हाय अमित,
मी दीप्ती. मी ३० वर्षांची आहे. माझं वजन ४८ किलो आहे. मी गहुवर्णी.. डस्की आहे. माझी फिगर प्रॉपर आहे. मला काही चांगले सजेशन द्या.
हाय दीप्ती,
तू मला उंचीसुद्धा सांगायला हवी होतीस. पण तुझी उंची अॅव्हरेज म्हणजे साधारण ५.३ फूटच्या आसपास असेल असं मी गृहीत धरतो. तू जास्त मिड टोन कलर्स वापर. तुला ते खूप छान दिसतील. बन्र्ट ऑरेंज, रॉयल ब्लू, डिप रेड, पर्पल, फॉरेस्ट ग्रीन हे असे रंग वापर. बेसिक कलर्स म्हणजे ग्रे, बेज, काळा, पांढरा हे रंग तू नक्कीच वापरू शकतेस. बेसिक रूल असा आहे, जर अप्पर बॉडी हेवी असेल तर डार्क कलर्स टॉपसाठी वापर आणि लाइट कलर्स बॉटमसाठी वापर. याच्या उलट लोअर हाफ हेवी असेल तर टॉप हलक्या रंगाचे वापरायचे आणि डार्क कलर्सच्या बॉटम्स वापरायच्या.
वेस्टर्न वेअरमध्ये जीन्स, चीनोज, वेगवेगळे टॉप्स, टय़ुनिक्स, वनपीस ड्रेसेस मस्त दिसतील. लक्षात ठेव, ड्रेसची लेन्थ एक इंच गुडघ्याच्या वर असायला हवी. श्रग्स वापर, त्याने छान लेयिरग मिळेल. इंडियन वेयरमध्ये चुणीदार, लिनन किंवा कॉटनचे कुर्तीस आणि दुपट्टा मस्त दिसेल. लखनवी किंवा चिकन हेसुद्धा छान पर्याय आहेत. छान बॅग, घडय़ाळ, फूटवेअर्स यावर इनव्हेस्ट कर. त्याने एक मस्त उठावदार लुक मिळतो.
जास्त ब्राइट कलर्स किंवा अति फंकी कपडे.. म्हणजे की शॉर्ट्स, टॉर्न्ड जीन्स वापरणं टाळ. जास्त मेक-अप नको. त्यामुळे मोठय़ा वयातील व्यक्ती लहान दिसण्याच्या प्रयत्नात आहे असं वाटू शकेल. तुझी स्किन, केस, नखं यांची छान काळजी घायला लाग. इतरांना तू काय घालायला हवं आहेस यापेक्षा तुला काय हवंय तेच कपडे तू वापर. तुझ्या कपडय़ांमधून तू कोण आहेस, तुझी पर्सनॅलिटी कळायला हवी.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
अमित दिवेकर