या वर्षांतला हा अखेरचा वीकएण्ड आणि मला थोडं वाईट वाटतंय की, द चॉकलेट क्रिटिकमधलं शेवटचा लेख मी लिहायला बसलोय. गेलं वर्षभर २४ चॉकलेट कोटेड गोष्टी तुम्ही माझ्याकडून ऐकल्यात. तुमच्याबरोबर जगभराची चॉकलेट सफर करताना मलाही खूप मजा आली. वेफर, नगेट अशा चॉकलेटच्या प्रकारांबद्दल बोलताना आपण देशभरातल्या चॉकलेट सीनबद्दल बोललो आणि अगदी रॉयल फॅमिलीमधलं चॉकलेटप्रेम ते कोको उत्पादन करणारे शेतकरी याविषयीही मी लिहिलं. आता या सदराचा शेवट आणखी एका ठेवणीतल्या गोड विषयानं करावा असं मला वाटतंय – ख्रिसमस नुकताच झालाय आणि नवीन वर्षांचे वेध लागले आहेत. इट्स पार्टी टाइम. हे गेटटुगेदरचे दिवस आहेत. होममेड चॉकलेट्स तर झालीच पाहिजेत.. होय ना?
गेल्या काही वर्षांत भारतात होममेड चॉकलेटची बाजारपेठ निर्माण झाली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे भारतीय माणूस जगभरात फिरू लागल्याचा हा परिणाम आहे. या फिरण्यातून आपल्याला वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात, वेगळे स्वाद आपल्याला सापडतात, आवडतात आणि त्यातून नवीन काही खाऊन बघण्याची आवड निर्माण होते. काही तरी वेगळं, काही तरी युनिक हवं असं वाटायला लागतं आणि याच वाटण्यातून होममेड चॉकलेटला मार्केट मिळतं. आता होममेड चॉकलेट्स करणारे केवळ छंद म्हणून याकडे बघत नाहीत. त्यातून उद्योग उभे राहिलेले आहेत. तुमचं क्रिएशन लोकांपर्यंत पोहोचवायला रिटेलिंगचा पर्याय आहे आणि बिझनेस माइंडेड लोक त्याचा उपयोग करून घेत आहेत. याशिवाय तुम्हाला स्वत:ला यातून क्रिएटिव्ह एनर्जी, समाधान, नातेवाईकांची वाहवा, कुटुंबीयांना ट्रीट असं सगळं काही मिळू शकतं.
होममेड चॉकलेट हे म्हटलं तर सोपं काम आहे आणि व्यवसायाच्या दृष्टीने वाटतं तितकं सोपंही नाही. कारण तुमच्या उत्पादनाची चव, दर्जा आणि युनिकनेस या गोष्टी इथे तपासल्या जातात शिवाय तुमची मार्केटिंग स्किल्सही पणाला लागतात. त्यामुळे नुसतं चांगल्या चवीचं आणि उत्तम दर्जाचं चॉकलेट बनवून चालत नाही, त्याचं पॅकेजिंगही सौंदर्यपूर्ण असावं लागतं. सोशल मीडियावर तुमची हालचाल लागते आणि मुख्य म्हणजे लोकांना एकदा चॉकलेट खिलवल्यानंतर त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं सातत्य हवं. स्वत:च्या आनंदासाठी होममेड चॉकलेटच्या व्यवसायात उतरणारे अनेक जण याचा उद्योग होण्यापूर्वीच माघार घेतात, कारण कन्सिस्टन्सीचा अभाव, नावीन्याचा अभाव किंवा विश्वासाचा अभाव.
होममेड चॉकलेट्समध्ये ट्रेण्ड फॉलो करायचा की ट्रेण्ड स्वत: निर्माण करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुमचं चॉकलेट चवीला आणि दिसायला उत्तम असावं आणि युनिक असावं या किमान गरजा आहेत. याशिवाय तुम्ही ऑर्डर कशी घेता, होम डिलिव्हरी देता का, नेटवर्क किती स्ट्राँग आहे वगैरे गोष्टींवरदेखील तुमचा व्यवसाय अवलंबून असतो. तुमच्या जिभेवरची साखर आणि डोक्यावरचा बर्फ हे कुठल्याही व्यवसायाच्या रेसिपीचे महत्त्वाचे साहित्य घटक आहेत, हे विसरून चालणार नाही.. असो..
आता होममेड चॉकलेट्सचा व्यवसाय करणाऱ्यांशिवाय हौस म्हणून घरी चॉकलेट बनवणाऱ्यांना मला काही ट्रिक्स सांगायच्या आहेत. प्रयोग करायला मागे-पुढे पाहू नका. तुमच्यासाठी इथे काही होममेड चॉकलेटच्या रेसिपी देत आहे. चॉकलेटी गप्पांचं हे सदर संपलं असलं तरी तुम्ही mail@varuninamdar.com यावर किंवा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरून माझ्याशी चॉकलेटी गप्पा मारू शकता. कुठलंही दर्जेदार चॉकलेट चाखताना या चॉकलेट क्रिटिकची आठवण नक्की ठेवाल अशी आशा आहे. गुडबाय आणि ऌंस्र्स्र्८ 2017! (समाप्त)
कॉफी ट्रफल
फिनिशिंगसाठी : ५० ग्रॅ. डार्क चॉकलेट (वितळवून घेणे) व अर्धा कप कोको पावडर (चाळून घेणे)
कृती : दूध गरम करा आणि डार्क चॉकलेटच्या तुकडय़ांवर ओता. त्यामध्ये कॉफी पावडर घालून ढवळून घ्या. १५ मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. बाहेर काढून साधारण २० ग्रॅमचा एक असे चॉकलेट बॉल वळून घ्या. हे चॉकलेट बॉल पुन्हा काही मिनिटांसाठी रेफ्रिजरेट करा. दुसऱ्या बाऊलमध्ये डार्क चॉकलेट वितळवून घ्या. एकेक चॉकलेट बॉल या मेल्टेड चॉकलेटमध्ये बुडवून कोको पावडरमध्ये घोळवून बाजूला ठेवा. कॉफी ट्रफल तयार!
चॉकलेट बार्क्स
कृती : अॅसिटेट शीट एका अॅल्युमिनियमच्या ट्रेला लावून घ्या. डार्क चॉकलेटचे तुकडे वितळवून हे चॉकलेट या ट्रेमध्ये ओता. त्यावर अक्रोड, पिस्ता, जर्दाळू, किसलेलं खोबरं भुरभुरा. वितळलेलं चॉकलेट घट्ट होण्यापूर्वी हे सगळं त्यामध्ये घालणं आवश्यक आहे. मिल्क चॉकलेटचे तुकडेही थोडे गरम करून वितळवून घ्या आणि त्यावर ओता. पूर्ण घट्ट व्हायच्या आधी सुरीने छोटे चौकोनी तुकडे पाडून घ्या. मऊ असताना तुकडे पाडले की तडा जात नाही. आता चॉकलेटचा ट्रे सेट होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. चॉकलेटचे तुकडे विचित्र आकारात वळू नयेत, म्हणून त्यावर थोडं वजन ठेवायला हरकत नाही. १० मिनिटांत सव्र्ह करण्यासाठी चॉकलेट सेट होईल.