गेल्या वर्षीपासून होम पार्टीचा ट्रेण्ड परत येतोय. न्यू इयर पार्टीचा बेत घरीच करण्याचा विचार यंदाही अनेक मंडळी करत आहेत. अशा होम पार्टीसाठी तुमची खोली कशी सजवावी, पार्टी मूड कसा क्रिएट करावा यासाठी टिप्स..
डिसेंबर म्हणजे मस्त.. कूल महिना. कॉलेज फेस्ट, ट्रिप, ख्रिसमस, न्यू इयर.. एकूण हॅपनिंग महिना.. पार्टी माहोल कायम असलेला! आज ख्रिसमस आणि त्याला जोडून आलेला वीकएण्ड. पार्टी, गेट टुगेदरचे प्लॅन आत्ताच झालेले असतील. पाठोपाठ न्यू इयर पार्टीचंसुद्धा प्लॅनिंग सुरू असेल. गेल्या वर्षीपासून होम पार्टीचा ट्रेण्ड आलाय. म्हणजे अशा न्यू इअर पार्टीसाठी बाहेरची जागा, हॉटेल किंवा हॉल बघण्याऐवजी स्वतच्या घरातच, टेरेसवर, सोसायटीच्या आवारात पार्टी करण्याकडे अनेकांचा कल आहे. यात दोन गोष्टी होतात. एक तर पार्टी आटोपशीर होते आणि बाहेरची गर्दी, गोंगाट टाळत आपल्याला हवं तसं क्लासी चॉइससह न्यू इअर पार्टी एन्जॉय करता येते. आता अशा पार्टीसाठी घर, तुमची खोली कशी सजवावी यासाठी काही टिप्स..
पार्टी मूड क्रिएट करण्यासाठी रंग हे महत्त्वाचं माध्यम ठरू शकतं. युथफुल आणि फ्रेश कलर्स सध्या इन आहेत. पण भिंतीचा रंग एखाद्या पार्टीसाठी बदलणं अजिबात शक्य नाही. मग प्रत्यक्षात भिंती किंवा फर्निचरचे रंग न बदलता खोली कलरफुल कशी बनवता येईल? त्यासाठी पडदे, सोफ्यावरच्या कुशन्स, टेबलक्लॉथ अशा छोटय़ा गोष्टींच्या रंगांकडे लक्ष द्या. आयत्यावेळी कुशन कव्हर्स बदलायला विसरतो. त्यामुळे आपल्या थीम प्रमाणे आणि सजावटी प्रमाणे कुशन कव्हर्स बदलायला विसरू नका. एखादा सुंदर गालीचा जमिनीवर घाला. अशा छोटय़ा गोष्टींनीदेखील रूमला किंवा घराला नवा लुक येतो.
खिडकीच्या चौकटीच्या बाजूच्या बारीक भिंतीच्या कडा असतात तिथे एखादं कलरफुल मोझ्ॉक डिझाइन नक्कीच भाव खाऊन जाईल. तुम्हाला जर छोटीशी बाल्कनी असेल तर तुमचं नेहमीचं स्टडी टेबल तुम्ही कॉफी टेबल कम सवर्ि्हग टेबल म्हणून कनव्हर्ट करू शकता. ड्रेसिंग टेबलच्या वरचा आरशाला प्लेन ठेण्यापेक्षा त्यावर सुंदर नाजूक डिझाइन करू शकता आणि त्यावर लाइट असेल तर रात्री खूपच छान प्रकाश पडेल. पार्टी म्हटलं की लाइट्स हे आलेच, नेहमीच्या लाइट्सच्या माळा लावण्यापेक्षा काचेच्या जुन्या बाटल्यांना रंग देऊन किंवा रंगीत काचेच्या बाटल्या जमवून त्यात लाइट लावू शकता. बाटल्यांवर छान डिझाइन करून त्याचे लॅम्प्स तुम्ही बनवू शकता. रात्रीच्या वेळी तुमच्या कॉफी कम स्टडी टेबलवर तुम्ही हे ठेवू शकता किंवा एखाद्या कोपऱ्यात ते लटकवू शकता.
भिंतीच्या एखाद्या कोपऱ्यात हातांचे ठसे, रंगांचे पट्टे, थोडी मोठी डिझाइन्स असं तुमच्या आवडीचं तुम्ही करू शकता. तुमच्या मित्रमंडळींचा अंदाज घेऊन पार्टीसाठी एखादी थीम ठरवू शकता. मग या थीमच्या आधारे घराची आणि खोलीची सजावट करता येईल. कलर थीम, बॅक टू स्कूल थीम, व्हिंटेज थीम अशा कोणत्याही प्रकारच्या थीमनुसार तुम्ही तुमची रूम सजवू शकता. थोडी कल्पकता वापरून न्यू इअर पार्टी संस्मरणीय करू शकता.

(वेलस्पून ग्लोबल ब्रॅण्डच्या व्यवस्थापकीय संचालक दीपाली गोएंका यांनी या लेखासाठी माहिती आणि टिप्स दिल्या.)
* सजावटीत पिवळा, जांभळा, हिरवा, लाल असे ब्राइट रंग वापरा.
* प्लेन कुशन्सवर फॅब्रिक कलर्सनी वारली पेंटिंग, फ्लोरल प्रिंट काढा.
* निमुळत्या तोंडाच्या रंगीत बॉटल्समध्ये फुलांची आकर्षक रचना करा.
* हँगिंग बॉटल्स हा सध्याचा लेटेस्ट डेकॉर ट्रेण्ड आहे. याशिवाय कुंडय़ांऐवजी, जुने टायर पेंट करून त्यात रोपटी लावून मित्रमंडळींना गिफ्ट करा
* ट्रिपदरम्यान गोळा केलेल्या रंगीबेरंगी दगड, शंख-शिंपल्यांची आकर्षक रचना करून त्यांचा शो-पीस करता येईल. असे शंख-शिंपले ड्रेसिंग टेबलच्या आरशावर कोपऱ्यात चिकटवता येतील.
* स्टडी टेबल, टीपॉय किंवा वर्क टेबलवर ओरिगामीचे बाउल्स, कागदी फुलांचे वाज ठेवता येतील.
* पेपर क्विलिंगच्या अनेक वस्तू (उदा. फुलांपासून नेमप्लेटपर्यंत काहीही) तयार करून गिफ्ट देता येतील.
* बॉटल कॅप्स दोऱ्यात ओवून पडदे तयार करता येतील.
* खराब झालेल्या सीडीवर छोटी कॅण्डल लावून, थोडं स्टोनवर्क करून फ्लोटिंग कॅण्डल करा.
* आपण काढलेला चांगला फोटो किंवा चित्र, ग्रुप फोटो फ्रेम करून लावता येईल.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
fire godown Pimpri-Chinchwad, Massive fire at godown,
पिंपरी-चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुरांचे लोट काही किलोमीटर..
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…

( संकलन साहाय्य: राधिका कुंटे)
viva.loksatta@gmail.com

Story img Loader