पंकज भोसले- viva@expressindia.com
नव्वदोत्तरीतील अखेरचे दशक जगभरासाठी संगीत संक्रमणाचे होते. मोबाइलवर गाणी ऐकण्यासारखी आजच्यासारखी चैन तेव्हा नव्हती. भारतात रेकॉर्ड प्लेअर किंवा वॉकमनवर कॅसेट ऐकणारी संगीतवेडय़ांची अख्खी पिढी या काळात चांगल्या स्वररचनांसाठी हपापलेली होती. घराच्या रचनेमध्येच हजार वॉट्सचे बास स्पीकर्स बसवून आणि डबल कॅसेट प्लेअर आणून आपल्या वकुबानुसारचे संगीत अख्ख्या सोसायटी किंवा इमारतीला ऐकवणारी तरुण-तरुणींची फौज आपल्या देशभरात वाढत होती. गाणी काही सेकंदात डाऊनलोड करून आपल्या ताब्यात घेण्याची आजच्यासारखी उपलब्धी नसल्याने त्यांचे मोल आजच्या तुलनेत कैक पटींनी होते. कॅसेट मिळविण्यासाठी, रिकाम्या कॅसेटमध्ये गाणी भरून घेण्यासाठी बऱ्याच उफराटय़ा गोष्टी कराव्या लागत. या काळात आपल्याकडे आलेल्या संगीत वाहिन्यांनी आणि एफएम रेडियोनी संगीतवेड जोपासण्यासाठी बऱ्यापैकी स्वरइंधन पुरवले.
तेव्हा आपल्यासारखाच समधर्मी सूरश्रावक सापडे त्याचा आनंद अवर्णनीय असे. अन् तो कधी व्हीजे आणि आरजे सांगत असलेल्या माहितीतून किंवा एखाद्या इंग्रजी सिनेमातील व्यक्तिरेखांतूनही सापडे. रेहमानी संगीताच्या सुखद धक्क्य़ांमध्ये असतानाच स्टार मुव्हीजसह इतर जागतिक सिनेमे ओतणाऱ्या वाहिन्यांवर लागणाऱ्या सिनेमांमध्ये संगीतभक्तांना आंतरराष्ट्रीय स्वरांची वाट खुणावू लागली होती. दोन हजार सालादरम्यान आपल्याकडे ‘हाय फिडिलिटी’ नामक चित्रपट स्टार मुव्हीजवर सातत्याने दाखविला जाई. निक हॉर्नबी यांच्या ब्रिटिश कादंबरीला अमेरिकी भूमीत घडवताना चित्रकत्र्र्यानी त्यातील संगीतवेडय़ा पात्रांना तसूभरही बदलले नाही. एका रेकॉर्ड स्टोअरच्या तरुण मालकाची ही कथा म्हणजे आकर्षक संगीतनाटय़ आहे. प्रत्येक गोष्टीची ‘टॉप फाइव्ह’ यादी तयार करणाऱ्या यातील रॉब या व्यक्तिरेखेची गाण्यांची यादी गमतीशीर विषयांची आहे. उदाहरणार्थ, म्हणजे साईड ‘ए’वरच्या पहिल्या गाण्यांपैकी सर्वोत्तम पाच, आपल्या मयताला कोणत्या पाच गाण्यांना वाजविले जावे आणि स्त्रीद्वेषात्मक गाणी अनंत असल्यामुळे ती यादी सुरूच झालेली नाही. या रेकॉर्ड स्टोअरमध्ये काम करणाऱ्या बॅरी आणि डिक नावाच्या सांगीतिक जुळ्यांचे ज्ञानही थोर आहे. जे विशिष्ट गाण्याची मागणी करणाऱ्यांना ‘तुमची गाणी किती वाईट आहेत, त्यापेक्षा हे ऐका’ असा हेका लावतात. या संपूर्ण सिनेमात उत्तम गाण्यांचे एकत्रीकरण आहे. जुन्यांतील उत्तम आणि कालबाह्य़ न होऊ शकणाऱ्या गाण्यांवर चर्चा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पट्टीच्या संगीतदर्दीची सहज करून दिलेली ओळख आहे. यातील सर्वच गाणी पुन्हा पुन्हा ऐकत राहावीत अशी आहेत. बिटल्सच्याच दशकात अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या ‘लव्ह’ या बॅण्डचे ‘ऑलवेज सी युवर फेस’ हे गाणे यातील नायकाच्या प्रेमाबाबतच्या गोंधळस्थितीला साजेसे आहे. या चित्रपटामुळे ते पुन्हा चार दशकांनी लोकप्रिय झाले. गेल्यावर्षी लेडीबर्ड नावाच्या ऑस्कपर्यंत पोहोचलेल्या चित्रपटातही ते उत्तमरीत्या वापरण्यात आले. साठीच्या दशकातील हरवलेल्या अनेक कलाकारांची अप्रतिम गाणी या सिनेमामध्ये आणण्यात आली. त्यात थर्टिन फ्लोअर एलेव्हेटर या बॅण्डचे ‘यूआर गॉन मिस मी’ हे गाणे म्हणजे हैदोस आहे. अमेरिकी बॅण्ड्सोबत स्कॉटिश स्थानिक कलाकारांची गाणीही या सिनेमात एकत्रित करण्यात आली आहेत. त्यात बेटा बॅण्डचे ‘ड्राय द रेन’ हे गाणे ऐकायला मिळू शकते. बिटल्सच्या शैलीशी जुळणारे हे गाणे आहे. हा चित्रपट आणि कादंबरी आज कल्ट क्लासिक आहे. निक हॉर्नबी या कादंबरीकाराची लेखन कारकीर्द या सिनेमाने बहरली आणि त्याच्या पुढल्या बेस्टसेलर्स कादंबऱ्यांना मोठा चाहतावर्ग मिळण्याचा आरंभबिंदू अजूनही हा हाय फिडिलिटीच असतो. जपानी लेखक हारुकी मुराकामीच्या कादंबऱ्या आणि कथांमध्ये डोकावणारे रेकॉर्ड स्टोअर आणि व्यक्तिरेखांचे रेकॉर्डप्रेम अनुभवायचे असेल, तर ही एक कलाकृती कादंबरी, तिचे माध्यमांतर आणि स्वतंत्र गाणी असा आस्वाद घ्यायला हवा. अमांडा पेत्रुसिच या न्यूयॉर्करमध्ये लोकप्रिय संगीताची समीक्षा करणाऱ्या लेखिकेने ‘डू नॉट सेल अॅट एनी प्राइस’ हे रेकॉर्डवेडय़ांची गाथा मांडणारे एक उत्तम पुस्तक लिहिले आहे. या लेखिकेने जगभर रेकॉर्ड्स जमविणाऱ्या लोकांची पाहणी केली. तिला जॅझ संगीताच्या शतकभरात तयार झालेल्या सर्वाधिक रेकॉर्ड्स जपानमधील संगीत वेडय़ांमुळे शाबूत असल्याचा शोध लागला आहे. हारुकी मुराकामीच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये जॅझ संगीत सहज का डोकावते, याचा हा शोध दाखलाच देतो. आपल्याकडे मराठीत कथा-कादंबऱ्यांमधून लोकप्रिय संगीताला कायम बाद करण्याचा लेखकांनी विडा उचलला. म्हणजे साहित्यात डोकावणाऱ्या बहुतांश व्यक्तिरेखा ‘मारवा’, ‘चंद्रकौंस’ नी रागदारीच्या पाकात मुरलेल्या दाखविल्या गेल्या. या सगळ्याचा एकुणातच परिणाम म्हणजे हाय फिडिलिटीची धाटणी असलेली कादंबरी आपल्याकडे तयार होऊ शकली नाही. देशात घडणाऱ्या चांगल्या कादंबऱ्या जसे चांगल्या सिनेमा घडवू शकतात, तसेच जनमानसात झिरपलेले संगीतही टिकवून ठेवू शकतात. दुर्दैवाने आपल्याकडे या सर्वाबाबत अनास्था आणि अज्ञानाची मात्रा अधिक आहे.
13th Floor Elevators – You’re Gonna Miss Me
Love – Always See Your Face
The Beta Band – Dry The Rain
Sheila Nicholls – Fallen for You
The Chemical Brothers – Leave Home
Bob Dylan – Most of the Time
Jack Black – Let’s get it on