संकेत दांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जम्मू काश्मीर जरी सध्या पेटलेलं असलं तरी त्याच्या गाभ्यामध्ये आजही सफरचंदाच्या बागा, चविष्ट खाद्यपदार्थाची ऊब आहे. म्हणूनच काहीही झालं तरी तिथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत नाहीय. प्रसिद्ध काश्मिरी कहावा आणि अशाच चविष्ट अन्नपदार्थाची सफर घडवणारी ही, जम्मूची खाऊगल्ली.
‘खाण्यासाठी जन्म आपुला.. ताटात वाढा गरम ठेपला,’ या अशा ओळी आणि त्यांचं महत्त्व खवय्यांशिवाय आणखी कोणाला समजणार? भटकंती करणाऱ्या अनेक तरुणांना हल्ली त्या त्या ठिकाणच्या खाण्याचंही वेड लागल्याचं दिसतंय. कारण कोणत्याही ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थावरून त्या ठिकाणाची जास्त चांगली ओळख होते. जम्मू-काश्मीर म्हटल्यावर सध्या आपल्या डोळ्यांसमोर येतो तो तिथला हिंसाचार. आतंकवादी कारवाया आणि विस्कळीत जनजीवन. पण याच जम्मूची एक दुसरी बाजूही आहेच. ती अतिशय चविष्ट आहे, कलात्मक आहे, सुंदर आहे. म्हणूनच या तणावपूर्ण परिस्थितीतही तिथले पर्यटक काही कमी होत नाहीयेत.
काश्मीरच्या हसीं वादियोंमध्ये हिंडताना भूकही प्रचंड लागते. मग काही तरी चविष्ट आणि भक्कम अन्न तर हवंच. जम्मू मार्केट परिसरात आपल्याला या खानपानाची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. इथे अनेक अन्नपदार्थ खवय्यांसाठी हजर आहेत. जम्मूतील गांधीनगर मार्केट परिसरात असलेली ‘पहलवान्स’ची चॉकलेट बर्फी जगप्रसिद्ध आहे. ‘पहलवान दी हट्टी’ किंवा ‘पहलवान्स’मध्ये असलेले इतरही अनेक पदार्थ जिभेला खूश करतील. अस्सल तुपातल्या मिठाया, समोसे, चना-भटुरा, कुलचा, आलू टिक्की हे पदार्थ इथे खायलाच हवेत.
इथे सुक्या मेव्याची दुकानंही फार आहेत. जम्मूमध्ये तो छान मिळतोही. ही खरेदी झाल्यावर जरा विसावा घ्यायचा तर ‘अमृतसरिया’ला नक्की भेट द्या. तिथले अस्सल तुपातले पदार्थ रेटवलेच पाहिजेत. रेटवले हा शब्द अशासाठी की इथली खाद्यपदार्थाची जंत्री वाचून तुम्ही सावकाश, संथपणे ते खाऊच शकत नाही. ‘घेता किती घेशील दो करांनी’ असं आपलं होऊन जातं. त्यामुळे एकामागोमाग एक पदार्थ पोटात रिचवले जातात.
जम्मूतील रेसिडेन्सी रोडवर ‘पापा दी हट्टी’मध्ये चिकन तंदुरी, तवा चिकन, मटन टिक्का असे मांसाहारी पदार्थ झकास मिळतात. थंडीच्या मोसमात असे गरमागरम आणि चविष्ट पदार्थ खायची गंमतच न्यारी. जम्मू मार्केट आणि आसपासच्या परिसरात खरेदी करताना काही ठिकाणं आपलं लक्ष वेधून घेतात. त्यात ‘गिआन दी हट्टी’, ‘पास राम दा ढाबा’, जैन बाजार येथील ‘रावलपिंडी स्वीट्स’ या ठिकाणी खवय्यांची नेहमीच गर्दी असते. ‘रावलपिंडीचे’ छोले-भटुरे निदान एकदा तरी खाऊन पाहाच. इतर ठिकाणी मिळणाऱ्या छोले-भटुऱ्यांपेक्षा इथली चव एकदम खासच असते. आता हे प्रसिद्ध छोले शंभरी पार करण्याच्या मार्गावर आहेत. कारण गेली जवळपास ९०पेक्षा जास्त वर्षे रावलपिंडीत उत्तमोत्तम छोले बनत आहेत. इथे एकच पदार्थ वेगळ्या दुकानात खाल्ला तर त्याची वेगळी चव मिळेल. कुठे तुपात अगदी बुडलेला पदार्थ तर कुठे साखरेत घोळलेला कुठे ताज्या सुक्यामेव्याचा स्वाद तर कुठे केशराचा गंध. या चवींच्या दुनियेत तुम्ही हरवून जाल, याची गॅरेंटीच. अस्सल काश्मिरी पदार्थसुद्धा इथे मिळतातच.
जम्मू मार्केट परिसर आणि आजूबाजूच्या भागातला शुद्ध साजूक तुपातला सूजीका हलवा म्हणजे रव्याचा शिरा फर्मासच. सकाळी या शिऱ्यासोबत दिवस सुरू करणं म्हणजे चंगळच पण त्यासाठी जरा लवकर उठावं लागेल. कारण हे हलव्याचे स्टॉल्स ९ वाजेपर्यंतच सुरू असतात. सोबतच ‘बालुशाही’, ‘फालुदा-मटका कुल्फी’ आणि विविध प्रकारचे पकोडे यांचीही लज्जत न्यारी असते. ‘पतीसा’, ‘कलाकंद’, ‘राजमा चावल’, ‘पंजीरी’ हे इथे आल्यावर आवर्जून खाण्यासारखे पदार्थ.
जम्मू-श्रीनगर महामार्गावरही विविध स्टॉल्स तुमची भूक भागवण्यासाठी सज्ज आहेत. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे मंथल. विविध प्रकारची मांसाहारी लोणची मिळण्याचं हे ठिकाण. थंडीच्या मोसमात कितीही वेळा प्यायला तरी चहा हवासाच वाटतो. असा चविष्ट चहा पाजणाऱ्या टपऱ्याही रस्तोरस्ती दिसतात.
जम्मूच्या वास्तव्यात एकदा खायलाच हवा असा पदार्थ म्हणजे पंजिरी. साजूक तूप, डिंक, मगज, मखणा(कमळाचं बी), सुकामेवा आणि साखर घालून हा पदार्थ तयार होतो. प्रत्येकाची पंजीरी बनविण्याची पद्धत वेगळी पण चविष्ट असते. त्यामुळे ती चाखायलाच हवी.
‘लाली शाह कुल्फी वाला’ हे जम्मू मार्केटच्या गजबजलेल्या ठिकाणी असलेलं आणखी एक प्रसिद्ध दुकान. याशिवाय मोती बाजारातली कलाडी कुलचासुद्धा चाखून पाहाच. मांसाहारींसाठी रिहाडी चुंगी, पंजाबी ब्रदर्स इथे अनेक पर्याय मिळतील.
रघुनाथ मंदिर, रणबीरेश्वर मंदिर, अन्नपूर्णा मंदिर या ठिकाणांनाही भेट जरूर द्या. जम्मूत जर स्थानिक वाटाडय़ासोबत फिरलात तर अशी वेगवेगळी ठिकाणं आणि खाणं नक्कीच अनुभवायला मिळेल. स्थानिकांची बोली आणि त्यांचे अनुभव तुम्हाला आवडून जातील.
काश्मिरी बिर्याणी तर इथे प्रसिद्ध आहेच, पण सोबतच कहावा हे चविष्ट पेयही. काश्मिरी लोकांची आणखीन एक खासियत म्हणजे, इथे छोटय़ाशा स्टॉलवर जरी लोणी-पाव घेतलं तरी पाव लोण्याने मस्त माखून मिळेल. दुधाचे पदार्थ आवडणाऱ्यांसाठी इथल्या खाऊगल्ल्या विशेष प्रिय ठरतील. पण तुम्हाला खरंखुरं स्थानिक अन्न खायचं असेल तर हल्ली अनेक घरांतूनही तशी सोय होते. यापुढे काश्मीरला जाल तेव्हा पश्मिना, रजाया आणि सफरचंदांच्या बागांपलीकडे या वेगळ्या वाटांवरच्या चविष्ट काश्मिरी अन्नाचीही चव घ्याच!
viva@expressindia.com