच. जीन्स हा सगळ्यात कम्फर्टेबल असणारा प्रकार, याबाबत जागतिक पातळीवर तरुणाईचं एकमत आहे, असं म्हणता येईल. डेनिमच्या एकाच जीन्सवर अनेक वेगवेगळे टॉप्स, कुर्ते, शर्ट, टी-शर्ट्स पेअर करता येतात. डेनिम्सचा वापर केवळ जीन्सपुरता राहिलेला नाही. डेनिमचं एकच जॅकेट अनेक कुर्त्यांवर घालता येतं. पण तरीही डेनिम्स हे कापड खूप साधं, कॅज्युअल वाटतं आणि फॉर्मल वेअर किंवा फेस्टिव्ह वेअरमध्ये याचा समावेश होत नाही. काही समारंभ असे असतात, जिथे अगदी नटूनथटूनही जाता येत नाही, अगदी फॉर्मल कपडेही फारच झाल्यासारखे वाटतील, असेही काही प्रसंग असतात. अशा वेळी आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ‘कपडे काय घालू?’ ऑफिसच्या मित्रांसोबतची धमाल डिनर पार्टी असो किंवा मैत्रिणीने प्लॅन केलेली रोमँटिक डेट असो. अशा वेळी पूर्ण फॉर्मल ड्रेसिंगने वातावरण अगदी कडक इस्त्रीसारखं होतं. आपोआपच फॉरमॅलिटी येत जाते. डेटसाठी तर फॉर्मल वेअर अजिबातच सुटेबल नाही. अशा ठिकाणी टी-शर्ट, टोन्र्ड जीन्ससारखं अगदी कॅज्युअल ड्रेसिंगही बरं दिसत नाही. ‘याला ड्रेसिंग सेन्स नाही’ किंवा ‘वेल ड्रेस्ड राहायची आवड दिसत नाही’ असं आपल्याबद्दलचं मत तयार होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रसंगी ड्रेसिंग कसं असावं, हा अनेकांपुढचा यक्षप्रश्न असतो.
डेनिम्सचा सेमी कॅज्युअल फंडा
डेनिमच्या एकाच जीन्सवर अनेक वेगवेगळे टॉप्स, कुर्ते, शर्ट, टी-शर्ट्स पेअर करता येतात.
Written by प्रतीक्षा चौकेकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-09-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denim jeans fashion trends