‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
तंतुवाद्यांमधील सर्वात सोपे वाद्य असले, तरी गिटार या वाद्यावर हुकमत येण्यासाठी बोटांची वर्षांनुवर्षांची तयारी आणि अखंड मेहनत आवश्यक असते. तेव्हा कुठे तिच्या सुरांना धार येते. भारतीय चित्रपटवेडय़ांना गिटार या वाद्याबाबत फारच अज्ञान मिळाले असले, तरी या वाद्याची बाजारपेठ १९९६ सालात आलेल्या पॉपक्रांतीने बहरली. हिंदी म्युझिक अल्बम्सच्या लोकप्रिय लाटेत गिटार वाद्य शिकणाऱ्यांची संख्या वाढली. विद्यापीठामध्ये ‘वेस्टर्न क्लासिकल’ अभ्यास विषय म्हणून सुरू झाला आणि ‘एमटीव्ही’च्या दारावाटे पाश्चात्त्य बॅण्ड्सच्या गिटारमौजा पाहून काश्मीर ते कन्याकुमारी या वाद्याची सारखीच मागणी झाली. चित्रपटातील गिटारखेळाने प्रभावित झाली नसेल, इतकी गिटार शिकणारी पिढी या काळात गिटारच्या फ्रेट्सवर आरूढ झाली. यूटय़ूबवर सर्वाधिक व्हिडीओ बहुधा या वाद्याचे आहेत. नुसती हिंदी गाणी टॅब आणि कॉर्डवर शिकविणाऱ्या लाखोंच्या संख्येतील क्लिप्स आढळतील. गांभीर्याने एखाद्या गाण्यावर प्रयोग केलेले आणि भलत्याच चालीत मांडून नव्या अंदाजात सादर करणारे हौशे-नवशेही इथे पुष्कळ आहेत. गिटार टय़ुनिंग करण्यापासून ते त्याच्या मूलभूत टप्प्यांना पार करणाऱ्या सगळ्या कुशल कळा यूटय़ूबवर आहेत. गिटार वाजविणाऱ्या खऱ्या हिरोंचीही संख्या इथे प्रचंड मोठी आहे. त्यातला पहिला आहे दक्षिण कोरियाचा सुंगा यंग (सुंगा जुंग) हा अवघ्या विशीतला मुलगा. सुंगा यंग हा गिटार वाजवत नाही, तर तो स्वत:च गिटार बनला आहे, इतकी त्याची या वाद्यावर पकड बसली आहे. यूटय़ूबवर गेल्या दहा-बारा वर्षांत त्याचा प्रत्येक व्हिडीओ हा काही लाखांच्याहून अधिक हीट्स मिळविणारा आहे. या मुलाने आपल्या वडिलांकडून फिंगर स्टाइल गिटारतंत्र शिकून घेतले आणि त्यावर घरातच प्रयोग करून स्वत:ची गिटारशैली विकसित केली. आज जगभरातील प्रसिद्ध गिटारवादक आणि संगीतकार या मुलाने गिटारवर मिळवलेली अलौकिक सिद्धी पाहून चाट पडले आहेत. मूळ गाणे सुंदर की त्या गाण्यावर सुंगा यंग याने वाजविलेली गिटार याबाबत ऐकणाऱ्याला प्रश्न पडावा इतकी सुंदर गिटार तो वाजवितो. बरे त्याला कोणत्याही शैलीचे वावडे नाही. तो क्लासिकल, ब्लूज, कण्ट्री आणि लॅटिन अमेरिकी शैलीत तंतोतंत गिटार वाजवू शकतो आणि या सगळ्याचे एकत्रीकरण करून कानांना सुखावणारे नवे काहीतरी निर्माण करू शकतो. टेलर स्विफ्टपासून आजच्या घडीतील सर्व लोकप्रिय कलाकारांच्या रचना सुंगा यंग कशा वाजवितो, हे शिकविणारे व्हिडीओही पाश्चात्त्य जगात लोकप्रिय झाले आहे. मुळात पाश्चात्त्य वाद्यावर पौर्वात्य देशात असामान्य पांडित्य मिळविणारा सुंगा यंग या पिढीतील गिटारवादकांसाठी एक अशक्य कोटीतला आदर्श बनला आहे. पाश्चात्त्य दिग्गज कलाकारांसोबत गिटार वाजविताना त्यांच्या गर्वाचे हरण करून वर नवे वादनधडे देणाऱ्या या गिटारकर्त्यांला वाजवताना पाहणे म्हणजे तारांची जादुगरी अनुभवणे आहे.
‘डेव्ह मॅथ्यूज बॅण्ड’ नावाचा एक अमेरिकी बॅण्ड आहे. या बॅण्डचे म्हणजेच मुख्य कलाकार डेव्ह मॅथ्यूज याचे वैशिष्टय़ म्हणजे ते आपलीच गाणी दरवेळी लाइव्ह शोमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाजवितात. म्हणजे चालच वेगळी, वाद्यांची रचना वेगळी किंवा आणखी काही वेगळे सादर करून श्रोत्यांना चकित करून सोडतात. टीम रेनॉल्ड या गिटारवादकाला घेऊन त्याने केलेली लाइव्ह शोजची मालिका म्हणजे श्रवण आणि दर्शनाचा अनोखा सोहळा अनुभवणे आहे. गिटारची ही शैली आणि वाद्याचा असा वापर खचितच कुठे पाहायला मिळू शकेल. ‘लाय इन अवर ग्रेव्ह’ या एकटय़ा गाण्याच्या कित्येक व्हर्शन ऑनलाइन पाहायला मिळतील. दरवेळी टीम रेनॉल्ड्सने गिटारवर रचलेली वादनसमाधी माणूस ठरवलं तर काय करू शकतो, हे दाखवून देणारी आहे. मशीनदेखील इतकी अचूकता दाखवू शकणार नाही, इतकी ही वादनाची मैफल नादवून सोडणारी आहे. गिटारच्या सहा तारांवर सूरसाम्राज्य उभे करणाऱ्या या गिटारवादनाच्या प्रकाराला अनुभवल्यानंतर फक्त काही दिवस थक्क होण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. भारतात पॉप चळवळ येण्यापूर्वी ‘इंडस क्रीड’ या बॅण्डने धुमाकूळ घातला होता. त्यांचे ‘प्रिटी चाइल्ड’ हे गाणे ‘एमटीव्ही’च्या भारतीय सुरुवातीच्या काळात पुन्हा एकदा लोकांच्या मनात बसले. काळापुढे असलेल्या या बॅण्डचे गिटार महेश तिनईकर यांची गिटार ऐकणेही सोहळा आहे. यूटय़ूबवर त्यांचे वादन फार ऐकायला मिळेलच असे नाही, पण जे आहे त्यावरूनही आपल्याकडच्या गंभीर वादनाची जातकुळी लक्षात यावी. संतानापासून ते गाजलेल्या-गाजत असणाऱ्या बॅण्डसमध्ये गिटारहिरो भरपूर सापडतील. यूटय़ूबच्या समुद्रात स्ट्रीट गिटारिस्टची मालिकाच पाहायला मिळेल. नवनवे तंत्र आत्मसात करून गिटारच्या सुरांना हव्या तशा पद्धतीने फिरविणाऱ्या कलाकारांना पाहिले की गिटार वाजवण्याची कला ही जराशी कुठे कळू लागते.
https://www.youtube.com/watch?v=5M5fDlJd9Ys
https://www.youtube.com/watch?v=p9D9TP6oDzY
https://www.youtube.com/watch?v=ZO4cviYeCiw
https://www.youtube.com/watch?v=DN72_RXD9r4
https://www.youtube.com/watch?v=FBcDlzqWiHw
https://www.youtube.com/watch?v=V_mIxF6tgvU
viva@expressindia.com