सध्या संगीत जगतातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचे वारे वाहू लागल्यामुळे जगभरातील संगीत डाऊनलोड प्रवाह हा त्याच्या नामांकनांतील गाणी ऐकण्यावर केंद्रित झाला आहे. म्हणजे या कालावधीत सातत्याने ऐकली जाणारी गाणी किंवा आपल्या आवडीची किती ताजी गाणी ग्रॅमीमध्ये नामांकन मिळवून आहेत, याचा भूषणावह तपशील प्रत्येक म्युझिक लिस्टधारी बाळगून असतो. आपल्याकडे एखाद्या महान भारतीय गायिकेने तिला आलेल्या तापातही गाणे कसे उत्तम गाऊन ते अजरामर केले, तशा आशयाचे मासलेही या महिन्यात स्टाइल आणि मनोरंजन मासिकांनी पुरविलेले असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुळात पॉप संगीत जगतातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या त्यांची लफडी-कुलंगडी आणि ब्रेकअप्स गप्पा असतात. त्यांच्या गाण्यातील वैशिष्टय़ांबाबत केवळ एक-दोन विशेषणांनी माहिती पुरवली तरी ती चाहत्यावर्गाला पुरेशी असते. तर ब्रुनो मार्स या गायकाच्या ‘ट्वेंटीफोर कॅरेट मॅजिक इन दी एअर’ हे गाणे यंदा ग्रॅमीला नामांकन मिळविलेले आहे. तसा या हवाई येथे जन्मलेल्या कलाकाराच्या माथी ग्रॅमीपासून ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत अनेक पुरस्कारांवरील नामांकनाचे नशीब कोरले गेले आहे. यंदा सवरेत्कृष्ट गाण्यापासून ‘अल्बम ऑफ द इयर’पर्यंत मानाच्या सहा पुरस्कारांसाठी तो दावेदार म्हणून ‘ट्वेंटीफोर कॅरेट मॅजिक इन दी एअर’ हे गाणे घेऊन आला आहे. दोन वर्षांपूर्वी ‘अपटाऊन फंक’ या विचित्रशा गाण्यासह त्याने ग्रॅमीवर आपले नाव गोंदवले होते. ‘ट्वेंटीफोर कॅरेट मॅजिक’ हे गाणे ऐकायला गेलात, तर आपण ऐंशी-नव्वदीतील गाणी ऐकत असल्याचा भास होईल. म्हणजे गाण्याची ऱ्हिदम पूर्णपणे वीस वर्षांपूर्वीची असून तुलना करायची झाली तर आत्ता आपण मुंबई-पुण्यात रिक्षा आणि टॅक्सी पकडताना एखादा भोजपुरी संगीतवेडय़ा चालकाच्या ताब्यात गेलो आणि तिथली आवाजाला विचित्र पद्धतीत ताणण्याची पद्धत ऐकली, तर जी जाणीव तयार होते ती ब्रुनो मार्सचे यंदाचे लोकप्रिय गाणे ऐकताना वाटू लागते. यात भोजपुरी संगीताची किंवा ब्रुनो मार्सच्या संगीताची खिल्ली नाही, तर त्यातील साम्य तुम्हाला सहज ऐकताना पडताळता येऊ शकते. याचा अर्थ ब्रुनो मार्स ऐकणे हे कमी दर्जाचे जराही नाही. उत्साहाचा नायगरा धबधबा त्याच्या गाण्यांमधून सळसळताना दिसतो.
कॅरेबियन सागरामधील पोटरे रिको त्याच्या वैशिष्टय़पूर्ण ऱ्हिदमिक संगीतासाठी प्रसिद्ध आहे. यंदा ‘डेस्पासिटो’ नावाचे लुईस फॉन्सी आणि डॅडी यान्की यांचे गाणेही ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’साठी ग्रॅमीचे नामांकन मिळवणारे आहे. यापूर्वी या गाण्याच्या ऱ्हिदमची अनेक गाणी ऐकली असतील. पण यंदा शकीराच्या ‘अल्डोराडो’ या अल्बममध्ये ‘ला बिसिक्लेटा’ हे गाणे ‘डेस्पासिटो’सोबत ऐकताना त्यातील समान ठेक्याचा अभ्यास करता येऊ शकेल. ‘डेस्पासिटो’ या गाण्यात तरुणाईचा ताईत जस्टिन बिबर असल्याने गाण्याचे पुरस्कारमूल्य आणि नामांकनमूल्य अधिक आहे. शकीराचे ‘ला बिसिक्लेटा’ हे गाणे तिच्या रबरनृत्य शैलीसाठी उत्तमच आहे. गेल्या आठवडय़ाच्या यादीतील सेलेना गोमेझ आणि कायगो यांचे ‘इट एण्ट मी’ हे गाणे ऐकले असेल, तर त्याची शेकडो कव्हर्स सुंदररीत्या यूटय़ूबवर व्हिडीओ आणि एमपीथ्री फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातले सर्वोत्तम गाणे लिंडसे स्टर्लिग हिच्या व्हायोलिनमधून साकारले आहे. या ब्रिटिश कलाकाराची स्वतंत्र गाणीही आहेत. व्हायोलिन घेऊन नाचताना दिसणारे तिचे प्रत्येक व्हिडीओ यूटय़ूबवर व्हायरल आहेत.
आफ्रिकेतील राष्ट्रामध्ये सांगीतिक फेरफटका करणारे ‘वी फाइंड लव्ह’ या गाण्यालाही ऐकायला हवेच. लिंडसे ग्रॅमीमध्ये नसली, तरी भविष्यात हा पुरस्कार गाजवणार याची खात्री देणारे तिचे ताजे संगीत अनुभवायलाच हवे असे आहे. व्हायोलिनवर संगीतातील जॅझ, हिपहॉप, रॉक आदी सारे प्रवाह वाजविण्यात कोणतीही कंजुषी न करणारे तिचे संगीत कर्णसुखद आहे. ब्रुनो मार्सच्या दणदणत्या गजबजाटात केशा या गायिकेचे संथोत्तम वाटणारे ‘प्रेइंग’ हे गाणेदेखील ग्रॅमीचे तगडे दावेदार म्हणून ओळखले जाते. दोन दशके पॉपपटलावर असलेल्या पिंक हिचे ‘व्हॉट अबाऊट अस’ हे यंदाच्या यादीत असायलाच हवे. धांगडधिंगा आणि संथ यांच्या दरम्यान वाजणारे हे गाणे, एमटीव्ही-व्ही चॅनलच्या आरंभीच्या भक्तांना सहज आवडण्यासारखे आहे. अर्थातच ग्रॅमीमध्ये ते कोणत्या स्थानी असेल, हे सांगता येणार नाही.
- Bruno Mars – 24K Magic
- P!nk – What About Us
- Carlos Vives, Shakira – La Bicicleta
- Luis Fonsi, Daddy Yankee – Despacito (Remix Audio) ft. Justin Bieber …
- It Ain’t Me – Lindsey Stirling and KHS Selena Gomez & Kygo Cover
- Lindsey Stirling – Roundtable Rival
- kesha – praying
viva@expressindia.com