या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

माणूस कर्तृत्वाने, कामगिरीने थोर होतो अशी विधानं बाजूला ठेवायला लावणारे काही ब्रॅण्ड्स असतात. म्हणजे अमुक एक ब्रॅण्ड आपण वापरत आहोत हीच एक जाहिरात असते. त्या ब्रॅण्डच्या नुसत्या असण्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एकदम चारचाँद लागून जातात. तुमची पत वाढते. अशा ब्रॅण्ड्सच्या मांदियाळीतलं आयवेअर कॅटेगरीतलं मोठं नाव रे-बॅन. गॉगल किंवा चष्मा हे शब्द रे-बॅन या ब्रॅण्डचं वर्णन करायला अपुरे ठरतात. सन ग्लासेस, आयवेअर म्हटलं की थोडंबहुत काम होतं, पण तरीही रे-बॅन म्हणजे रे-बॅनच. त्यात एक थाट, क्लास आणि छुपा माजही दडलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या ब्रॅण्डविषयी जाणून घेणं औचित्याचं ठरेल.

१९२९ साली यूएस आर्मीतील लेफ्टनंट जनरल जॉन मॅकक्रेडी यांच्या कानावर पायलट मंडळींची एक तक्रार आली. विमान अतिउंचीवर नेल्यास सूर्याच्या प्रखर किरणांमुळे अस्वस्थ वाटतं. डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी सुरू होते. अशा प्रकारची ही तक्रार होती. ती लक्षात घेऊन लेफ्टनंट जनरल जॉन यांनी औषधी उपकरण बनवणाऱ्या कंपन्यांमधील नामांकित नाव असलेल्या बॉश अ‍ॅण्ड लॉम्ब या कंपनीकडे ही तक्रार नेली. आकाशातील गडद निळा रंग आणि पांढरी छटा यामुळे पायलट मंडळींचं लक्ष विचलित होणार नाही, अशा प्रकारच्या वैमानिक चष्म्यांची निर्मिती कंपनीने करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार बॉश अ‍ॅण्ड लॉम्ब कंपनीने १९३६ साली अँटिग्लेयर प्रकारातील ग्लासेस निर्माण केल्या. त्या प्लास्टिक फ्रेमच्या आणि ग्रीन लेन्सच्या होत्या. अर्थातच वैमानिकाच्या दृष्टिकोनातून ही निर्मिती करण्यास आली होती, पण या सनग्लासेसचा दर्जा आणि लुक इतका भारी होता की कंपनीला हेच सनग्लासेस थोडय़ा सुधारणा करून एक ब्रॅण्ड म्हणून मार्केटमध्ये आणण्याचा मोह आवरला नसावा.

इथे रे-बॅन या ब्रॅण्डचा जन्म झाला. रे अर्थात किरणांना, बॅन – मज्जाव, अटकाव असा सहज-सोपा पण तरी छोटय़ा अक्षरांत सामावणारा अर्थ या नावातच आहे आणि हे नाव हेच या ब्रॅण्डचा लोगो आहे. फॅशन आणि आयवेअरचा भाग म्हणून कंपनीने नव्या मेटल फ्रेमसह या सनग्लासेसचं नवं मॉडेल बाजारात आणलं. त्याला नाव दिलं रेबॅन एव्हिएटर. अमेरिकन एअरफोर्सशी असलेलं नातं आणि एव्हिएटर या नावाने या सनग्लासेसला वलय प्राप्त करून दिलं. एव्हिएटर म्हणजे वैमानिक. साधारणत: जगाच्या कुठल्याही भागात गेलात तरी सैन्याशी निगडित वस्तू म्हणजे दर्जा किंवा वरचा क्लास ही मानसिकता सर्वत्र आढळते. रे-बॅनचं वेफेरर  ( WAYFARER) मॉडेल आलं. वेफेअरर म्हणजे पथिक, प्रवासी. हे मॉडेलसुद्धा गाजलं. त्याआधी दुसऱ्या महायुद्धातील जनरल डग्लसने या ब्रॅण्डला एक वलय प्राप्त करून दिलं. १९६५ साली झालेली ऑलिम्पियन वन आणि टू ही मॉडेल्स पीटर फोंडा या विख्यात अभिनेत्याने १९६९ साली आलेल्या त्याच्या ‘इझीरायडर’ फिल्ममध्ये वापरली. सैन्यातील महत्त्वपूर्ण अधिकारी किंवा वैमानिक किंवा चित्रपट कलावंत एखादा ब्रॅण्ड वापरतात म्हणजे तो उत्तमच असणार या धारणेने रे-बॅनचे साम्राज्य विस्तारात गेले.

१९८० च्या दशकात रे-बॅनची लोकप्रियता कळसास पोहचली, कारण दी ग्रेट एम जे अर्थात मायकल जॅक्सन, मॅडोना यांसारखे स्टार गायक रे-बॅन वापरत होते. त्या कलाकारांना देव मानणाऱ्या अनुयायांनी रे-बॅनला उचलून धरले नसते तर नवलच! पहिल्या दिवसापासून लोकप्रियता मिळण्याचे भाग्य फार कमी ब्रॅण्ड्सच्या नशिबी असते. रे-बॅन याबाबतीत नेहमीच भाग्यवान ठरला. जन्मापासून ते अगदी आजच्या तारखेपर्यंत हा ब्रॅण्ड प्रतिष्ठेशी, स्टाइलशी, आयकॉन असण्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे आज बाजारात अनेक सनग्लासेस ब्रॅण्ड्स येऊनही ८० र्वष रे-बॅनची लोकप्रियता जगभर अबाधित आहे.

रे-बॅन ओरिजनल वापरणाऱ्या व्यक्तींचा ‘रॉयल कारभार’ आपसूकच नोंदवला जातो. kSunglasses are like facebook. They allow you to stare at people without getting caughtl हे विधान सनग्लासेसचा वेगळा उपयोग दर्शवत असलं तरी उन्हापासून संरक्षण हा मूळ हेतू बाजूला पडून सनग्लासेस म्हणजे फॅशन, स्टाइल, तुमचं व्यक्तिमत्त्व असं नवं समीकरण जुळत आहे. आणि या समीकरणात जर डोळ्यांवर रे-बॅनचे सनग्लासेस असतील तर.. you will look good. If you look good, you will feel good and if you feel good, definitely you will do good. त्यामुळे रे-बॅनसह see and be seen…

viva@expressindia.com