भारतीय गानरसिकांपैकी निम्म्याहून अधिक हे ‘ओल्ड क्लासिक्स’ किंवा प्रेमभंगाच्या गाण्यांमध्ये रमलेले असतात. म्हणजे मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याचे दु:ख असलेल्या कातर वगैरे मनांना रिझविणारी गाणी तयार करण्यात बॉलीवूडची हयात गेली. कोणत्याही चित्रपटाचे कथानक नायक-नायिकांचे एकमेकांविषयीचे समज-गैरसमज-साक्षात्कार या तीन कसोटय़ांवर चालत. त्यामुळे दोन-चार हॅपी साँग्ज झाली की एक रडके गाणे आणि एकमेकांशिवाय राहण्याची जाहीर गीतसाधना करणाऱ्या नायकाला हॅपी एंडिगच्या वेळी ‘नाकाने कांदे सोलणारा’ ही पदवी कुणी बहाल करत नसे. प्राचीन काळात ‘ओ बेवफा’, ‘तू औरोकी क्यू हो गयी?’, ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा.’, ‘कोई हमदम न रहा’ या गाण्यांनी त्यांच्या लाडक्या श्रोत्यांना दु:खाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची सवय करून दिली. एकोणीसशे साठ-सत्तरीच्या दशकात ‘नोकरी-छोकरी’ अप्राप्य असलेल्या पिढीनेच ‘तुटा दिल’, ‘बिछडा यार’, ‘दिल-खिलौना’, ‘दर्द-ए-दिल’ या शब्दांशिवाय चित्रपटातील गाणे लिहिताच येऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण केली. नव्वदीच्या युगातही डिस्को गाण्यांतून प्रेमदु:ख उतू जात होते. नव्वदोत्तरीच्या काळातील परदेशात जाऊन भारतीय संस्कार बाळगणारे नायक ‘मैने उसके शहर को छोडा’ म्हणत ‘दिवान्या दिला’ची दास्तान लोकांना किंचाळून सांगत होते किंवा ‘तनहाई’ कशी निर्माण होते, याचा मानसिक अभ्यास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होते. ‘तेरे बीन’ हे दोन शब्द नव्वदीनंतरच्या ‘सॅडसाँग्ज’मध्ये सर्वाधिक वापरले गेले होते. सुफी, शास्त्रीय, चित्रपटीय आणि पॉप अशा सर्वच गानप्रकारांनी या काळात देशातील अगणित (एकल आणि दुतर्फी) प्रेमभंगांवर फुंकर मारण्याचे बहुमोल समाजकार्य केले. आपल्याकडे जशी भावनाप्रधान प्रेमभंगगीते लिहिली जातात, त्याच्या जगभरातील आवृत्त्या ऐकत राहाव्यात अशा आहेत. परीकथेसारख्या हळुवार प्रेमगीतांनी एकाएकी जगातील सर्वाधिक श्रीमंत पॉपस्टार बनलेली टेलर स्विफ्ट हिच्या आयुष्यातील प्रत्येक प्रेमभंग गाण्यातून सादर झाला आहे. या सेलिब्रेटीच्या प्रेमकहाण्या आणि ब्रेकअप्स न्यूजनी गॉसिप्स मॅगझिन्सना जितका मसाला पुरवला तितकाच तिच्या यशाला उभारणाऱ्या गाण्यांचाही रतीब ओतला.
‘पॉप्यु’लिस्ट : प्रेमविरोधी गीतोत्सव!
आयरिश बँड कोर्सची (तीन भगिनी आणि एक बंधू) सारी गाणी प्रेम आणि आयुष्यातील सुंदर घटनांबाबत असतात.
Written by पंकज भोसले
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-05-2018 at 01:01 IST
Web Title: Hollywood songs anti love song most anti love songs