आपल्याकडे साधारणत: नव्वदच्या दशकापासून बाहेर खाण्याची प्रथा खूपच प्रचलित झाली. फॉरेन डिशेस इतक्या मुबलकपणे मिळू लागल्या की, झटपट शिजणाऱ्या नूडल्सनंतर, पास्ता आणि पिझ्झासुद्धा अगदी पराठय़ाच्या पंगतीत जाऊन बसले. आज शहरात कोणी पिझ्झा किंवा बर्गर न खाल्लेला माणूस विरळाच. या परदेशी पदार्थाबरोबर त्या खाण्याच्या प्रथापण आपल्याकडे आल्या. काटा, चमचा आणि सुरी यांचा वापर आता फक्त उच्चभ्रू हॉटेल्समध्ये न होता, साधारण ‘रेस्तराँ’मध्येही व्हायला लागला आहे. कोणत्याही कटलरीचा जेवताना वापर न करणाऱ्या अनेक भारतीयांनी त्याचा सराव अगदी सहजपणे केला. बाहेरचं जेवण हे आज ‘फॉरमल’ आणि ‘इन्फॉर्मल’ ऑकेजन्सना अगदी कॉमन झालं आहे. कोणत्या पद्धतीचे जेवण जेवताना कोणता शिष्टाचार पाळावा लागतो याची जाणीव व्हायला लागली आहे. बिझनेसच्या दृष्टीने तर याला भरपूर महत्त्व आले आहे.
बिझनेसच्या दुनियेत असं म्हणतात की, सर्वात जास्त ‘डील्स’ ही टेबलाच्या आमने-सामने न होता गोल्फ कोर्सवर किंवा ‘रेस्तराँ’ मध्ये होतात. त्यामुळे आता ‘बिझनेस एन्टरटेिनग’ला ‘सिर्फ खिलाव – पिलाव’च्या पलीकडे जाऊन महत्त्व द्यायला लागल्या आहेत. त्यातून पाश्चिमात्य किंवा पूर्वेकडचे ‘क्लाएन्ट’ असतील तर वेगवेगळे शिष्टाचार पाळावे लागतात. अधिक काळजी घ्यावी लागते. अशा वेळी डायिनग एटिकेट आणि बिझनेस एन्टरटेिनगचे ज्ञान असल्यास धीर येतो. तर हे वेगवेगळ्या देशांचे शिष्टाचार कोणते? मुळात जेवतानाचे शिष्टाचार म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहेत. तुम्ही कुठे आहात आणि काय खाताय तसेच तुमच्याबरोबर कोण आहे. यानुसार या शिष्टाचारांत बदल होतो. हे सगळे शिष्टाचार आपण या स्तंभामधून जाणून घेणार आहोत. सुरुवात भारतीय जेवणापासून करू या.

भारतीय जेवणाचे शिष्टाचार
* जेवायच्या आधी हात धुवून जेवायला बसणे
* सर्वाची पाने पूर्ण वाढून झाल्याशिवाय जेवायला सुरवात करू नये.
* पोळी, चपाती, नान इत्यादी एकाच (म्हणजे बहुधा उजव्याच) हाताने तोडावे.
* जमिनीवर बठक असल्यास व्यवस्थित मांडी घालून बसावे. काही ठिकाणी महिलांनी पालथी मांडी घातलेली चालते.
* जेवताना तोंडाने आवाज करू नये – म्हणजेच तोंड बंद करून जेवावे.
* डाळ-भात हाताने खाताना फक्त बोटांनाची टोक वापरावी; त्याखाली बोटं खरकटी होऊ नयेत.
* पाण्याचं भांडं आणि वाढायचे चमचे खरकट्या हाताने उचलू नये.
* अन्नाशी खेळणं इज अ डेफिनेट नो-नो
* ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं आपण भारतीय मानत असल्याने, पानात/ताटात काही वाया घालवू नये
* यजमानांनी पाहुण्यांना आग्रह करणं योग्य मानलं जातं, पण इतकाही आग्रह करू नये की, पाहुणे जिकिरीस येतील.
* जेवणानंतर तृप्तीची मोठी ढेकर देणं आजकालच्या शिष्टाचारात बसत नाही – बिझनेस एन्टरटेिनगमध्ये तर नाहीच नाही!

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader