आपल्याकडे प्रवासात, निवांतेत किंवा पार्टी-समारंभ आणि सार्वजनिक हैदोस निमित्ताला कारणीभूत उत्सवांमध्ये ऐकले जाणारे प्रत्येक गाणेच उत्साहवर्धनाचे काम पार पाडत असते. त्यामुळे उत्साहवर्धक गाणी खरेच असतात, याबाबत आपण कधी विचार केला आहे का? खूपशा कोलाहलातूनही कुठल्याशा कोपऱ्यात वाजणाऱ्या संगीताच्या तुकडय़ाने लक्ष वेधून घेण्याची आणि तो क्षण सुंदर बनविण्याची किमया साधली, तर ती त्या त्या व्यक्तीसाठी उत्साह निर्माण करणारी गाणी असतात. टीव्हीवरच्या सिने-मालिकांपासून ते जाहिरातींमधल्या आणि मोबाइलमधल्या कानवेधी स्वरलहरींनी आपण दिवसातल्या सर्व प्रहरांत संगीताचे फास्टफूड चघळत असतो. रागदारी संगीत प्रत्येक प्रहरानुरूप आस्वाद आणि आनंद देत असते. रेडिओवर भल्या पहाटे भक्तीसंगीत सुंदर वाटते. त्यानंतर तेथे दिवसभर चालणारा सिनेगीतांचा सुळसुळाट प्रत्येकाच्या कानवकुबानुसार बरा-वाईट ठरतो. कुणाला लता-किशोर-रफी-मुकेश यांच्या स्वर साम्राज्यातून बाहेर यायचे नसते. तर कुणाला पंचमदा ते बप्पी लाहिरीच्या फ्युजन मिक्समध्ये रमायला आवडते. नव्वदोत्तरी काळातील सिनेगानयुग हे ‘नव्र्हस नाइंटीज’ म्हणून ओळखले जाईल. आठ-दहा लग्नपट आणि तेवढय़ाच प्रेमपटांच्या गाण्यांव्यतिरिक्त सुमारांची सद्दीच या काळात संगीत क्षेत्रात होती. या काळातच एका श्रोत्या पिढीने भारतीयसोबत पाश्चात्त्य गाणी ऐकण्याकडे अधिक भर दिला. पुढे माध्यमे, आंतरराष्ट्रीय संगीताची उपलब्धता इतकी वाढली की, त्या गाण्यांचा भारतीय चाहता वर्ग इथल्या संगीतापासून पूर्णपणे विलग व्हायला सुरुवात झाली. तुमच्या आवडीच्या भारतीय संगीतकार, गायक-गायिका यांची आवडती दहा गाणी घ्यायची झाली, तर तुम्ही दोन मिनिटांच्या आत जी निवडाल ती तुमच्या उत्साहात भर घालणारी गाणी असतील. (प्रयोग करा, दोन मिनिटांत किती गाणी विसरलो आहोत, याचीच उजळणी होईल.)
‘पॉप्यु’लिस्ट : उत्साहवर्धक गाणी..
टीव्हीवरच्या सिने-मालिकांपासून ते जाहिरातींमधल्या आणि मोबाइलमधल्या कानवेधी स्वरलहरींनी आपण दिवसातल्या सर्व प्रहरांत संगीताचे फास्टफूड चघळत असतो.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-04-2018 at 01:47 IST
Web Title: Exciting songs exciting songs list pop songs