नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
आजची प्ले लिस्ट एकदम सोप्पी. ही खरे तर मी बनवलेली नाही. आपोआप तयार झाली आहे. म्हणजे घरातून बाहेर पडायचं आणि पुढच्या दोन-तीन किलोमीटरच्या प्रवासातच आपल्या संस्कृतीचे एवढे विविध पलू ऐकायला, अनुभवायला मिळतात, की त्यातूनच एक प्ले लिस्ट तयार होत जाते. संगीत संस्कृतीचा अख्खा कॅनव्हासच डोळ्यासमोर तरळतो.
उदाहरणार्थ, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, देवा हो देवा गणपती देवा, काला कव्वा काट खाएगा, गणराज रंगी नाचतो, नाच मेरी बुलबुल के पसा मिलेगा, पसा फेक तमाशा देख, क्यूं पसा पसा करती है क्यूं पसे पे तू मरती है, अशी चिकमोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं, गल्ल्यान साखली सोन्याची ही पोरी कोणाची, बेबी डॉल मं सोने दी, ए जी ओ जी लोजी सुनो जी, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, क्या रंग रूप है क्या चाल ढाल है नया नया साल है नया नया माल है, गणपती आला नि नाचून गेला, माझा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, बोलो हमसे बढकर कौन, मं हूं डॉन मं हूं डॉन, एक चुम्मा तू मुझ को उधार दैदे और बदलेमें यूपी बिहार लले, पप्पी दे पप्पी दे पारूला, ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो तुज नमो तुज नामो, मांगो मांगो मांगो मांगो जो भी चाहो, आ आन्टे अमलापूरो, गं तुझा झगा गं झगा गं वाऱ्यावरती उडतो..
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा.. गोल गोल चामडय़ाला दंडू.. पहिला गणपती.. मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा.. हाताला धरलंया म्हणते लगीन ठरलंया.. थेऊर गावचा चिंतामणी.. कहाणी त्याची ल ल जुनी.. हा भार सोसंना जड झालं पिका वानी.. गणपती गणपती गं चौथा गणपती.. चार बज गये लेकिन पार्टी अभी बाकी है.. हफ्ते में चार शनिवार होने चाहिए.. चार बौतल.. गना धाव रे मला पाव रे.. तूने मारी एँट्री यारे दिल में बजी घन्टी यारे टन टन टन.. लुंगी डॅन्स लुंगी डॅन्स लुंगी डॅन्स.. गणराज रंगी नाचतो नाचतो.. ले गयी दिल मेरा मनचली.. माउली माउली माउली माउली.. ही पोळीसाजूक तुपातली हिला म्हवऱ्याचा लागलाय नाद.. नाद करायचा नाय पाव्हणं नाद करायचा नाय.. पार्टी ऑल नाइट.. आंटी पुलिस बुला लेगी पर पार्टी यू ही चलेगी आज बौतला खुल्लन दो.. ते त्वा असुरपणे प्राशन केले.. दो घूंट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या.. परवा ही क्या उसका आरम्भ कैसा है और कैसा परिणाम है.. धरती अम्बर सितारे तेरी नज़्‍ारे उतारे.. देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा.. तू मेरा हिरो ओ ओ ओ हिरो ओ ओ ओ ए.. देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया.. तुनक तुनक तुन ता डा डा तुनक तुनक तुन.. तुन्दिल तनु परी चपळ साजिरी.. मेरा सोला का डोला छियालिस की छाती.. सिधी बात बोलू बात घुमानी नही आती.. आता माझी सटकली, मला राग येतोय.
मला राग येतोय. खरंच येतोय. पण, असो.. सांस्कृतिक देवाण-घेवाण, सांस्कृतिक जडण-घडण, सांस्कृतिक खिचडी का काय ते.. चालायचंच! पुढचे दहा दिवस.. नकोच वेगळी प्ले लिस्ट.
हे ऐकाच.. : शांत व्हा..
तुम्हालाही माझ्यासारखेच शांत व्हावेसे वाटत असेल, घरातून बाहेर पडू नये असे वाटत असेल, तर.. ‘विश्वविनायक’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. अजय अतुल जेव्हा अजय-अतुल नव्हते, तेव्हाचा त्यांचा (बहुधा पहिलाच) आल्बम. बाप आल्बम आहे हा. शंकर महादेवन यांनी गायलेले श्रीगणेशाय धीमहि, जे नंतर ‘विरुद्ध’ या चित्रपटात घेण्यात आले, एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेले प्रणम्य शिरसा देवं.., गणेश चालीसा, दमदार कोरसचा फार सुंदर वापर असलेले अथर्वशीर्ष आणि जय जय सुरवरपूजित आणि सर्वात भारी म्हणजे एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेली आरती! त्यात पुरुष आणि स्त्रियांचा कोरस वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला. पुरुष आक्रमक आणि स्त्रिया अतिशय गोड आवाजात. फारच सुंदर. एकूण आल्बमचे संगीत संयोजन तर फारच वरचे. सिम्फनी आणि शास्त्रीय संगीताचा घडवून आलेला उत्तम मिलाप, स्ट्रिंग्स, ब्रासचा केलेला नावीन्यपूर्ण वापर. सगळं काही केवळ अप्रतिम. बहुतांश लोकांनी ऐकला असेलच, जर नसेल तर आवर्जून ऐका.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा